Jump to content

भारतीय गिधाड

भारतीय गिधाड
लांब चोचीचे गिधाड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: ॲक्सिपिट्रिफॉर्मेस
कुळ: ॲक्सिपिट्रिडे
जातकुळी: जिप्स
जीव: जि. इंडिकस
शास्त्रीय नाव
जिप्स इंडिकस
(स्कोपोली, १७८८)

भारतीय गिधाड किंवा लांब चोचीचे गिधाड (जिप्स इंडिकस) भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील एक गिधाड आहे. त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने २००२ सालापासून त्यांना आय.यू.सी.एन.च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे. डायक्लोफिनॅक विषबाधामुळे मूत्रमार्ग खराब झाल्याने भारतीय गिधाडांचा मृत्यू झाला.[]

ओळखण

लांब चोचीचे गिधाड मध्यम आकाराचे गिधाड आहे. त्याचे शरीर आणि पाठीच्या वरच्या भागातील पिसे (कव्हर्ट पिसे) फिकट राखाडी रंगाची असतात, तर पाठीच्या खालच्या भागातील पिसे (क्विल्स) आणि शेपटी जास्त गडद असतात. त्याचे पंख विस्तृत असतात आणि त्याची शेपटी लहान असते. त्याच्या डोक्यावर व मानेवर पिसे नसतात, आणि त्याची चोच लांब असते.

हे सामान्यतः ८०–१०३ सेंमी (३१–४१ इंच) लांब असतात आणि त्याच्या पंखांचा विस्तार १.९–२.३८ मी (६.२–७.८ फूट) असतो. याचे वजन ५.५–६.३ किलो असते. युरेशियन ग्रिफन पेक्षा हे छोटे आहे.[]

Behaviour== व्यवहार == ही प्रजाती प्रामुख्याने डोंगरातील कड्यांवर घरटे बनवते, पण राजस्थानमध्ये ते झाडांवरही घरटे बनवतात. ते क्वचित मानवनिर्मित इमारतींवरही घरटे बांधतात. इतर गिधाडांप्रमाणे हे सुद्धा मृतभक्षक आहेत. जंगलात किंवा मानवी वस्तीशेजारी इंच उडून ते मेलेली जनावरे शोधतात आणि त्यावर उपजीविका करतात. यांची नजर अतिशय तीक्ष्ण असते आणि ते अतिशय उंचावरून आपला आहार शोधतात. ते थव्यामध्ये प्रवास करतात.

संरक्षण स्थिती आणि संवर्धन

ओर्छा, भारत येथील घरट्यातील गिधाडे

ही प्रजाती काही वर्षांपूर्वीपर्यंत तिच्या क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात आढळत होती. १९९० च्या दशकात त्यांची संख्या ९७ ते ९९ टक्क्यांनी कमी झाली. २०००–२००७ या काळात यांच्या वार्षिक पतनाचा सरासरी दर १६% होता. याचे मुख्य कारण डायक्लोफिनॅक हे औषध आहे जे जनावरांची सांधेदुखी कमी करण्यात मदत करते. मरायच्या काही दिवस आधी डायक्लोफिनॅक दिलेल्या जनावराचे मांस खाल्ल्याने डायक्लोफिनॅक गिधाडांच्या शरीरात जाते. डायक्लोफिनॅकमुळे त्यांचे मुत्राशय बंद पडते आणि त्यांचा मृत्यू होतो.

मार्च २००६ मध्ये भारत सरकारने डायक्लोफिनॅकच्या पशुवैद्यकीय वापरावर बंदी घातल्याचे घोषित केले. आणखी एक औषध, मेलॉक्सिकॅम, गिधाडांना हानिकारक नसल्याचे आढळून आले आहे आणि डायक्लोफिनॅकसाठी स्वीकार्य पर्याय आहे. जेव्हा मेलॉक्सिकॅमचे उत्पादन वाढवले जाईल तेव्हा अशी आशा आहे की हे डायक्लोफिनॅकसारखे स्वस्त असेल. ऑगस्ट २०११ पर्यंत अंदाजे एक वर्षासाठीच्या पशुवैद्यकीय वापरासाठीच्या बंदीने भारतभरातील डायक्लोफिनॅक वापरास प्रतिबंध केला नाही.[] कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये काही पक्ष्यांनी प्रजनन केले आहे.[]

सध्या यांचे प्रजनन बंदीवासात केले जाते. गिधाडांच्या विविध प्रजातींसाठी बंदीवासातील प्रजननाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. कारण, जंगलामध्ये ते नामशेष होत आले आहेत. गिधाडे दीर्घायुशी असतात पण प्रजननाला खूप वेळ लावतात त्यामुळे हे कार्यक्रम अनेक दशके घेतील अशी अपेक्षा आहे. गिधाडे वयाच्या पाचव्या वर्षी प्रजननयोग्य होतात आणि एका वेळी एक किंवा दोनच अंडी देतात. काळ कठीण असेल तर एकाच पिलाची काळजी घेतात. जर परभक्षकांनी त्यांचे अंडे खाल्ले तर पुढच्या वर्षीपर्यंत ते प्रजनन करत नाहीत. त्यामुळे भारतीय गिधाडे आपली संख्या वाढवू शकत नाहीयेत.

संदर्भ

  1. ^ a b बर्डलाइफ इंटरनॅशनल. "जिप्स इंडिकस". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. ०८-०५-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ "द पेरेग्रीन फंड". 2011-05-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ जग्गा राखी. "बंदी असलेले डायक्लोफिनॅक अजूनही गिधाडांचा जीव घेत आहे" (इंग्रजी भाषेत). 11 August 2014 रोजी पाहिले.
  4. ^ ओप्पीली, पी. "४० वर्षांनी भारतीय गिधाड दिसले" (इंग्रजी भाषेत). 11 August 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत