भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२
भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | भारत महिला | ||||
तारीख | २१ सप्टेंबर – १० ऑक्टोबर २०२१ | ||||
संघनायक | मेग लॅनिंग | मिताली राज (म.कसोटी, म.ए.दि.) हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | एलिस पेरी (६९) | स्म्रिती मंधाना (१५८) | |||
सर्वाधिक बळी | सोफी मॉलिनू (३) | पूजा वस्त्रकार (४) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बेथ मूनी (१७७) | स्म्रिती मंधाना (१२४) | |||
सर्वाधिक बळी | डार्सी ब्राउन (५) सोफी मॉलिनू (५) | झुलन गोस्वामी (४) पूजा वस्त्रकार (४) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बेथ मूनी (९५) | जेमिमाह रॉड्रिगेस (७९) | |||
सर्वाधिक बळी | ॲशली गार्डनर (४) | राजेश्वरी गायकवाड (५) | |||
मालिकावीर | ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) | ||||
Series points | |||||
ऑस्ट्रेलिया महिला ११, भारत महिला ५ |
भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २००६ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. एकमेव महिला कसोटी ही भारताची पहिली दिवस/रात्र कसोटी होती.
नियोजनाप्रमाणे ही मालिका जानेवारी २०२१ मध्ये होणार होती परंतु कोरोनाव्हायरसमुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. शेवटी मालिका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले. २० मे २०२१ रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेळापत्रक जारी केले. संपूर्ण दौरा हा गुण पद्धतीने खेळविला गेला. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली.
ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सलग २५वा एकदिवसीय सामना जिंकत त्यांचा विजयरथ अभेद्य ठेवला. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना या स्थितीत पोचलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने थरारक विजय मिळवत मालिका विजय नोंदवला. भारताने तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, ऑस्ट्रेलियाने महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकमेव महिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. भारताच्या स्म्रिती मंधानाने शानदार शतक झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. ट्वेंटी२० मालिकेतील पहिला सामन १५ षटकांनंतर पावसामुळे रद्द करण्यात आला. उर्वरीत दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत २-० ने विजय मिळवला. गुण पद्धतीवर खेळवली गेलेली मालिका ऑस्ट्रेलियाने ११-५ अश्या फरकाने जिंकली.
सराव सामने
५० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलियन्स वि भारतीय
ऑस्ट्रेलियन्स २७८/७ (५० षटके) | वि | भारतीय २४२/७ (५० षटके) |
राचेल हेन्स ६५ (७१) पूनम यादव ३/२८ (६ षटके) | पूजा वस्त्रकार ५७ (८४) स्टेल्ला कॅम्पबेल ३/३८ (७ षटके) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही, यजमान म्हणून ऑस्ट्रेलियन्स ने प्रथम फलंदाजी केली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
भारत २२५/८ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २२७/१ (४१ षटके) |
राचेल हेन्स ९३* (१००) पूनम यादव १/५८ (१० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- हॅना डार्लिंग्टन (ऑ), यस्तिका भाटिया, रिचा घोष आणि मेघना सिंग (भा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - ०.
२रा सामना
भारत २७४/७ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २७५/५ (५० षटके) |
स्म्रिती मंधाना ८६ (९४) ताहलिया मॅकग्रा ३/४५ (९ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - २.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया २६४/९ (५० षटके) | वि | भारत २६६/८ (४९.३ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- स्टेल्ला कॅम्पबेल (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- गुण : भारत महिला - २, ऑस्ट्रेलिया महिला - ०.
महिला कसोटी मालिका
एकमेव महिला कसोटी
३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०२१ (दि/रा) धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
- भारताचा पहिला दिवस/रात्र महिला कसोटी सामना.
- डार्सी ब्राउन, स्टेल्ला कॅम्पबेल, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम (ऑ), मेघना सिंग आणि यस्तिका भाटिया (भा) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - २.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
भारत १३१/४ (१५.२ षटके) | वि | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
- हॅना डार्लिंग्टन, ताहलिया मॅकग्रा (ऑ), यस्तिका भाटिया आणि रेणुका सिंग (भा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- गुण : ऑस्ट्रेलिया महिला - १, भारत महिला - १.
२रा सामना
भारत ११८/९ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ११९/६ (१९.१ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - ०.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया १४९/५ (२० षटके) | वि | भारत १३५/६ (२० षटके) |
स्म्रिती मंधाना ५२ (४९) निकोला केरी २/४२ (४ षटके) |
- नाणेफेक : भारतीय महिला, क्षेत्ररक्षण.
- गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, भारत महिला - ०.