Jump to content

भास्कर रामचंद्र भागवत

भास्कर रामचंद्र भागवत
जन्म नाव भास्कर रामचंद्र भागवत
जन्म ३१ मे, इ.स. १९१०
इंदूर
मृत्यू २७ ऑक्टोबर, इ.स. २००१
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, पत्रकारिता
भाषामराठी
साहित्य प्रकार बालसाहित्य, वैज्ञानिक कथा, विनोदी लेखन
प्रसिद्ध साहित्यकृतीफास्टर फेणे कादंबरी मालिका
बिपिन बुकलवार कादंबरी मालिका
वडील रामचंद्र भागवत
पत्नीलीलावती भास्कर भागवत
अपत्ये रवींद्र भागवत, चंदर भागवत

भास्कर रामचंद्र भागवत (३१ मे, इ.स. १९१०; इंदूर - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषतः कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबऱ्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबऱ्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रूपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी 'बालमित्र' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.

भाराभर लिखाण

भा.रा. भागवतांनी १८४हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांची वर्गवारी अशी :-
४९ कथासंग्रह, १०० कादंबऱ्या, ४ चरित्रे आणि ३२हून अधिक अन्य पुस्तके.

जीवन

भा.रा.भागवतांचा जन्म ३१ मे, इ.स. १९१० रोजी इंदुरात निरीश्वरवादी सुधारकी कुटुंबात झाला []. त्यांचे वडील, रामचंद्र भागवत, सरकारी शाळेचे -सुधारकी विचार असलेले- मुख्याध्यापक होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या, 'सेंट झेवियर्स महाविद्यालया'तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. दुर्गाबाई भागवत यांच्याशी त्यांचे दूरचे नाते होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत काही लेखनाचा उपक्रम केला होता; पण तो प्रकाशित झाला नाही.

आरंभिक काळ आणि पत्रकारिता

लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात 'माय मॅगझिन' हे पुस्तक/नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच ह. ना. आपटे, विष्णूशास्त्री चिपळूणकर ह्यांचे साहित्य ह्यांमुळे प्रभावित होऊन भा.रा. भागवतांनी बालवयातच लेखन सुरू केले. घरातल्या साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी 'वसंत' नावाचे मासिक काढले होते. बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे हिच्या मदतीने 'निळे पाकीट' या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले. ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता 'आनंद' मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट 'बालोद्यान' ह्या मासिकात प्रसिद्ध झाली होती.

भागवतांनी इ.स. १९३० च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९३५-३६मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते []. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक (इ.स. १९४१-४२) होते. महात्मा गांधींच्या अटकेची बातमी प्रसारित न करण्याचे आदेश असतानाही त्यांनी ती केली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते भूमिगत झाले. तेव्हा त्यांचा विवाह लीलावती भागवत यांच्याशी झालेला होता व त्या गरोदर होत्या. पण भा.रा. भागवत भूमिगत झाल्यावर त्यांना लपतछपत मुंबईत परत येणे भाग पडले. याच काळात एस.एम. जोशी यांच्यासोबत भागवत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. विसापूरच्या तुरुंगात त्यांनी त्याबद्दल कारावासही भोगला[]. त्याच काळात त्यांची आई वारली. त्यांच्या थोरल्या मुलाचा - रवींद्र याचा - जन्मही ते तुरुंगात असतानाच झाला. या स्वातंत्र्यचळवळीतल्या सहभागाबद्दल त्यांना पुढे सरकारी निवृत्तिवेतन मिळत असे.

साहित्यिक कारकीर्द

तुरुंगवासाच्या काळातही भागवतांचे लेखन चालू होते. सुरुवातीच्या काळात ते विनोदी कथालेखन करत असत. माझा विक्रम, वैतागवनातील वाफारे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे.

बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते []. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांना त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज झाले होते. [] इ.स. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

भा.रां.च्या साहित्यावर आधारित कलाकृती

रघुवीर कुलकर्णी ऊर्फ 'रघुवीर कूल' यांनी भा.रा. भागवत यांच्या 'बिपिन बुकलवार' या पात्रावर आधारित 'लगी शर्त' [] आणि 'रॉंग मॉरिशस' [] हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. 'चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया Archived 2015-04-12 at the Wayback Machine.' या संस्थेने या चित्रपटांसाठी अनुदान दिले आहे. []

भा.रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीच्या निमित्ताने ऐसी अक्षरे या मराठी संस्थळाने त्यांच्यावर विशेषांक काढला. त्यात भा.रां.चे अप्रकाशित साहित्य, कुटुंबीयांच्या मुलाखती, पूर्वप्रकाशित लेखन, भा.रां.च्या साहित्याची चिकित्सा करणारे लेख, फॅनफिक्शन, फास्टर फेणेच्या गोष्टींमधून येणाऱ्या ठिकाणांचा धांडोळा असे विषय हाताळले आहेत. []

प्रबंध

  • ‘भा.रा. भागवत आणि लीलावती भागवत यांचे बालसाहित्यातील योगदान’ या विषयावर प्रबंध लिहून नीला धनंजय धडफळे यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे.

समग्र वाड्मय (एकूण १८१ पुस्तके)

क्र. नाव प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) साहित्यप्रकार रचना मूळ लेखक
१८१अक्काचे अजब इच्छासत्रउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९५कादंबरीस्वतंत्र-
१८०अगडबंब मंडळाच्या गोष्टीउत्कर्ष प्रकाशन, पुणे----
अंतराळ प्रवासाचे पहिले पुस्तक---अनुवादित-
अंतराळात अग्निबाणमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९६१कादंबरीअनुवादित-
अक्काचे अजब इच्छासत्रइंद्रायणी प्रकाशन, पुणे१९८४कादंबरीस्वतंत्र-
अक्रुधान ते पिक्रुधानराजा प्रकाशन, मुंबई१९९४कादंबरीस्वतंत्र-
अदृश्य माणूसलाखाणी बुक डेपो, मुंबई१९९६कादंबरीअनुवादितएच्. जी. वेल्स
अद्भुत व्यक्तीच्या शोधात धाडसी वीरराजा प्रकाशन, मुंबई१९९२कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
अलकनंदा आणि जादूगार जिनराजा प्रकाशन, मुंबई१९९४कादंबरीस्वतंत्र-
असे लढले गांधीजीमधुराज पब्लिकेशन्स, मुंबई१९९९कादंबरीपुनर्कथित-
आगे बढो फास्टर फेणेपॉप्युलर प्रकाशन, पुणे१९६५कथासंग्रहस्वतंत्र-
१०आनंदी आनंद गडेराजा प्रकाशन, मुंबई२००८क्रमित कादंबरीअनुवादितलॉरा इंगल्स वाईल्डर
११आपल्या आगगाड्यांची कहाणीनॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली१९७१कथासंग्रहअनुवादित-
१२आरसेनगरीत जाई कादंबरीनवीन प्रकाशन, पुणे१९७७कादंबरीरूपांतरितलुईस कॅरल
१३इरावतीचा शोधमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९९६कादंबरीस्वतंत्र-
१४उडती छबकडीभारतीय ग्रंथ भवन१९६६कथासंग्रहस्वतंत्र-
१५उमलती कळीनाग विदर्भ प्रकाशन, अमरावती१९६२क्रमित कादंबरीअनुवादितलॉरा इंगल्स वाईल्डर
१६एक चमत्कारिक रात्र-----
१७एक होते सरोवरराजा प्रकाशन, मुंबई२००८क्रमित कादंबरीअनुवादितलॉरा इंगल्स वाईल्डर
१८एका चिन्याचा जमालगोटाराजा प्रकाशन, मुंबई१९९०कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
१९एकांड्या बेटावरचे थरारनाट्यराजा प्रकाशन, मुंबई१९९८कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
२०ऑलिंपिक महोत्सव आणि खेळाडूनॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली१९७५कादंबरीअनुवादित-
२१कंपनी चालली सूर्याकडेराजा प्रकाशन, मुंबई१९९६कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
२२काळा बाणलाखाणी बुक डेपो, मुंबई१९९६कादंबरीस्वतंत्र-
२३काशाची काशीयात्राराजा प्रकाशन, मुंबई१९९४कादंबरीस्वतंत्र-
२४किड्याने घातले कोडेपरिमल प्रकाशन, औरंगाबाद१९९५कादंबरीस्वतंत्र-
२५किल्ल्यातील कारस्थानलाखाणी बुक डेपो, मुंबई१९९६कादंबरीस्वतंत्र-
२६कॅप्टन किडचा खजिनाउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९६कादंबरीस्वतंत्र-
२७कॅप्टन ग्रॅंट! तुम्ही कुठे आहात?राजा प्रकाशन, मुंबई१९९८कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
२८कैद्याचा खजिनापुरंदरे प्रकाशन, पुणे२००९कादंबरीअनुवादित-
२९क्रिकेटची खुमखुमी जिरलीअद्वैत प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रहस्वतंत्र-
३०खजिन्याचा शोधउत्कर्ष प्रकाशन, पुणे२००४कादंबरीस्वतंत्र-
३१खजिन्याचे बेटऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, नवी दिल्ली१९८४कादंबरीअनुवादित-
३२खजिन्याच्या बेटावर संजूराजूपॉप्युलर प्रकाशन, पुणे१९७१कादंबरीस्वतंत्र-
३३खरा खजिनापॉप्युलर प्रकाशन, पुणे१९६४कथासंग्रहस्वतंत्र-
३४गडावरचा खजिनाउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८६कथासंग्रहस्वतंत्र-
३५गढीचा मालक-----
३६गप्प बसा मुंछासेनशकुल प्रकाशन, पुणे१९८४कादंबरीरूपांतरित-
३७गांजलेले जीव---अनुवादित-
३८गालफाटूचा पराक्रमसोनसळे ॲन्ड कं., पुणे१९८२कथासंग्रहस्वतंत्र-
३९गिरिशिखराचे गुपितराजा प्रकाशन, मुंबई१९८६कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
४०गुप्त खजिन्याचे बेटअतुल बुक एजन्सी२००३कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
४१गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८२कादंबरीस्वतंत्र-
४२घड्याळाचे गुपितइंद्रायणी प्रकाशन, पुणे१९८०कादंबरीस्वतंत्र-
४३चंद्रावर स्वारीलाखाणी बुक डेपो, मुंबई१९९७कादंबरीरूपांतरितज्यूल व्हर्न
४४चक्रीवादळात फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८५कथासंग्रहस्वतंत्र-
४५चला उत्तर ध्रुवाकडेराजा प्रकाशन, मुंबई१९९२कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
४६चाणक्यमेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे१९९४कथासंग्रहपुनःकथित-
४७चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८५कादंबरीस्वतंत्र-
४८चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८५कादंबरीस्वतंत्र-
४९चिटोऱ्याचा प्रताप---स्वतंत्र-
५०छगन सांगू लागलाकृष्णा प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रहस्वतंत्र-
५१छगनचे चऱ्हाट चालूचकृष्णा प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रहस्वतंत्र-
५२छोटी मोठी यंत्रेलाखाणी बुक डेपो, मुंबई१९९४कादंबरीअनुवादित-
५३जंगल बुकातील दंगल त्या दंगलीतील दोन पोरेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९६कादंबरीअनुवादित-
५४जंगलपटात फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८५कादंबरीस्वतंत्र-
५५जगाच्या कल्याणामॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९६२कादंबरीअनुवादित-
५६जयदीपची जंगल यात्रामॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९७९कादंबरीस्वतंत्र-
५७जवानमर्द फास्टर फेणेपॉप्युलर प्रकाशन, पुणे१९६५कथासंग्रहस्वतंत्र-
५८जाईची नवल कहाणीमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९७७कादंबरीरूपांतरितलुईस कॅरल
५९जुनाट भावलीची भन्नाट कथा आणि इतर पाश्चात्य गोष्टीउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९६कथासंग्रहस्वतंत्र-
६०जॉर्ज वॉशिंग्टनग. पां. परचुरे प्रकाशन१९३२चरित्रअनुवादित-
६१ज्ञान आणि मनोरंजन: भाग पहिलामॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९६०माहितीपरस्वतंत्र-
६२ज्यूल व्हर्नची अद्भुत सृष्टीराजा प्रकाशन, मुंबई१९९८कादंबरीअनुवादित-
६३झपाटलेला प्रवासीराजा प्रकाशन, मुंबई१९९८चरित्रअनुवादितज्यूल व्हर्न
६४टिंग टिंग टिंगाउत्कर्ष प्रकाशन, पुणे२००९कादंबरीस्वतंत्र-
६५टिक टॉक फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८९कथासंग्रहस्वतंत्र-
६६टिल्लू नावाचा विदूषक---रूपांतरित-
६७ट्रिंग-ट्रिंग-फास्टर फेणेपॉप्युलर प्रकाशन, पुणे१९६५कथासंग्रहस्वतंत्र-
६८डाकूंची टोळी आणि बालवीरपरचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई१९७५कादंबरीस्वतंत्र-
१७५डाकू बनला डिटेक्टिव्ह आणि दुसऱ्याही काही मजेदार लोककथाउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९६कथासंग्रह-मॉरीस लेब्लॉं
६९ढब्बू राजाची गोष्ट---रूपांतरित-
१७९ढोरगावचा चोरउत्कर्ष प्रकाशन, पुणे----
१६५तारस बलबाचे दोन सुपुत्रलाखाणी बुक डेपो, मुंबई१९६२कादंबरीस्वतंत्र-
७०तीन बलून बहाद्दरउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९८कादंबरीअनुवादित-
७१तुटक्या कानाचे रहस्यसुरेश एजन्सी, पुणे१९९६कादंबरीस्वतंत्र-
७२तैमूरलंगाचा भालामॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९७२कादंबरीस्वतंत्र-
७३तोंड मिटा मुंछासेन---रूपांतरित-
७४तोचि साधु ओळखावामहाराष्ट्र प्रकाशन१९५९चरित्र--
७५तोरणा कोणी जिंकला?राजा प्रकाशन, मुंबई१९९४कादंबरीस्वतंत्र-
७६त्यांनी पाहिलेला भारतनॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली१९७०कादंबरीअनुवादित-
७७त्यांसी म्हणे जो आपुलेमहाराष्ट्र प्रकाशन१९५९---
७८थॅंक्यू, मिस्टर शार्क आणि दुसऱ्याही काही मजेदार लोककथाउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९६कथासंग्रहस्वतंत्र-
७९दर्याई डाकू शार्की आणि दुसऱ्याही काही मजेदार लोककथाउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९६कथासंग्रहस्वतंत्र-
८०दर्याई डाकूंच्या गोष्टीइंद्रायणी प्रकाशन, पुणे१९८४कादंबरीस्वतंत्र-
८१दर्यादेशची राजकन्याशांताई प्रकाशन, पुणे१९९६कादंबरीस्वतंत्र-
८२दीपमाळेचे रहस्यमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९७५कादंबरीस्वतंत्र-
८३दुःख पर्वताएवढे ('ला मिझरेबल्स'चे भाषांतर)संजय प्रकाशन, पुणे१९८२कादंबरीअनुवादित-
८४दुर्मिळ तिकिटाची साहसयात्राउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९५कादंबरीस्वतंत्र-
८५देव तेथेंचि जाणावामहाराष्ट्र प्रकाशन१९५९कादंबरी--
८६धूमकेतूच्या शेपटावरराजा प्रकाशन, मुंबई१९८६कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
८७ध्रुवाने लावले वेडराजा प्रकाशन, मुंबई१९९२कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
८८नंदू करतो मोत्याची शिकार!राजा प्रकाशन, मुंबई२००६कादंबरीस्वतंत्र-
८९नंदूचा यांत्रिक माणूसराजा प्रकाशन, मुंबई१९८२कादंबरीस्वतंत्र-
९०नंदूच्या थापांचे ... गरगर फिरे विमान!राजा प्रकाशन, मुंबई२००६कादंबरीस्वतंत्र-
९१नंदूने रचले मनोरथराजा प्रकाशन, मुंबई२००६कादंबरीस्वतंत्र-
९२नागफणी खजिनाउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८७कथासंग्रहस्वतंत्र-
९३निर्जन बेटावर धाडसी वीरराजा प्रकाशन, मुंबई१९९२कादंबरीअनुवादित-
९४निळा मासानाग विदर्भ प्रकाशन, अमरावती१९६८-स्वतंत्र-
९५न्यायाधीशाचे अंतरंग-१९५७-अनुवादित-
९६पबुताईची फ कशी झाली?केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई१९४६कादंबरीस्वतंत्र-
९७पबुताईच्या गोष्टीकेशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई१९४२कथासंग्रहस्वतंत्र-
९८पळवलेल्या पोराची गोष्टऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, नवी दिल्ली१९८६कादंबरीस्वतंत्र-
९९पशुमानवाचे बेटज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि., पुणे२०००कादंबरीअनुवादित-
१००पाच भावांची गोष्टग. पां. परचुरे प्रकाशन१९५५चरित्रअनुवादित-
१०१पाताळलोकची अद्भुत यात्राराजा प्रकाशन, मुंबई१९९७कादंबरीरूपांतरितज्यूल व्हर्न
१०२पिझारोचे थैमानपुरंदरे प्रकाशन, पुणे१९९४कादंबरीअनुवादित-
१०३पिस्तुल बॉम्बच्या कथाअद्वैत प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रहस्वतंत्र-
१७७पुत्र असावा ऐसा गुंडाउत्कर्ष प्रकाशन, पुणे----
१०४पुनश्च खजिन्याची भेट---अनुवादित-
१०५पुनश्च भेट---स्वतंत्र-
१०६पृथ्वी दुभंगलीराजा प्रकाशन, मुंबई----
१०७पोलादपूरचा रणराक्षसराजा प्रकाशन, मुंबई१९९८कादंबरीअनुवादित-
१०८पोस्टाच्या तिकिटांची नवलकहाणीनॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली१९७३कथासंग्रहअनुवादित-
१०९प्रतापगडावर फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८२कादंबरीस्वतंत्र-
११०फार फार सुंदर शहरआशय प्रकाशन, पुणे१९५८कथासंग्रहअनुवादित-
१११फास्टर फेणे टोला हाणतोउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८२कथासंग्रहस्वतंत्र-
११२फास्टर फेणे डिटेक्टिव्हउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८२कथासंग्रहस्वतंत्र-
११३फास्टर फेणेचा रणरंगउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९६५कथासंग्रहस्वतंत्र-
११४फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरीउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८२कथासंग्रहस्वतंत्र-
११५फास्टर फेणेची काश्मिरी करामतउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८२कथासंग्रहस्वतंत्र-
११६फास्टर फेणेची डोंगरभेटउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८५कथासंग्रहस्वतंत्र-
११७फास्टर फेणेच्या गळ्यात माळउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८५कथासंग्रहस्वतंत्र-
११८फुरसुंगीचा फास्टर फेणेपॉप्युलर प्रकाशन, पुणे१९६५कथासंग्रहस्वतंत्र-
११९बर्फभूमीवरील बहाद्दरराजा प्रकाशन, मुंबई१९९२कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
१२०बलदंड बन्यान---अनुवादित-
१२१बाईलचोरसोनसळे ॲन्ड कं., पुणे१९८२---
१२२बाजीरावराजा प्रकाशन, मुंबई--पुनर्कथित-
१२३बादशाही जासूदराजा प्रकाशन, मुंबई१९९७कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
१२४बालबहाद्दर फास्टर फेणेपॉप्युलर प्रकाशन, पुणे१९६५कथासंग्रहस्वतंत्र-
१२५बेन फ्रॅंकलिन - अमेरिकेचा गुणी शास्त्रज्ञमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९५६कादंबरीअनुवादित-
१२६बोला बोला मुंछासेनशकुल प्रकाशन, पुणे१९८४कादंबरीरूपांतरित-
१२७ब्रह्मदेशातला खजिनामॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९७२कादंबरीस्वतंत्र-
१२८भटकबहाद्दरमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९६६कादंबरीअनुवादितमूळ -मार्क ट्वेनचे ‘द अ‍ॅडव्हेन्चर ऑफ हकलबरी फिन’
१७६भटांच्या वाड्यातील भुतावळपुरंदरे प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रह-चार्ल्स डिकन्स
१२९भाग्यशाली सिक्सरअद्वैत प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रहस्वतंत्र-
१३०भारत पाक युद्धमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई--अनुवादित-
१३१भारद्वाजाची भरारीसोनसळे ॲन्ड कं., पुणे१९८३कथासंग्रहस्वतंत्र-
१३२भाराभर गवतउत्कर्ष प्रकाशन, पुणे२००४कथासंग्रह--
१३३भुताळी जहाजमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९७२कादंबरीस्वतंत्र-
१३४मडकोबाशब्दवेध प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रहअनुवादित-
१३५महाभारत---पुनःकथित-
१३६महेश उडाला भुर्रर्रsssज्योस्त्ना प्रकाशन, मुंबई१९८८कथासंग्रहस्वतंत्र-
१३७माझा विक्रमकेशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई१९४६-स्वतंत्र-
१३८मायापूरचे रंगेल राक्षस: अर्थात् अतिशक्तिमान घंटासुर व चंडासुर आणि त्यांचे बहुढंगी तऱ्हेवाईक मित्रगण यांच्या अद्भुत साहसांची नवलकहाणीलाखाणी बुक डेपो, मुंबई१९९६कादंबरीरूपांतरितफ्रांस्वा रेबल
१३९मुंबईला चक्करउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९५कादंबरीस्वतंत्र-
१४०मुक्काम शेंडेनक्षत्रलाखाणी बुक डेपो, मुंबई१९६४कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
१४१मूर्तीच्या शोधात मोनाराजा प्रकाशन, मुंबई२००८कादंबरीस्वतंत्र-
१४२मोठ्या रानातले छोटे घरराजा प्रकाशन, मुंबई२००८क्रमित कादंबरीअनुवादितलॉरा इंगल्स वाईल्डर
१४३रॉबिनहूड आणि त्याचे रंगेल गडीइंद्रायणी प्रकाशन, पुणे१९९६कादंबरीअनुवादित-
१४४रॉबिन्सन आणि मंडळीरुची प्रकाशन, पुणे१९६६कादंबरीस्वतंत्र-
१४५लाख मांजरीराजा प्रकाशन, मुंबई१९९४कादंबरीस्वतंत्र-
१४६वनस्पतींचा जादूगारमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९६५कादंबरीअनुवादित-
१४७विज्ञानवेडे शास्त्रज्ञअनुबंध प्रकाशन, पुणे१९९६कादंबरीअनुवादित-
१४८विमानचोर विरुद्ध फास्टर फेणेउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९८९कादंबरीस्वतंत्र-
१४९वीर पांडव---स्वतंत्र-
१५०वैतागवनांतील वाफारेकॉंटिनेंटल प्रकाशन, मुंबई-कथासंग्रहस्वतंत्र-
१५१शाब्बास शरलॉक होम्स! (भाग पहिला)उत्कर्ष प्रकाशन, पुणे२००९कथासंग्रहअनुवादितआर्थर कॉनन डॉयल
१५२शाब्बास शरलॉक होम्स! (भाग दुसरा)उत्कर्ष प्रकाशन, पुणे२००९कथासंग्रहअनुवादितआर्थर कॉनन डॉयल
१५३शाब्बास शरलॉक होम्स! (भाग तिसरा)उत्कर्ष प्रकाशन, पुणे२००९कथासंग्रहअनुवादितआर्थर कॉनन डॉयल
१५४शाब्बास शरलॉक होम्स! (भाग चौथा)उत्कर्ष प्रकाशन, पुणे२००९कथासंग्रहअनुवादितआर्थर कॉनन डॉयल
१५५शाब्बास शरलॉक होम्स! (भाग पाचवा)उत्कर्ष प्रकाशन, पुणे२००९कथासंग्रहअनुवादितआर्थर कॉनन डॉयल
१५६शाळेतली भुताटकीमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई----
१५७शिंगीनाग विदर्भ प्रकाशन, अमरावती१९५८कादंबरीस्वतंत्र-
१५८छत्रपती शिवाजीअमर चित्र कथा-कॉमिक स्ट्रिप / चरित्रपुनःकथित-
१५९सगळं सगळं ठीक होतंमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९५६-अनुवादित-
१६०सफरचंद---अनुवादित-
१६१समुद्र सैतानलाखाणी बुक डेपो, मुंबई१९५६कादंबरीस्वतंत्र-
१६२साखर सोंड्या आणि दुसऱ्याही काही मजेदार लोककथाउत्कर्ष प्रकाशन, पुणे१९९६कथासंग्रहस्वतंत्र-
१६३सागरी चोरांवर पोरांची मातअद्वैत प्रकाशन, पुणे१९९४कथासंग्रहस्वतंत्र-
१६४साता समुद्राचा सुलतानराजा प्रकाशन, मुंबई१९९०कादंबरीस्वतंत्र-
१७८शिकंदरचा बिलंदर कुत्राउत्कर्ष प्रकाशन, पुणे----
१६६सिंडरेलाची मुलगी मिंडरेला (सहा छानदार परिकथा)अनुबंध प्रकाशन, मुंबई२००४कथासंग्रहस्वतंत्र-
१६७सुधीरवाडीसंजय प्रकाशन, पुणे१९८०कादंबरीस्वतंत्र-
१६८सूर्यावर स्वारीलाखाणी बुक डेपो, मुंबई१९६४कादंबरीअनुवादितज्यूल व्हर्न
१६९सोव्हिएटच्या समरकथाकेशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई१९४३कथासंग्रहअनुवादित-
१७०हरीण बालकउर्जा प्रकाशन, मुंबई१९५५कादंबरीअनुवादितमार्जरी किनन रॉलिंग्स्
१७१हर्क्युलीसऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली१९८६कादंबरीअनुवादित-
१७२हवाई हुकूमशहाराजा प्रकाशन, मुंबई१९९७कादंबरीअनुवादित-
१७३हाजीबाबाच्या गोष्टीमॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई१९९०कथासंग्रहअनुवादित-
१७४हिंमतवान जासूदराजा प्रकाशन, मुंबई१९९०कादंबरीस्वतंत्र-

संदर्भ व नोंदी

  1. ^ भा.रा. भागवत. भटांच्या वाड्यातील भुतावळ (मलपृष्ठावर दिलेला लेखकाचा अल्पपरिचय).
  2. ^ a b c हूज हू ऑफ इंडियन रायटर्स, १९९९ (खंड १) (इंग्लिश भाषेत). p. १३३-३४.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ निरंजन घाटे यांचा 'ऐसी अक्षरे' विशेषांकामधला लेख - http://www.aisiakshare.com/node/4160
  4. ^ लगी शर्त : http://cfsindia.org/lagi-sharth-let%E2%80%99s-bet/ Archived 2012-04-20 at the Wayback Machine.
  5. ^ रॉंग मॉरिशस : http://cfsindia.org/wrong-mauritius/ Archived 2012-09-02 at the Wayback Machine.
  6. ^ रघुवीर कूल यांची मुलाखत http://www.aisiakshare.com/node/4134
  7. ^ 'ऐसी अक्षरे'चा भा. रा. भागवत विशेषांक http://aisiakshare.com/brbf