भारतीय प्रस्तर
tectonic plate | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | plate | ||
---|---|---|---|
उपवर्ग | tectonic plate | ||
ह्याचा भाग | Indo-Australian Plate | ||
स्थान | भारत, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार | ||
| |||
भारतीय प्रस्तर किंवा भारतीय प्लेट ही पूर्व गोलार्धातील विषुववृत्तावर पसरलेली एक छोटी टेक्टोनिक प्लेट (प्रस्तर) आहे. मूळतः गोंडवनाच्या प्राचीन खंडाचा एक भाग असलेला हा प्रस्तर १०० दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवनाच्या इतर तुकड्यांपासून विभक्त झाला आणि उत्तरेकडे जाऊ लागला.[१] एके काळी हे एकत्र इंडो-ऑस्ट्रेलियन प्रस्तर तयार करण्यासाठी शेजारील ऑस्ट्रेलियन प्रस्तराशी जोडले गेले होते आणि अलीकडील अभ्यास असे सूचित करतात की भारत आणि ऑस्ट्रेलिया कमीत कमी ३ दशलक्ष वर्षांपासून आणि बहुधा जास्त काळ वेगळे प्रस्तर आहेत.[२]
भारतीय प्रस्तरामध्ये आधुनिक दक्षिण आशिया (भारतीय उपखंड) आणि हिंद महासागराखालील खोऱ्याचा काही भाग, दक्षिण चीन आणि पश्चिम इंडोनेशियाचा काही भाग समाविष्ट आहे.[३][४][५][६][७]
प्लेट टेक्टोनिक्स मुळे, भारतीय प्रस्तर मादागास्करपासून दुभंगले आणि युरेशियन प्रस्तराशी आदळला, परिणामी हिमालयाची निर्मिती झाली.
संदर्भ
- ^ Oskin, Becky (2013-07-05). "New Look at Gondwana's Breakup". Livescience.com. 2016-01-13 रोजी पाहिले.
- ^ Stein, Seth; Sella, Giovanni F.; Okai, Emile A. (2002). "The January 26, 2001 Bhuj Earthquake and the Diffuse Western Boundary of the Indian Plate" (PDF). Geodynamics Series. American Geophysical Union: 243–254. doi:10.1029/GD030p0243. ISBN 9781118670446. 2015-12-25 रोजी पाहिले.
- ^ Sinvhal, Understanding Earthquake Disasters, p. 52, Tata McGraw-Hill Education, 2010, आयएसबीएन 978-0-07-014456-9
- ^ Harsh K. Gupta, Disaster management, p. 85, Universities Press, 2003, आयएसबीएन 978-81-7371-456-6
- ^ M. Asif Khan, Tectonics of the Nanga Parbat syntaxis and the Western Himalaya, p. 375, Geological Society of London, 2000, आयएसबीएन 978-1-86239-061-4
- ^ Srikrishna Prapnnachari, Concepts in Frame Design, page 152, Srikrishna Prapnnachari, आयएसबीएन 978-99929-52-21-4
- ^ A. M. Celâl Şengör, Tectonic evolution of the Tethyan Region, Springer, 1989, आयएसबीएन 978-0-7923-0067-0