भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी
नाव | कार्यकाळ | विशेष बाब |
---|---|---|
सर ओस्बॉर्न स्मिथ | ०१-०४-१९३५ ते ३०-०६-१९३७ | रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर एकाही नोटेवर सही नाही |
सर जेम्स ब्रेड टेलर | ०१-०७-१९३७ ते १७-०२-१९४३ | रिझर्व बँकेच्या नोटांवर सही करणारे पहिले अधिकारी |
सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख | ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ | रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर |
सर बेनेगल रामा राव | ०१-०७-१९४९ ते १४-०१-१९५७ | गव्हर्नर पदावर सगळ्यात जास्त काळ कार्यरत |
के. जी. आंबेगावकर | १४-०१-१९५७ ते २८-०२-१९५७ | रिझर्व बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत, कार्यकाळ ४५ दिवस एकाही नोटवर स्वाक्षरी नाही |
एच .व्ही. आर. अय्यंगार | ०१-०३-१९५७ ते २८-०२-१९६२ | यांच्या काळात नाण्यांची दशमान पद्धत सुरू झाली |
पी. सी. भट्टाचार्य | ०१-०३-१९६२ ते ३०-०६-१९६७ | यांच्या काळात ॲग्रिकल्चरल री-फायनान्स कॉर्पोरेशन (१९६३), आय.डी.बी.आय (१९६४), यु.टी.आय. (१९६४) वगैरेंची स्थापना झाली |
एल. के. झा | ०१-०७-१९६७ ते ३०-०५-१९७० | म. गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त दोन, पाच दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा निघाल्या |
भास्कर एन. आडारकर | ०४-०५-१९७० ते १५-०६-१९७० | रिझर्व बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत, कार्यकाळ ४२ दिवस केवळ म. गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त निघालेल्या नोटांवरच स्वाक्षरी आहे |
एस. जगन्नाथन | १६-०६-१९७० ते १९-०५-१९७५ | आधी वर्ल्ड बँकेचे डायरेक्टर, नंतर आय.एम.एफ.चे डायरेक्टर |
एन. सी. सेन गुप्ता | १९-०५-१९७५ ते १९-०८-१९७५ | रिझर्व्ह बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत |
के. आर. पुरी | २०-०८-१९७५ ते ०२-०५-१९७७ | आधी एल.आय.सी. चेरमन आणि नंतर एम. डी. होते |
एम. नरसिंहम् | ०२-०५-१९७७ ते ३०-११-१९७७ | पहिले आणि एकमेव पदोन्नतीने गव्हर्नर म्हणून नेमले गेले |
डॉ. आय. जी. पटेल | ०१-१२-१९७७ ते १५-०९-१९८२ | रु. १,०००/-, रु. ५,०००/- आणि रु. १०,०००/-च्या चलनातील नोटा बंद झाल्या. |
डॉ. मनमोहनसिंग | १६-०९-१९८२ ते १४-०१-१९८५ | वित्त सचिव, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अर्थ खात्याचे मंत्री आणि देशाचे पंतप्रधान अशा पदांवर काम करणारे गव्हर्नर |
अमिताभ घोष | १५-०१-१९८५ ते ०४-०२-१९८५ | सगळ्यात कमी कालावधीसाठी गव्हर्नर, कार्यकाळ २० दिवस |
रा. ना. मल्होत्रा | ०४-०२-१९८५ ते २२-१२-१९९० | रु. ५००/-च्या नोटा निघाल्या |
एस. व्यंकिटरामनन | २२-१२-१९९० ते २२-१२-१९९२ | रुपयाचे अवमूल्यन झाले |
डॉ. सी. रंगराजन | २२-१२-१९९२ ते २१-१२-१९९७ | गव्हर्नर पदाच्या कार्यकाळानंतर आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले |
डॉ. बिमल जालान | २२-११-१९९७ ते ०६-०९-२००३ | मुक्त अर्थ व्यवस्थेला वेग आला |
डॉ. वाय. वेणुगोपाल रेड्डी | ०६-०९-२००३ ते ०५-०९-२००८ | लेखक म्हणूनही प्रसिद्ध |
डॉ. डी. सुब्बाराव | ०६-०९-२००८ ते ०३-०९-२०१३ | |
रघुराम राजन लवकर राजीनामा. | ०३-०९-२०१३ ते ०३-०९-२०१६ | |
उर्जीत पटेल | ०३-०९-२०१६ ते १०-१२-२०१८ | भारतातील १००० व ५०० च्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण |
शक्तिकांत दास | १२-१२-२०१८ ते वर्तमान |
बाह्य दुवे
- रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरील गव्हर्नरांच्या माहितीचे पान Archived 2015-03-17 at the Wayback Machine.