भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकार पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो. भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.
स्वरूप
ही दिनदर्शिका सौर दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात ग्रेगोरियन कॅलेंडरमधील २२ मार्च या दिवशी होते तर भारतीय सौर दिनदर्शिके नुसार १ चैत्र रोजी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. हिंदू कालगणनेतील महिन्यांची चैत्र-वैशाख आदी नावे या राष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही. ही कालगणना कशासाठी? भारतामध्ये ऋतुचक्र ही फार महत्त्वाची बाब आहे आणि ऋतुचक्र चंद्रावर अवलंबून नसून सूर्यावर अवलंबून आहे. भारताचे पहिले पंतप्रधान . जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने तत्कालीन मान्यवर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखालील कालगणनापुनर्रचना समितीने इ. स. १९५६पासून सौर कालगणना बनवून इ. स. १९५७पासून प्रसारात आणली. आकाशवाणी, दूरदर्शन, शासकीय पत्रव्यवहार इ. ठिकाणी या कालगणनेनुसार तारखेचा उल्लेख केला जातो. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी,मराठी विज्ञान परिषद आणि अन्य काही संस्थांद्वारा गेली काही वर्षे ही राष्ट्रीय सौर दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे . सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर-संबंधावर आधारित असणारी ही सौर कालगणना, चांद्र कालगणनेपेक्षा ऋतु-चक्राला अधिक जवळची आहे. चांद्रमासाचा कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा आहे. त्याला १२ महिन्यांनी गुणल्यास वर्षाचे सुमारे ३५४ दिवस होतात व ३६५ दिवसांच्या सौर वर्षापेक्षा चांद्रवर्ष हे सुमारे १०-११ दिवसांनी कमी पडते. चांद्र आणि सौर कालगणनेतील हा १०-११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी भारतीय पंचांगकर्त्यांनी अधिक मास आणि क्षयमास यांची योजना केली. त्यामुळे भारतीय पंचांगात महिने हे चांद्र कालगणनेनुसार पण एकूण वर्ष हे मात्र सौर कालगणनेनुसार असे असते. म्हणजे भारतीय पंचांगात चांद्र कालगणनासुद्धा सौर कालगणनेशी स्वतःला जुळवून घेते. चांद्रवर्षातील अधिक मास आणि क्षयमास याचा संबंध सूर्याच्या राशिसंक्रमणाशी आहे. सूर्याचे राशिसंक्रमण आणि चांद्रमास बदल एकाच समान दिवशी होत नाही. त्यामुळे सौर आणि चांद्र कालगणना एकमेकांशी जुळवून घेताना या युक्त्या कराव्या लागतात. एखाद्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण झालेच नाही तर त्या महिन्याला अधिकमास म्हणतात. साधारणत: १९ वर्षांचे हे चक्र असते, आणि १९ वर्षांत ७ वेळा अधिक मास येतो. एखाद्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण दोन वेळा झाले तर एका मासाचा क्षय होतो. क्षयमास ही क्वचितच घडणारी घटना आहे. १८२३, १९६३, १९८३ मध्ये मास-लोप (क्षय) झाला होता. पुढला मासक्षय २१२४ मध्ये आहे. भारतीय पंचांगात अधिकमास, क्षयमास, तिथिक्षय, तिथिवृद्धी इ. संकल्पना वापरून चांद्र- सूर्य कालगणनांची जुळणी केली नसती तर केंव्हातरी होळीचा सण पावसाळ्यात साजरा करण्याची पाळी आली असती.
सूर्यावर अवलंबून असणारे ऋतुचक्र भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याच्याशी जुळणारी कालगणना ही अधिक उचित कालगणना मानली पाहिजे. भारतामध्ये बहुतेक सर्वच आणि धार्मिक कृत्ये चांद्रतिथीवर आधारित असली तरी ऋतु-चक्राशी जवळचा संबंध असणारी सौर कालगणना ही शास्त्रीय-दृष्ट्या अधिक योग्य आहे.
ग्रेगोरियन कालगणना (इंग्रजी किंवा ख्रिस्ती कालगणना) ही सुद्धा सौर कालगणना असली तरी त्यातील अनेक गोष्टी नैसर्गिक घटनांशी जुळत नाहीत. भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका मात्र खगोलीय घटनांशी जुळणारी आहे. त्यामुळे तिच्यातील भारतीय सांस्कृतिक संदर्भ सोडल्यास जागतिक स्तरावर वापर करण्यासाठी सुद्धा ती योग्य कालगणना आहे.[१]
भारतीय सौर कालगणनेची शास्त्रीयता
१) भारतीय चांद्र कालगणनेप्रमाणे या भारतीय सौर कालगणनेत सुद्धा महिन्यांची नावे चैत्र, वैशाख हीच आहेत.भारतीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र (२२ मार्च) या दिवशी असतो. त्यालाच 'वसंतसंपात दिन' असे म्हणतात.
सूर्य दररोज सरासरी १० अंश पूर्वेकडे सरकतो आणि वर्षभरात आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा सूर्याचा पृथ्वीभोवतीचा भासमान मार्ग. यालाच आयनिक वृत्त असे म्हणतात.. पृथ्वीवरचे विषुववृत्त वाढवून आकाशात घेतल्यास जे वर्तुळ तयार होते त्याला आकाशातील वैषुविक वृत्त असे म्हणतात. आयनिक वृत्त आणि वैषुविक वृत्त ही दोन वर्तुळे जिथे एकमेकांना छेदतात. त्यातील एका बिंदूला वसंत -संपात आणि एकाला शरद् संपात असे म्हणतात.
सौर दिनांक १ चैत्र (२२ मार्च) या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो.सौर दिनांक १ आषाढ (२२ जूनला) तो उत्तरतम अंतरावर येतो.त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन (सूर्याची दक्षिणेकडे वाटचाल)सुरू होते.सौर दि. १ आश्विन (२३ सप्टेंबर) रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर दि.१ पौष (२२ डिसेंबर) यादिवशी तो दक्षिणतम अंतरावर येऊन नंतर पुनः त्याची उत्तरेकडे वाटचाल (उत्तरायण) सुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्त्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या भारतीय सौर कालगणनेत निश्चित केला आहे.सूर्याचा वसंत संपात बिंदूमधील प्रवेश झाल्यावर ६ ऋतूंचे चक्र संपून पुनः सूर्याने त्या बिंदूत प्रवेश करणे याला बरोबर ३६५ दिवस न लागता ०.२४२१६४ (५ तास, ४८ मिनिटे ४५.६ सेकंद) इतका जास्त वेळ लागतो.दर ४ वर्षांनी एक लीप वर्ष घेऊन (त्यावर्षामध्ये ३६५ ऐवजी ३६६ दिवस घेऊन) ही त्रुटी भरून काढली जाते.
२) भारतीय सौर कालगणनेतील प्रत्येक महिना सुद्धा सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जुळणारा आहे. सूर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहून त्यानुसार या सौर कालगणनेत महिन्याचे ३० अथवा ३१ दिवस निश्चित केले आहेत. त्यानुसार रास आणि सौर मास हे पुढील प्रमाणे जुळतात. मेष-चैत्र, वृषभ- वैशाख, मिथुन-ज्येष्ठ, कर्क-आषाढ,सिंह- श्रावण, कन्या-भाद्रपद, तूळ- आश्विन, वृश्चिेक-कार्तिक, धनु-अग्रहायण, मकर- पौष, कुंभ-माघ, मीन-फाल्गुन.
सूर्याचा मकरराशीत प्रवेश म्हणजेच मकरसंक्रांत अथवा उत्तरायणाचा प्रारंभ ग्रेगोरियन कालगणनेनुसार २२ डिसेंबर रोजी होतो.
धार्मिक कार्यासाठी निरयन चांद्रमासयुक्त गणना वापरावी असे समितीने सुचवले आहे कारण धार्मिक विधींमध्ये नक्षत्रांना महत्त्व आहे आणि ती ती नक्षत्रे त्या त्या वेळी प्रत्यक्ष असण्याच्या दृष्टीने निरयन पंचांग उपयुक्त असते.वर्ष मात्र आयनिक किंवा सांपातिक घ्यावे. . आयनिक वर्षापेक्षा नक्षत्र सौर वर्ष सुमारे २१ मिनिटांनी जास्त मोठे आहे. नाक्षत्र वर्ष = एखादी तारका आकाशमध्यावर आल्यावर दुसऱ्या वर्षी पुनः तेथेच येण्याचा काळ. नाक्षत्र वर्ष थोडे मोठे असल्यामुळे आणि राशी या नक्षत्राशी संबद्ध असल्यामुळे सूर्याचे राशिसंक्रमण दरवर्षी थोडे थोडे उशिरा होते. मकरसंक्रांत पूर्वी २२ डिसेंबरला येत होती ती आता १४ जानेवारीला येते. कालांतराने ती आणखी पुढे पुढे जात राहील. दर १५७ वर्षांनी एक दिवस पुढे अशा रीतीने १४ जानेवारीला येत आहे. पुढे काही वर्षांनी संक्रात उन्हाळ्यात येऊ लागून विचित्र परिस्थिती ओढवेल. भारतीय सौर कालगणनेनुसार (सांपातिक सौर कालगणनेनुसार) मकरसंक्रांत दरवर्षी १ पौषला मानावी. कालमापनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वर्ष आणि महिना. परंतु या दोन्हींचा प्रारंभ केव्हा करायचा यासंबंधी वेगवेगळ्या धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळा विचार केला आहे. इंग्रजी आणि ग्रेगोरियन कालगणनेत १ जानेवारी हा वर्षारंभ तर विक्रमसंवत्चा वर्षारंभ दिवाळीतील पाडव्याला आणि शालिवाहन शकानुसार मार्च महिन्यातील गुढी पाडव्याला.या भारतीय सौर कालगणनेनुसार ऋतु आणि महिने यांची सांगड पुढील प्रमाणे असेल.
वसंत - सौर फाल्गुन + सौर चैत्र
ग्रीष्म- सौर वैशाख + सौर ज्येष्ठ
वर्षा - सौर आषाढ + सौर श्रावण
शरद् - सौर भाद्रपद + सौर आश्विन
हेमंत- सौर कार्तिक + सौर अग्रहायण (मार्गशीर्ष)
शिशिर - सौर पौष + सौर माघ[२]
कालगणना प्रणाली
विक्रम संवत ही एक प्राचीन हिंदू जनगणना प्रणाली आहे जी भारतीय उपखंडात प्रचलित आहे. हे भारताचे सांस्कृतिकदृष्ट्या अधिकृत पंचांग आहे. भारतात हे अनेक राज्यांमध्ये एक पारंपारिक पंचांग आहे. त्यामध्ये चंद्र महिना आणि सौर सादरीकरणाची वर्षे वापरली जातात. हा सम्राट विक्रमादित्यचा प्रवर्तक असल्याचे मानले जाते. काही आरंभिक शिलालेखांमध्ये ही वर्षे 'कृत' नावाने आली आहेत. आठव्या आणि आठव्या शतकापासून विक्रम संवतला अनन्यपणे नाव मिळाले. संस्कृत ज्योतिष शास्त्रीय ग्रंथांमध्ये, सामान्यत: फक्त "संवत" या नावाने ते शक संवतमधील फरक दर्शविण्यासाठी वापरले जातात.
हा युग ५७ ईसापूर्व आहे सुरू होते (विक्रमी संवत = AD सन + ५७). या युगाची सुरुवात गुजरातमधील कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि उत्तर भारतातील चैत्र कृष्ण प्रतिपदापासून असल्याचे समजते. वर्ष महिने आणि सात दिवस आठवडा ठेवण्याची प्रथा विक्रम संवतपासूनच सुरू झाली. महिन्याचा हिशेब सूर्य आणि चंद्राच्या वेगाने ठेवला जातो. ही बारा राशी चिन्ह बारा सौर महिने आहेत. ज्या दिवशी सूर्य राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांती होते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव महिन्याला ठेवले जाते. चंद्र वर्ष ११ दिवस ३ दरी ४ क्षण सौर वर्षापेक्षा लहान आहे, म्हणून दर ३ वर्षांनी त्यात १महिना जोडला जातो.
ज्या दिवशी नवीन युग सुरू होईल त्या दिवशी वर्षाचा राजा दिवसाच्या युद्धानुसार निश्चित केला जातो. उदाहरणार्थ, १८-मार्च-२०१८ हा विक्रम संवत २०७५चा पहिला दिवस होता. रविवारी, १८ मार्च रोजी सूर्य वर्षाचा राजा असेल.
- मूळ: -
'विक्रम संवत'च्या उत्पत्ती आणि वापरासंदर्भात अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असा विश्वास आहे की 'विक्रमादित्य' नावाच्या राजाने इ.स.पू. ५७ मध्ये याची सुरुवात केली होती. काही लोकांचा असा विश्वास आहे की ते AD ७८मध्ये सुरू होईल आणि काही ५४४AD मध्ये.
'कालिताऊ दिमन' या पर्शियन ग्रंथात पंचतंत्रातील एका श्लोकाचा उल्लेख 'शशिदीवाक्योरोग्राहापीदानमांश' असा आहे. विद्वानांनी सामान्यतः 'कृत संवत्' हा 'विक्रम संवत्'चा पूर्ववर्ती मानला आहे. तथापि, 'कृत' या शब्दाचा उपयोग समाधानकारकपणे करता आला नाही. काही शिलालेखांमध्ये नरवरमाच्या मंदसौर शिलालेखाप्रमाणे मावळ-गण कालाचा उल्लेख आहे. पूर्व आणि राजस्थानमधील पश्चिमेकडील मालवा या दोन्ही ठिकाणी वापरल्या गेल्याने 'कृत' आणि 'मालव' संवत एकच आहेत असे म्हणतात. क्रिटची २२२ आणि २५ वर्षे आहेत, परंतु मालवा युगातील कितीतरी प्राचीन शिलालेख नाहीत. हे देखील शक्य आहे की कृता हे नाव जुने आहे आणि जेव्हा मालवांनी ते स्वीकारले तेव्हा ते 'मालव-गन्नमत' किंवा 'मालव गण-स्थिती' म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु असे म्हणले जाऊ शकते की जर 'कृता' आणि 'मालव' दोघांनी नंतरच्या विक्रम संवतकडे लक्ष दिले तर ते दोघे एकाच वेळी सुमारे शंभर वर्षे वापरत राहिले, कारण आपल्याकडे ८०८०वर्षे आहेत आणि ४६१ मालाव वर्षे प्राप्त झाली.
- महिने_के_नाव: -
महिन्यांची नावे ---- पौर्णिमेच्या दिवशी नक्षत्र १) चैत्र ---- चित्रा, स्वाती २) वैशाख ---- विशाखा, अनुराधा 3) ज्येष्ठ ---- सर्वात मोठा, मूळ )) आषाढ़ ---- पूर्वाषाढ, उत्तराधाड, सातभिक्षा 5) श्रावण ---- श्रावण, धनिष्ठा )) भाद्रपद ---- पूर्वाभद्र, उत्तराभद्र 7) अश्विन ---- अश्विन, रेवती, भरणी 8) कार्तिक ---- कृतिका बड़ी, रोहिणी 9) मार्गशीर्ष ---- मृगशीरा, उत्तरा 10) पौष ---- पुनवर्सु, पुष्य 11) माघा ---- मघा, आश्लेषा 12) फाल्गुन ---- पूर्वा फाल्गुन, उत्तर फाल्गुन, हस्त
प्रत्येक महिन्यात दोन बाजू असतात, ज्याला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष म्हणतात.
दिनदर्शिकेतील महिने
महिना | महिन्याचे दिवस | आरंभाची तारीख | |
---|---|---|---|
१ | चैत्र | ३०/३१ | २२ मार्च/२१ मार्च |
२ | वैशाख | ३१ | २१ एप्रिल |
३ | ज्येष्ठ | ३१ | २२ मे |
४ | आषाढ | ३१ | २२ जून |
५ | श्रावण | ३१ | २३ जुलै |
६ | भाद्रपद | ३१ | २३ आॅगस्ट |
७ | आश्विन | ३० | २३ सप्टेंबर |
८ | कार्तिक | ३० | २३ आॅक्टोबर |
९ | अग्रहायण | ३० | २२ नोव्हेंबर |
१० | पौष | ३० | २२ डिसेंबर |
११ | माघ | ३० | २१ जानेवारी |
१२ | फाल्गुन | ३० | २० फेब्रुवारी |
या दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक
शालिवाहन शकाच्या आकड्यामध्ये ७८ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो. इसवी सनाप्रमाणे लीप इयर असेल तर भारताच्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेत चैत्र माहिन्याचे ३१ दिवस असतात (अन्यथा ३०), आणि महिन्याची सुरुवात २१ मार्चला (अन्यथा २२ मार्चला) होते. क्रांतिवृत्तात (?) सूर्याची गती हळू असल्याने, वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.
या राष्ट्रीय पंचांगाची सुरुवात अधिकृतपणे १ चैत्र,शके १८७९ रोजी म्हणजे २२ मार्च, १९५७पासून झाली. परंतु भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.
बालीमधील हिंदू नेपी (इं.-Nyepi) हा नववर्ष दिवस या दिनदर्षिकेनुसार साजरा करतात.