भालचंद्र कोल्हटकर
भालचंद्र कोल्हटकर (१९३६ - २० मार्च. २०१९) हे डोंबिवलीत राहणारे एक नाट्यकर्मी होते. शालेय वयापासूनच ते रंगमंचावर छोटीमोठी कामे करीत. तरुण वयात ते डोंबिवलीतील गुरुदत्त मित्र मंडळ या युवा रंगकर्मींच्या संस्थेत दाखल झाले. खासगी कार्यालयात नोकरी करत असल्याने त्यांना व्यावसायिक नाटकांत कामे करता आली नाहीत, म्हणून त्यांनी त्यांचा अभिनय प्रायोगिक रंगभूमीपर्यंतच सीमित ठेवला. नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी इतर नाटकांतूनही कामे केली.
कोल्हटकर हे डोंबिवली शहरातील अनेक संस्थांचे मार्गदर्शक व सल्लागार होते.
कोल्हटकर हे हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे वडील होत.
भालचंद्र कोल्हटकरांची भूमिका असलेली प्रायोजिक नाटके
- अर्ध्याच्या शोधात दोन
- सहलीला सावली आली