भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)
श्रीअरविंद लिखित 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' [१] या ग्रंथाचा मराठी अनुवाद 'भारतीय संस्कृतीचा पाया' या नावाने प्रकाशित करण्यात आलेला आहे. या विषयावरील लेख आधी 'आर्य' मासिकात १५ डिसेंबर १९१८ ते १५ जानेवारी १९२१ या कालावधीत सदर रूपाने प्रकाशित करण्यात आले होते. नंतर श्रीअरविंद यांनी त्यावर परिष्करण केले आणि मग सुधारित आवृत्ती 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' या नावाने १९५३ साली न्यू यॉर्क येथे प्रकाशित करण्यात आली. त्याची भारतीय आवृत्ती १९५९ साली प्रकाशित झाली. [१] सेनापती पां.म.बापट यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे.
ग्रंथाची मांडणी
भारतीय संस्कृतीचा पाया | |
लेखक | श्रीअरविंद |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | The Foundations of Indian Culture |
अनुवादक | सेनापती पां. म. बापट |
भाषा | इंग्रजी - मराठी |
साहित्य प्रकार | वैचारिक लेख |
प्रकाशन संस्था | श्रीअरविंद आश्रम, प्रकाशन विभाग, पॉण्डिचेरी |
प्रथमावृत्ती | १९७१ |
चालू आवृत्ती | २००२ |
पृष्ठसंख्या | ३९९ |
आय.एस.बी.एन. | 81-7058-102-8 |
या ग्रंथामध्ये खालील विभाग आहेत.
०१) वादाचा प्रश्न: भारत सुधारणासंपन्न अर्थात विचारसंपन्न आहे का?
विल्यम आर्चर या लेखकाने बुद्धिवादी दृष्टिकोन घेऊन, भारतीय संस्कृतीवर टीका केली होती. ती टीका खोडून काढण्यासाठी सर जॉन वूड्रॉफ याने एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने भारतीय संस्कृती ही संस्कृतींच्या अटळ संघर्षात टिकून राहण्यासारखी आहे का, हा प्रश्न उपस्थित केला होता. या विभागामध्ये एकंदर तीन प्रकरणे आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणामध्ये श्रीअरविंद यांनी जॉन वूड्रॉफने आपल्या पुस्तकात जे लिहिले होते, त्याचा गोषवारा दिला आहे. तो गोषवारा विषयप्रवेश करण्यासाठी उपयुक्त ठरतो. [१]
०२) भारतीय संस्कृतीचा एक बुद्धिवादी टीकाकार
या विभागामध्ये एकंदर सहा प्रकरणे आहेत. श्रीअरविंद यांनी पहिल्या प्रकरणात, विल्यम आर्चर या लेखकाचा दृष्टिकोन लक्षात का घ्यावासा वाटला याचे स्पष्टीकरण केले आहे.
०३) भारतीय संस्कृतीचे समर्थन
या विभागामध्ये पुढील उपविभाग आहेत.
- धर्म आणि आध्यात्मिकता - या विभागामध्ये एकंदर पाच प्रकरणे आहेत.
- भारतीय कला - या विभागामध्ये एकंदर चार प्रकरणे आहेत.
- भारतीय साहित्य - या विभागामध्ये एकंदर पाच प्रकरणे आहेत. यामध्ये अनुक्रमे वेद, उपनिषदे, रामायण आणि महाभारत, अभिजात युग, पुराणे आणि प्रादेशिक साहित्य अशी प्रकरणे आहेत.
- भारतीय राज्यकारभार - या विभागामध्ये एकंदर चार प्रकरणे आहेत.
०४) पुरवणी
- भारतीय संस्कृती आणि परकीयांचा प्रभाव