Jump to content

भालचंद्र नीलकंठ पुरंदरे

डॉ. भालचंद्र नीलकंठ पुरंदरे
जन्म २७ ऑक्टोबर १९११
मृत्यू १० नोव्हेंबर १९९०
निवासस्थानमुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम.बी.बी.एस., एम.डी.
प्रशिक्षणसंस्था रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्स, लंडन
पेशा वैद्यकीय
वडील डॉ.नीलकंठ पुरंदरे
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार


डॉ. भालचंद्र नीलकंठ पुरंदरे (२७ ऑक्टोबर १९११ - १० नोव्हेंबर १९९०) हे भारतीय स्त्रीरोगतज्ज्ञ होते.

सुरुवातीचे आयुष्य

डॉ.पुरंदरे हे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.नीलकंठ पुरंदरे यांचे ज्येष्ठ अपत्य होते. [] डॉ.नीलकंठ पुरंदरे स्त्रीरोगतज्ज्ञ होते आणि त्यांना १९५० च्या दशकात लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टची फेलोशिप मिळाली होती.[]

शिक्षण

डॉ.भालचंद्र पुरंदरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या शेठ जी.एस.वैद्यकीय महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते लंडन आणि एडींबरा येथे गेले. आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे फेलो झाले.[] त्यांचे बंधू डॉ. विठ्ठल पुरंदरेसुद्धा प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ होते.[]

कारकीर्द

डॉ.पुरंदरे 'डॉ. एन.ए. पुरंदरे मेडिकल सेंटर फॉर फॅमिली वेलफेअर अँड रिसर्च, मुंबईचे संचालक होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून १९७३ ते १९७६ पर्यंत काम केले आणि मुंबई स्त्रीरोग आणि गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (एमओजीएस)चे अध्यक्ष म्हणून १९६६ पासून १९६८ पर्यंत काम केले. ते रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टचे निवडून आलेले फेलो होते.

त्यांना पदवीचे आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात रस होता. त्यांच्या वैद्यकीय फेरीमध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या बरोबर असत. डॉ. पुरंदरे त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या पुरंदरे गृह या हॉस्पिटलमध्ये ते काम करत असत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म झाला. त्यातील एक म्हणजे प्रख्यात क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर.

ते नौरोसजी वाडीया मॅटर्निटी हॉस्पिटलचे संशोधक संचालक, डीन होते आणि नंतर प्रोफेसर इमेरीटस झाले. येथे काम करताना त्यांनी त्यांच्या अनेक शस्त्रक्रियांच्या पद्धतींचा आणि त्यातील बदलांचा वापर केला. ते मुंबई विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाचे डीन होते. तसेच ते भारत सरकारच्या आरोग्य विभागामध्ये माता आरोग्य या विषयाचे मानद सल्लागार होते.[]

भारतातील बेकायदेशीर गर्भपातांच्या घटनांमध्ये होणाऱ्या माता मृत्यूंच्या जास्त प्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने शांतीलाल शहांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचे डॉ.पुरंदरे सदस्य होते. या समितीच्या अभ्यासातूनच पुढे भारतात वैद्यकीय गर्भपात कायदा बनवण्यात आला. ते भारतीय विज्ञान अकादमीचे संस्थापक फेलो होते. []

डॉ. पुरंदरे यांच्या स्मृत्यर्थ लोणावळ्यातील आर्ट्स कॉलेज आणि हायस्कूलला त्यांचे नाव देण्यात आले आहे.[] तसेच यांच्या स्मृत्यर्थ डॉ.बी.एन.पुरंदरे अतुलनीय सेवा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या मानकऱ्यामध्ये डॉ.राणी बंग यांचा समावेश आहे.  []  

 

पुरस्कार

भारत सरकारने १९७२ साली डॉ. पुरंदरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार दिला.[]

मृत्यू

१० नोव्हेंबर १९८० रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी पुरंदरे यांचा मृत्यू झाला.

पुस्तके

डॉ. पुरंदरे यांनी मराठीमध्ये 'शल्यकौशल्य' (अश्वमेध प्रकाशन, १९८३) हे आत्मचरित्र लिहिले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b Suryanarayan, Deepa (2009-12-09). "This doctor carries ahead his family's tradition". DNA India (इंग्रजी भाषेत). 2020-08-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d Purandare, C. N.; Patel, M.; Balsarkar Geetha (2012-2). "Indian Contribution to Obstetrics and Gynaecology". Journal of Obstetrics and Gynaecology of India. 62 (1): 3–4. doi:10.1007/s13224-012-0159-3. ISSN 0971-9202. PMC 3366575. PMID 23372282. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Purandare, C. N.; Patel, M. A.; Balsarkar, G. D. (2013-8). "Indian Contribution to Obstetrics and Gynaecology". Journal of Obstetrics and Gynaecology of India. 63 (4): 216–217. doi:10.1007/s13224-013-0464-5. ISSN 0971-9202. PMC 3763051. PMID 24431644. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "Dr.B.N. Purandare Arts,Smt.S.G.Gupta Commerce and Smt.Shardaben Amrutlal Mithaiwala Science College". bcud.unipune.ac.in. 2020-08-04 रोजी पाहिले.
  5. ^ "BIO DATA OF DR. RANI BANG" (PDF). ०२ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Datta, Amaresh (1987). Encyclopaedia of Indian Literature: A-Devo (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. ISBN 978-81-260-1803-1.