Jump to content

भि.शि. स्वामी

डॉ.भि.शि.स्वामी
चित्र:डॉ.भि.शि.स्वामी.jpg
डॉ.भि.शि.स्वामी
डॉ.भि.शि.स्वामी
जन्म नाव भिमा शिवय्या स्वामी
जन्म १५ ऑक्टोबर, इ.स. १९४३
सोनगांव ता. केज बीड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्राध्यापक
साहित्य प्रकार संत साहित्य, कादंबरी,
विषय सामाजिक
प्रसिद्ध साहित्यकृती मन्मथस्वामींची अभंगवाणी
लक्ष्मण महाराज :व्यक्ती आणि वाड्.मय
प्रजा
गणुराया
पत्नी विजया
अपत्ये अपर्णा, मयुरा

डॉ. भिमा शिवय्या स्वामी (१५ ऑक्टोबर, १९४३:सोनसांगवी, केज तालुका, बीड जिल्हा - ) हे वीरशैव संत साहित्याचे अभ्यासक व कादंबरीकार आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनेसांगवीतच झाले, तर हायस्कूलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी काॅलेजचे शिक्षण आधी पुण्याच्या एस.पी. कॉलेजमधून नंतर बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयातून बी.एस्‌सी. केले. पुढे बहिस्थ विद्यार्थी म्हणून स्वामी औरंगाबाद विद्यापीठातून बी.ए. व एम.ए.च्या पदव्या मिळवल्या. डॉ. यू.म. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याच विद्यापीठात पीएच.डी. साठी 'लक्ष्मण महाराज : व्यक्ती आणि वाड्. मय' या विषयावर संशोधन केले.

  • महाविद्यालयात शिक्षण घेते वेळी १९६६ ते १९७४ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात अनुरेखक म्हणून काम केले. १९७४ ते २००३ या कालावधीत श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा येथे अध्यापक म्हणून काम केले. २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित साहित्य

कथासंग्रह

  • दिशा (१९८०)

कादंबरी

  • गणुराया (२०००)
  • प्रजा (२०११)

संशोधन

  • लक्ष्मण महाराज :व्यक्ती आणि वाड्.मय (१९९४)
  • मन्मथस्वामींची अभंगवाणी (२००३)

संपादन

  • लक्ष्मण महाराज विरचित शिवभक्त कथा (१९९६)

संदर्भ

१. https://moresangita.blogspot.com/2020/01/blog-post_25.html