Jump to content

भा.वि. भागवत

प्रा. भालचंद्र व्ही. भागवत, एफ.सी.आय; ए.सी.आर.ए., हे एक मराठी लॅंडस्केप आर्किटेक्ट असून पुण्यातील नामवंत उद्यानतज्ज्ञ होते. त्यांचे बालपण कल्याणजवळच्या रायता या गावी गेले.

ते सुरुवातीस कारकून होते. १९३४ साली त्यांनी फुलांची बाग असलेल्या एका मळ्याच्या व्यवस्थापकाची नोकरी घेतली व त्याकाळात ते उद्यानतज्ज्ञ झाले.

पुण्याची एम्प्रेस गार्डन त्यांनी बनवली.

यांचा मुलगा प्रभाकर भालचंद्र भागवत हेही लॅंडस्केप आर्किटेक्ट असून त्यांनी गुजरातमधील टिंबा या दगडी खाणीचे जंगलात रूपांतर केले. त्यांनी अनेक कंपन्या, बंगले, आणि शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे यांच्या बागा आखल्या.

म.का. राजवाडे हे भागवतांचे विद्यार्थी होत.

संदर्भ आणि नोंदी