Jump to content

भारतीय विज्ञान संस्था

भारतीय विज्ञान संस्थेची मुख्य इमारत

भारतीय विज्ञान संस्था (इंग्लिश: Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच doctoral [मराठी शब्द सुचवा] कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये आंतरिक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.

इतिहास

भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.

काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी आणि संस्थेशी निगडित असणाऱ्या व्यक्ती

बाह्य दुवे