Jump to content

भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था

भारतीय भरड धान्ये संशोधन संस्थेची प्रयोगशाळा

भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था (ICAR-IIMR) ही राजेंद्रनगर (हैदराबाद, तेलंगणा, भारत) येथे ज्वारी आणि इतर भरड धान्यावरील मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करणारी एक कृषी संशोधन संस्था आहे. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत कार्यरत आहे. भरड धान्याचे प्रजनन, सुधारणा, पॅथॉलॉजी आणि मूल्यवर्धन यावर ही संस्था कृषी संशोधन करते. IIMR ज्वारीवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Sorghum)[] द्वारे राष्ट्रीय स्तरावर ज्वारी संशोधनाचे समन्वयन आणि सुविधा पुरवते तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीशी संबंध प्रदान करते.

या संस्थेची स्थापना १९५८ मध्ये प्रथम कापूस, तेलबिया आणि भरड धान्य (PIRCOM) वरील गहन संशोधन प्रकल्पांतर्गत करण्यात आली.[] त्याकाळात ही संस्था ज्वारी, एरंड, भुईमूग, तूर आणि कापूस तसेच ज्वारीवर आधारित पीक पद्धती यासारख्या महत्त्वाच्या कोरडवाहू पिकांवर संशोधन करण्यात गुंतलेली होती. या संस्थेने त्या काळात भारतातील कृषी संशोधनाचा मार्ग मोकळा केला.[] २०१४ मध्ये ही संस्था 'भा कृ स प - भा भ धा सं सं' म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आली आहे. सध्या या संस्थेचे संचालक विलास ए टोनापी आहेत.

संदर्भ

  1. ^ ":: Indian Institute Of Millets Research(IIMR) ::". millets.res.in. 2017-05-04 रोजी पाहिले.
  2. ^ "History of Agricultural Research in India" (PDF).
  3. ^ "Indian Agricultural research History" (PDF). 2020-01-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-05-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे