भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१ | |||||
श्रीलंका | भारत | ||||
तारीख | १८ – २९ जुलै २०२१ | ||||
संघनायक | दासून शनाका | शिखर धवन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अविष्का फर्नांडो (१५९) | शिखर धवन (१२८) | |||
सर्वाधिक बळी | अकिला धनंजय (३) प्रवीण जयविक्रमा (३) वनिंदु हसरंगा (३) | युझवेंद्र चहल (५) | |||
मालिकावीर | सूर्यकुमार यादव (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | धनंजय डी सिल्वा (७२) | शिखर धवन (८६) | |||
सर्वाधिक बळी | वनिंदु हसरंगा (७) | भुवनेश्वर कुमार (५) | |||
मालिकावीर | वनिंदु हसरंगा (श्रीलंका) |
भारतीय क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. पूर्वनियोजनाप्रमाणे हा दौरा जून २०२० मध्ये होणार होता. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता, तथापि जुलै २०२१ मध्ये दौरा होणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. १३ जुलै पासून दौऱ्याला सुरुवात होणार होती परंतु ९ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक आणि काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे दौरा पाच दिवसांनी पुढे ढकलण्यात आला.
भारताचा कसोटी संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जून २०२१ पासून इंग्लंड मध्ये आहे. त्यामुळे कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा दुय्यम दर्जाचा संघ श्रीलंकेला रवाना झाला. दौऱ्यापूर्वी श्रीलंकन बोर्डाने कुशल परेराला कर्णधारपदावरून हटवत संघाची जवाबदारी दासून शनाकाकडे दिली.
भारताने एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवला. श्रीलंकेने ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकत भारताविरुद्ध पहिला वहिला ट्वेंटी२० मालिका विजय संपादन केला. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ऑगस्ट २००८ नंतर श्रीलंकेने भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
श्रीलंका २६२/९ (५० षटके) | वि | भारत २६३/३ (३६.४ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- भानुका राजपक्ष (श्री), ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : भारत - १०, श्रीलंका - ०.
२रा सामना
श्रीलंका २७५/९ (५० षटके) | वि | भारत २७७/७ (४९.१ षटके) |
चरिथ असलंका ६५ (६८) युझवेंद्र चहल ३/५० (१० षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- विश्वचषक सुपर लीग गुण : भारत - १०, श्रीलंका - ०.
३रा सामना
भारत २२५ (४३.१ षटके) | वि | श्रीलंका २२७/७ (३९ षटके) |
अविष्का फर्नांडो ७६ (९८) राहुल चाहर ३/५४ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- पावसामुळे श्रीलंकेला ४७ षटकांमध्ये २२७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- राहुल चाहर, कृष्णप्पा गौथम, नितीश राणा, चेतन सकारिया आणि संजू सॅमसन (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : श्रीलंका - १०, भारत - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
भारत १६४/५ (२० षटके) | वि | श्रीलंका १२६ (१८.३ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- चरिथ असलंका, चमिका करुणारत्ने (श्री), वरूण चक्रवर्ती आणि पृथ्वी शाॅ (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
भारत १३२/५ (२० षटके) | वि | श्रीलंका १३३/६ (१९.४ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- रमेश मेंडीस (श्री), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा आणि चेतन साकरिया (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
भारत ८१/८ (२० षटके) | वि | श्रीलंका ८२/३ (१४.३ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- संदीप वारियर (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.