भिकल्या लाडक्या धिंडा
भिकल्या लाडक्या धिंडा हे भारतीय तारपावादक आहेत. हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या वाळवंडे गावचे हे मूळ रहिवासी आहेत.
बालपण
घरातच तारपा वादन वर्षानुवर्षे चालत असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच तारपा वाजविण्याची आवड होती.लहानपणी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते जंगलात गुरेढोरे चरावयास घेऊन जात असत.त्यावेळी ते आपल्या सोबत तारपा वाद्य घेऊन जात असत. गुरेढोरे चरत असताना ते तारपा वादनाचा सराव करीत.
वादन परंपरा
त्यांच्या घराण्यात साधारण दीडशे वर्षांपासून तारपावादनाची परंपरा आहे.त्यांचे आजोबा नवसू धाकल्या धिंडा तारपा वादन करीत असत. त्यानंतर त्यांचे वडील लाडक्या धाकल्या धिंडा तारपा वाद्य वाजवित असत.
तारपा वादन
वयाच्या पंधराव्या वर्षी ते तारपा वादन करायला लागले.
सन्मान
आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यापैकी खाली दिलेले महत्त्वाचे पुरस्कार आहेत.
- तारपा शिरोमणी पदवी. एकतारा गुरुकुल तर्फे.
- सांस्कृतिक सेनानी सन्मान. एकतारा गुरुकुल तर्फे.
- राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक अकादमी, नवी दिल्ली कडून संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार २०२२.[१]
- पालघर भूषण २०२३.[२]
- पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड दूत.[३]
संदर्भ
महाराष्ट्र टाईम्स, शनिवार,२१ ऑगस्ट २०२१.