Jump to content

भालचंद्र वामन केळकर

भालचंद्र वामन केळकर
जन्म नाव भालचंद्र वामन केळकर
जन्मसप्टेंबर २३, इ.स. १९२०
मृत्यूनोव्हेंबर ६, इ.स. १९८७
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन (प्राध्यापकी),
साहित्य,
अभिनय (नाटक)
भाषामराठी
साहित्य प्रकार कथा

प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (जन्म : २३ सप्टेंबर १९२०; - ६ नोव्हेंबर १९८७) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. भालबा केळकरांनी बालनाट्ये आणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.

कारकीर्द

नाट्यक्षेत्रातील कारकीर्द

इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते[]. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले []. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले []. पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली [].

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार/किंमत प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
असा देव, असे भक्तकृष्ण-अर्जुन कथावरदा प्रकाशन
ओळखीच्या म्हणी - कथांच्या खाणीबालसाहित्य
क्रिकेटचा खेळ आणि इतर गोष्टीबालसाहित्यडायमंड पब्लिकेशन्स
गुरूवरचा माणूसबालसाहित्यअनमोल प्रकाशन, पुणे
तलावातील रहस्यबालसाहित्यअनमोल प्रकाशन, पुणे
तो तो नव्हताचबालसाहित्यवरदा प्रकाशन
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधकविज्ञानविषयकडायमंड पब्लिकेशन्स
रंजक विज्ञान - प्रयोगसहलेखक-ग. ना. चिवटेडायमंड पब्लिकेशन्स
लोखंडी राक्षसाचा पराभवबालसाहित्यअनमोल प्रकाशन, पुणे
वाल्मिकी रामायण (सेट)किंमत ३००० रुपयेवरदा प्रकाशन
शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६)अनुवादित कथासरिता प्रकाशन
संपूर्ण महाभारत (भाग १ ते ८)किंमत ६००० रुपयेवरदा प्रकाशन
हवा तसा रंग - हवा तसा आकारप्रसाद प्रकाशन
ही रक्तरेषा कधी पुसली जाईल का?कृपाचार्यांचा पश्चात्तापवरदा प्रकाशन

नाटकांतील भूमिका

भूमिका नाटक
आण्णाजोशी काय बोलतील?
गडीदोन ध्रुवांवर दोघे आपण
गांवकरीतू वेडा कुंभार
गांवकरीबनगरवाडी
घरमालकविझले सारे नंदादीप
दामोदरवेड्याचं घर उन्हात
पवनाकाठचा धोंडीनामा सातपुते
पहारेकरीराजमुकुट
पारशीमोदी ॲन्ड मोदी
बल्लाळप्रेमा तुझा रंग कसा?
ब्राम्हणसती
भुलेश्वरभ्रमाचा भोपळा
मालती; लतिकाभावबंधन
यामिनी; रश्मीलग्नाची बेडी
राणबाजगन्‍नाथाचा रथ
लतिका; मालतीभावबंधन

संदर्भ व नोंदी

  1. ^ "पन्नास वर्षांनंतरही "प्रेमा तुझा रंग कसा'चे रंग अजूनही गहिरेच". 2011-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ नीला सहस्रबुद्धे. "मला आवडलेलं मराठी व्यक्तिमत्व - डॉ. श्रीधर राजगुरू आणि सौ. अनिता राजगुरू". 2013-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ रोहन टिल्लू. "पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ पवार,जयंत. "पाच दशकांची मराठी रंगभूमी". 2010-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)