Jump to content

भावगीते

अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. भावगीत म्हणजेच मनातील भावांचे शब्दसुरांद्वारा प्रकटीकरण होय. जी.एन. जोशी हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले गजानन वाटवे यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली.

भावगीत या विषयावर प्रबंध लिहून शोभा अभ्यंकर यांनी पीएच.डी. मिळवली आहे. त्यांचे ‘सखी भावगीत माझे’ हे याच प्रबंधात आणखी भर घालून साध्यासोप्या भाषेत सादर केलेले पुस्तक आहे.

भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्या रागावर आधारलेले असायचे. या भावगीतांनी चांगले श्रोते निर्माण केलेले दिसतात. अशीच काही भावगीते खालील कोष्टकात दिली आहेत.

क्र. भावगीताची पहिली ओळ कवी संगीतकार गायक/गायिका राग
असेन मी नसेन मी शांता शेळकेयशवंत देवअरुण दातेभैरवी
असेच होते म्हणायचे तर विंदा करंदीकर दत्ता डावजेकर सुधीर फडकेबागेश्री
आस आहे अंतरी या मधुकर जोशी दशरथ पुजारीसुमन कल्याणपूरपहाडी
ऊर्मिले त्रिवार वंदन तुला राजा मंगळवेढेकर राम फाटक राम फाटक भैरवी
एकतारी गाते योगेश्वर अभ्यंकर श्रीनिवास खळेमाणिक वर्मामिश्र रागेश्री
एकतारीसंगे एकरूप झालो (चित्रगीत) जगदीश खेबुडकरसुधीर फडकेसुधीर फडकेयमन कल्याण
एक धागा सुखाचा (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडकेसुधीर फडकेशिवरंजनी
कधी बहर कधि शिशिर मंगेश पाडगावकर यशवंत देवसुधीर फडकेमिश्र केरवाणी
कल्पवृक्ष कन्येसाठी पी. सावळाराम वसंत प्रभूलता मंगेशकरपहाडी
कशी रे भेटू तुला राजा बढेश्रीनिवास खळेमालती पांडेपहाडी
केतकीच्या बनी तेथे अशोक परांजपेअशोक पत्कीसुमन कल्याणपूरबागेश्री/गोरख कल्याण
केशवा माधवा रमेश अणावकर दशरथ पुजारीसुमन कल्याणपूरदुर्गा/पहाडी
गुरू परमात्मा परेशु एकनाथश्रीधर फडकेसुरेश वाडकरशंकरा
घननीळा लडिवाळा ग.दि. माडगूळकर दत्ता डावजेकर माणिक वर्मापहाडी
चांदण्या रात्रीतले हे स्वप्न शांता शेळकेवसंत पवारमाणिक वर्मामिश्र मांड
जग हे बंदीशाळा (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडकेसुधीर फडकेमिश्र मांड
जय जय महाराष्ट्र माझा राजा बढेश्रीनिवास खळेशाहीर साबळे व इतर भूप
जेव्हा तुझ्या बटांना मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळेसुरेश वाडकरमिश्र खमाज/मांड
जो आवडतो सर्वांना पी. सावळाराम वसंत प्रभूलता मंगेशकरमिश्र मांड
डाव मांडून मांडून ना.घ. देशपांडेराम फाटक सुधीर फडकेपहाडी
डोळे हे जुलमी गडे भा.रा. तांबे वसंत प्रभूआशा भोसलेमिश्र मारु बिहाग
तिन्हीसांजा सखे मिळाल्या भा.रा.तांबे हृदयनाथ मंगेशकरलता मंगेशकरमिश्र यमन
तुझ्या गळा माझ्या गळा भा.रा. तांबे वसंत प्रभूसुधीर फडके, आशा भोसलेभीमपलास
त्या चित्तचोरट्याला राजा बढेमधुकर गोळवलकरमाणिक वर्मामिश्र खमाज
त्यांनीच छेडिले गं उमाकांत काणेकर श्रीकांत ठाकरे शोभा गुर्टूमिश्र खमाज
दयाघना सुधीर मोघेहृदयनाथ मंगेशकरसुरेश वाडकरपूर्वी
पूर्वेच्या देवा गंगाधर महांबरेवीणा चिटकोरामदास कामतभूप
प्रेम केले काय हा राजा बढेकुमार गंधर्वकुमार गंधर्वमिश्र पहाडी
प्रेम तुझ्यावर करिते मी रे पी. सावळाराम वसंत प्रभूलता मंगेशकरसिंध भैरवी
प्रेमस्वरूप आई माधव ज्युलियन दत्ता डावजेकर लता मंगेशकरमधमाद सारंग
बाळा जो जो रे (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर वसंत पवारआशा भोसलेयमन
भाग्य उजळले तुझे चरण पाहिले भा.रा. तांबे दशरथ पुजारीमाणिक वर्माभैरवी
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ग.दि. माडगूळकर (गीत रामायण) सुधीर फडकेसुधीर फडकेजोगिया
मधु मागशि माझ्या भा.रा. तांबे वसंत प्रभूलता मंगेशकरभीमपलासी
माझिया प्रियाला उमाकांत काणेकर श्रीकांत ठाकरे शोभा गुर्टूमिश्र हेमंत/पहाडी
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळेहृदयनाथ मंगेशकरपहाडी
रंगरेखा घेऊनी मी मधुकर जोशी दशरथ पुजारीमाणिक वर्माभैरवी
रघुपती राघव गजरी पी. सावळाराम वसंत प्रभूआशा भोसलेमिश्र जोग
राजस सुकुमार तुकाराम श्रीनिवास खळेभीमसेन जोशीशिवरंजनी
रामा हृदयी राम नाही पी. सावळाराम वसंत प्रभूलता मंगेशकरजोगकंस
विकत घेतला श्याम (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडकेसुधीर फडके/आशा भोसलेपहाडी/मांड
विठ्ठल आवडी प्रेमभाव तुकाराम श्रीधर फडकेसुरेश वाडकरमालकंस
विसरशील खास मला ज.के. उपाध्येयशवंत देवआशा भोसलेजोगकंस/मालकंस
शिवशंकर ते आज पाहिले वंदना विटणकरप्रभाकर जोगमाणिक वर्मामिश्र काफी
श्रीरामा घनश्यामा पी. सावळाराम वसंत प्रभूलता मंगेशकरमिश्र [[रागेश्री]
श्रीरामाचे चरण धरावे यशवंत देवयशवंत देवसुमन कल्याणपूरपूरिया धनाश्री
सजल नयन नित धार बरसती शांताराम नांदगावकरअशोक पत्कीअजित कडकडेमिश्र भैरवी
सावर रे सावर रे मंगेश पाडगावकर हृदयनाथ मंगेशकरलता मंगेशकरमिश्र यमन
सावळे सुंदर रूप मनोहर तुकाराम श्रीनिवास खळेभीमसेन जोशीमालकंस
हरवले ते गवसले का पी. सावळाराम वसंत प्रभूलता मंगेशकरपूरिया कल्याण
हृदयी जागा तू अनुरागा पी. सावळाराम वसंत प्रभूलता मंगेशकरपहाडी
हात तुझ्या हातातुन मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळेअरुण दाते, सुधा मल्होत्रा पहाडी
क्षणभर उघड नयन देवा रा.ना. पवार दशरथ पुजारीमाणिक वर्मापूरिया कल्याण

पुस्तके

मराठीत भावगीतांचे संग्रह किंवा भावगीतासंबंधी माहिती असणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • अमोल भावगीते (संग्राहक मनोहर रिसबूड, अनेक भाग, मिनर्व्हा बुक डेपो, सेंट्रल प्रकाशन)
  • गजाननराव वाटवे यांची गाजलेली गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
  • गाणी मनातली.. गळ्यातली... (संपादक - मोरेश्वर पटवर्धन व वामन देशपांडे, साहित्य प्रसार केंद्र प्रकाशन) (१४हून अधिक भाग)
  • गोड गोड भावगीते (संपादक गजानन काशिनाथ रायकर, जयहिंद प्रकाशन)
  • गोष्टी गाण्यांच्या (लेखक प्रमोद रानडे) : या पुस्तकात ५१ मराठी आणि ११ हिंदी गाण्यांच्या जन्मकथा सांगितल्या आहेत.
  • त्या फुलांच्या गंधकोषी.. (मिलिंद रथकंठीवार)
  • नाटकांतील गाणी (संपादक प्र.ग. रायकर, जयहिंद प्रकाशन)
  • नोटेशनसह आवडती गाणी (चंद्रकांत साने)
  • नोटेशनसह भक्तिगीते भाग १, २ (चंद्रकांत साने)
  • नोटेशनसह भावगीते (चंद्रकांत साने)
  • नोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी (चंद्रकांत साने)
  • मनमोहक गीते (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
  • सुलोचना चव्हाण यांनी गायलेली सदाबहार गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
  • स्वरभावयात्रा (विनायक जोशी)



पहा : संगीतातील राग