Jump to content

भालचंद्र कदम

भाऊ कदम
जन्मभालचंद्र पांडुरंग कदम
१२ जून, १९७२ (1972-06-12) (वय: ५२)
ठाणे, महाराष्ट्र
इतर नावे भाऊ कदम
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, विनोद
कारकीर्दीचा काळ १९९१ पासून
भाषा मराठी
प्रमुख नाटके करून गेलो गाव
प्रमुख चित्रपट टाइमपास
प्रमुख टीव्ही कार्यक्रमचला हवा येऊ द्या
वडील पांडुरंग कदम
पत्नी ममता भालचंद्र​ कदम
अपत्ये ४ मुले – मृण्मयी, संचिता, समृद्धी आणि आराध्य

भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम (जन्म:१२ जून, १९७२) हे मराठी चित्रपट अभिनेते, नाट्य अभिनेते आणि दूरचित्रवाहिनी अभिनेते आहेत. कदम हे विशेष करून आपल्या विनोदी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः भाऊ कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. इ.स. १९९१ मध्ये त्यांनी एका मराठी नाटकात प्रथम काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. फू बाई फूच्या भूमिकांबद्दल ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० ​​हून अधिक नाटकांच्या प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे. झी मराठी या वाहिनी वरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमात देखील त्यांनी आपल्या अभिनयाची चांगली छाप पाडली.

सुरुवातीचे जीवन

भाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ घर खर्चासाठी मतदार नावनोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली.

कारकीर्द

पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना 'जाऊ तिथे खाऊ' या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.

भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव 'फू बाई फू'साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी 'फू बाई फू'ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. 'फू बाई फू'च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.

दूरचित्रवाणी

दूरचित्रवाणीच्या झी मराठी वाहिनीवर झालेल्या ‘फू बाई फू’ नावाच्या मराठी स्टॅंडअप विनोदी कार्यक्रमातील आपल्या स्किट्ससाठी ते प्रसिद्ध आहेत. चला हवा येऊ द्या या झी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या एका विनोदी कार्यक्रमात त्यांनी निलेश साबळे यांच्याबरोबर मुख्य भूमिका देखील बजावली आहे. या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्र भूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत भाऊ आपल्या अचूक टाइमिंगसाठी अद्वितीय आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील भोळेभाबडे हावभाव हे त्यांचे वेगळेपण आहे. या कार्यक्रमाने ६०० यशस्वी एपिसोड पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये भाऊ या कल्पित विनोदवीराने अभिनय केला आहे. आनुवंशिक विनोद करताना त्यांच्या निरागसतेने लाखो मराठी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी तुझं माझं जमेना नावाच्या एका कार्यक्रमामध्ये काम केले आणि आपल्या स्किटचे सादरीकरण जवळजवळ प्रत्येक झी मराठी पुरस्कार सोहळ्यात केले आहे.

चित्रपट

भालचंद्र कदमांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात टाइमपास ३, टाइमपास २, टाइमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी एक हिंदी चित्रपट फरारी की सवारी मध्ये देखील अभिनय केला आहे.

नाटक

कदम यांनी मराठी नाटकांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. शांतेचा कार्ट चालू आहे, यदा कदाचित, चार्ली, करुण गेला गाव ही त्यापैकी काही महत्त्वाची नाटके आहेत.[]

अभिनय सूची

चित्रपट सूची

वर्षशीर्षकभाषाभूमिकासंदर्भ
२०१७युंतुंमराठी
झाला बोभाटामराठी[][][][]
रंजनमराठी[]
२०१६हाफ तिकीटमराठी
जाऊंद्या ना बाळासाहेबमराठी
२०१५वाजलाच पाहिजे - गेम की शिनमामराठीभाऊ कामदार
टाइम बरा वाईटमराठीऑटो  वाला
टाइमपास २मराठीशांताराम परब
२०१४मिस  मॅचमराठीभाऊ
सांगतो ऐकामराठी खराडे
पुणे विरुद्ध बिहारमराठी
आम्ही  बोलतो  मराठीमराठी
बाळकडूमराठी
टाइमपासमराठीदगडूचे  वडील - आप्पा
२०१३नारबाची वाडीमराठीडॉ. डिसोझा
चांदीमराठी
एक कटिंग चायमराठी
कोकणस्थमराठी
२०१२फरारी की  सवारीहिंदीशामशु  भाई
कुटुंबमराठीभाऊ
गोळा बेरीजमराठी
२०११फक्त लढ म्हणामराठी
मस्त चाललंय आमचंमराठीपोलीस हवालदार
२०१०हरिश्चंद्राची फॅक्टरीमराठी
२००५डोंबिवली फास्टमराठीपोलीस हवालदार

संदर्भ