भाषा विकास
भाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा] |
---|
तात्विकभाषाशास्त्र |
सर्जनशील भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र |
वर्णनात्मक भाषाशास्त्र |
उपयोजित भाषाशास्त्र |
जाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा] |
संबधित लेख |
दालन |
भाषा ही मानवाला मिळालेली एक बहुमूल्य देणगी आहे. भाषेच्या माध्यमातून प्रत्येक माणूस एकमेकांशी संवाद साधू शकतो. संवाद साधण्यासाठी लिहिणे, वाचणे, बोलणे, इशारे, हावभाव, मुक अभिनय, मुद्राभाव असे अनेक माध्यम आहेत. परंतु भाषा हे अतिशय प्रभावी साधन आहे. भाषा हे आपले विचार, मते, भावना आणि जाणिवा प्रगट करण्याचे एक साधन आहे. भाषेला इंग्लिश भाषेत लॅंग्वेज (language) असे म्हणतात. हा शब्द 'लिंग्वा' या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. लिंग्वाचा अर्थ जीभ असा होतो. भाषेचा वापर करणे हे देखील एक कौशल्य आहे.
भाषेची कार्ये: भाषा हे व्यक्तीच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे एक साधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते. तसेच भाषा हे माहिती आणि कोशल्ये शिकण्याचे एक साधन आहे. भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो.
भाषा विकासाचे टप्पे :
भाषेच्या विकसाच्या अनेक पायऱ्या किंवा टप्पे आहेत. त्यामधील मुख्य 4 टप्पे म्हणजे-
- आकलन
- शब्दसंग्रह वाढवणे
- वाक्यरचना
- शब्दोच्चारण
१. आकलन म्हणजे दुसऱ्याचे बोलणे समजून घेणे. आकलन हा भाषा विकासाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये समोरच्याला काय म्हणायचे आहे ते आपल्याला कळते. समोरच्याच्या आवाजातील रागीटपणा, कोमलता यांसारखे भाव आपल्याला समजतात. आकलन केल्याने आपण समोरच्याच्या सूचना समजू शकतो आणि त्यांचे पालनही करू शकतो. मनुष्याची आकलनशक्ती ही त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवरही अवलंबून असते, त्यामुळे प्रत्येक मनुष्याची आकलनशक्ती ही वेगवेगळी असते.
२. शब्दसंग्रह वाढवणे म्हणजे नवनवीन शब्दांचा साठा करणे होय. शब्दसंग्रह हे दोन प्रकारचे असतात- १. सामान्य शब्दसंग्रह आणि २. विशेष शब्दसंग्रह. सामान्य शब्दसंग्रहामध्ये नामे, सर्वनामे व क्रियापदांचा समावेश होतो. या शब्दसंग्रहमध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा आणि क्रियांचा समावेश होतो. विशेष शब्दसंग्रहामध्ये काही नवीन शब्दांचा समावेश होतो. त्यामध्ये व्यक्ती त्याच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांमधून काही नवीन शब्द शिकत असतो. रंगांची नावे, नद्यांची नावे, विषयांची नावे इत्यादी वेगवेगळ्या नावांचा समावेश होतो.
३. वाक्यरचना म्हणजे वेगवेगळे शब्द व्याकरणदृष्ट्या एकत्र करून एखादे वाक्य तयार करणे होय. वाक्यांचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये लहान वाक्ये, मोठी वाक्ये, गुंतागुंतीची वाक्ये, उद्गारवाचक वाक्ये, प्रश्नार्थी वाक्ये, इत्यादींचा समावेश होतो. वाक्यरचनेमधून व्यक्तीचा भाषा विकास दिसून येतो.
४. शब्दोच्चारण म्हणजे शब्दांचे उच्चारण. कानांनी ऐकलेले, आकलन केलेले शब्द बोलण्यासाठी त्यांचे शब्दात आणि वाक्यात रूपांतर करून वाणीच्या माध्यमातून उच्चार करणे फार महत्त्वाचे असते. शब्दोच्चारामधूनच व्यक्तीचा भाषा विकास दिसून येतो.