भारतीय समुद्र किनारा
भारतीय समुद्र किनाऱ्याला पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.भारतीय समुद्रकिनारा हा ७५१६.६ कि.मी.असून भारताच्या तीनही बाजूंनी वेढलेला आहे. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल हे राज्य तर अंदमान-निकोबार, दिव-दमण आणि लक्ष्यद्वीप हे केंद्रशासित प्रदेश किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत. तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि आग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते. वरीलपैकी गुजरात या राज्यास सर्वात जास्त(१६०० कि.मी.) समुद्रकिनारा लाभलेला आहे.