भारतीय महिला लीग
भारतीय महिला लीग, हिरो मोटोकॉर्प सोबतच्या प्रायोजकत्व संबंधांमुळे हिरो इंडियन वुमेन्स लीग म्हणून देखील ओळखली जाते. ही भारतीय फुटबॉलमधील महिलांची उच्चस्तरीय व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. ह्याची स्थापना 2016 मध्ये झाली. या लीगमध्ये सध्या देशभरातील एकूण 16 संघ सहभागी होत आहेत.
ह्या स्पर्धेचे 2014 पासून नियोजन चालू होते आणि 2016 मध्ये तिची स्थापन झाली. हिचा पहिला हंगाम ऑक्टोबर 2016 पासून कटक येथे सुरू झाला. [१] भारताच्या राष्ट्रीय संघासाठी खेळाडूंची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने महिलांसाठी भारतातील पहिली व्यावसायिक फुटबॉल लीग म्हणून ही लीग सुरू करण्यात आली. 2019-20 पासून, जे क्लब चॅम्पियन बनले आहेत त्यांना AFC महिला क्लब चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी दिली जाते. ही आशियातील सर्वोच्च महिला क्लब फुटबॉल स्पर्धा आहे.
आतापर्यंत ईस्टर्न स्पोर्टिंग युनियन, रायझिंग स्टुडंट्स क्लब, सेतू आणि गोकुलम केरळ हे चार क्लब चॅम्पियन बनले आहेत. त्यापैकी गोकुलम केरळने दोनदा चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे.
इतिहास
संघ
Indian Arrows
Odisha Police
Sports Odisha
हे सुद्धा पहा
- भारतात फुटबॉल
- भारतातील महिला फुटबॉल
संदर्भ
- ^ Puri, Rohan (21 April 2016). "Women's football league from October". Times of India. 26 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2016 रोजी पाहिले.