Jump to content

भारतीय पोलीस सेवा

भारतीय पोलीस सेवा (इंडियन पोलीस सर्व्हिसेस किंवा आय.पी.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.पी.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय प्रशासकीय सेवाभारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.पी.एस. सेवा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या पोलीस खात्यांत अनेक महत्त्वाची पदे आय.पी.एस. अधिकारी सांभाळतात.

आय.पी.एस. अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन) केली जाते. संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय.ए.एस. अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात. निवड झालेल्या आय.पी.एस. अधिकाऱ्यांना हैदराबादमधील राष्ट्रीय पोलीस विद्यालय (नॅशनल पोलीस अकॅडमी) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.


खालील काही प्रमुख पदे आय.पी.एस. अधिकारी भुषवितात:

  • भारतीय गुप्तहेरखात्याचे (इंटेलिजन्स ब्यूरो) संचालक
  • राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण खात्याचे (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरो) संचालक
  • सीमा सुरक्षा पोलीस संचालक अधिकारी
  • रेल्वे सुरक्षा बल संचालक अधिकारी
  • पोलिस कमिशनर