Jump to content

भारतीय रातवा

भारतीय रातवा
शास्त्रीय नाव Caprimulgus asiaticus asiaticus
कुळ रात्रिंचराद्य (Caprimulgidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Indian Nightjar
संस्कृत लघु नप्तृका
हिंदी छपका

चित्रदालन

वर्णन

तपकिरी-करडा-बदामी रंगाचा त्यावर तुटक रेषा आणि ठिपके असलेला भारतीय रातवा साधारण २४ सें. मी. आकाराचा निशाचर पक्षी आहे. हा उडतांना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात. निशाचर असल्याने हे दिवसा एखाद्या झुडपाच्या आडोशाने लपून राहतात, अंधार पडल्यावर सर्वत्र यांचे आवाज ऐकू येतात.

आवाज

Indian Nightjar.ogg भारतीय रातवाचा आवाज ऐका

वास्तव्य/आढळस्थान

झुडपी जंगले, शेतीचे प्रदेश, गावाच्या जवळील मोकळ्या प्रदेशात वास्तव्य असलेला भारतीय रातवा संपूर्ण भारतभर निवासी आणि स्थानिक स्थालांतर करणारा आहे. भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशातही आढळतो. श्रीलंकेतील Caprimulgus asiaticus eidos ही भारतीय रातवाची उपजात किंचीत लहान आहे.

खाद्य

लहान-मोठे कीटक हे भारतीय रातवा पक्ष्यांचे खाद्य आहे.

प्रजनन काळ

फेब्रुवारी ते सप्टेंबर हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ आहे. हे पक्षी घरटे बांधत नाहीत. मादी जमिनीवरच १ किंवा २ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी किंवा जांभळे ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन नर-मादी मिळून करतात.