Jump to content

भाषा आणि जीवन (नियतकालिक)

'भाषा आणि जीवन' हे भाषाविषयास वाहिलेले भाषाशास्त्रीय त्रैमासिक आहे. हे विद्वत्-प्रमाणित (पियर रिव्ह्यूड) त्रैमासिक आहे.

प्रकाशनास आरंभ

मराठी अभ्यास परिषद ही मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करणारी संस्था असून ती १९८२ पासून कार्यरत आहे. १९८३ पासून या परिषदेतर्फे नियमितपणे 'भाषा आणि जीवन' हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते.

१९८३ पासून नियमितपणे प्रकाशित होणारे सकल भारतीय भाषांमधील हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक आहे. []

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रमाणित यादीमध्ये या त्रैमासिकाचा समावेश आहे.

विषय

या नियतकालिकात भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, व भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य असते.

संपादक परंपरा

डॉ.कल्याण काळे (१९८० ते १९९०) []

प्रा. प्र.ना.परांजपे

प्रा. आनंद काटीकर

पुरस्कार

  • या त्रैमासिकाला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा १९९५ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
  • या त्रैमासिकाला २०१९ या वर्षासाठीचा, सोलापूर येथील लोकमंगल पुरस्कार मिळाला आहे. []

विशेषांक

  • लेखकनिहाय सूची - वर्ष ३६, अंक ३-४ (२०१८)
  • कल्याण काळे विशेषांक - वर्ष ३९, अंक ३-४ (२०२१)

संदर्भ

  1. ^ "महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेले मानपत्र". भाषा आणि जीवन. वर्ष ४०, अंक ०३ : पावसाळा २०२२: आतील मलपृष्ठ.
  2. ^ विनायक गंधे. " ज्ञानव्रती डॉ.कल्याण काळे ". भाषा आणि जीवन. वर्ष ३९, अंक ३-४ : २०२१.
  3. ^ "भाषा आणि जीवन". भाषा आणि जीवन. वर्ष ४०, अंक ०१ : हिवाळा २०२२.