भारतीय चलन आणि महात्मा गांधी
भारतीय चलन आणि महात्मा गांधी ही भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाची संकल्पना आहे.[१]
भारतीय अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्थेत विनिमयाचे साधन म्हणून नाणी आणि नोटा यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. भारतीय चलनाच्या कागदी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र छापलेले असते. महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून गौरविले जात असल्याने अर्थव्यवस्थेतील विनिमय प्रक्रियेत त्यांच्याबद्दलचा आदर दिसून येतो.[२]
इतिहास
भारतीय नोटांवर इसवी सन १९६९ मध्ये सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे छायाचित्र प्रथम छापण्यात आले. या नोटांवर महात्मा गांधी बसलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या मागे सेवाग्राम आश्रम असे चित्र छापण्यात आले.[३]१९९६ साली सुरक्षिततेच्या कारणास्तव खास वैशिष्ट्ये असलेल्या नव्या नोटा छापण्यात आल्या, ज्यामध्ये चलनातील सर्व नोटांवर गांधीजींचे छायाचित्र छापण्यात आले. हे छायाचित्र म्हणजे गांधीजींचे स्मितहास्य असलेला त्यांचा चेहरा आहे. १९४६ मध्ये त्या काळातील ब्रिटिश अधिकारी फ्रेडरिक लॉरेन्स यांच्यासह काढलेल्या छायाचित्रातील केवळ चेहरा नोटांवर छापण्यात आला आहे.[१]
भारताबाहेर
भारताबाहेरही महात्मा गांधी यांची लोकप्रियता लक्षात घेता ब्रिटनमध्ये तेथील चलनावर महात्मा गांधी यांची प्रतिमा छापली जाणार आहे. आणि त्याविषयीचे काम सुरू आहे.[४]
संदर्भ
- ^ a b टीम, एबीपी माझा वेब (2018-10-02). "Gandhi Jayanti: नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का असतो?". marathi.abplive.com. 2020-10-02 रोजी पाहिले.
- ^ World, Republic. "Gandhi Jayanti: Why do Indian currencies only feature Mahatma Gandhi?". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "BBC News मराठी".
- ^ "ब्रिटनच्या चलनावर महात्मा गांधी". www.tarunbharat.net (इंग्रजी भाषेत). 2020-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-02 रोजी पाहिले.