Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६
भारत
पाकिस्तान
तारीख७ जानेवारी – २० जानेवारी २००६
संघनायकराहुल द्रविड इंझमाम-उल-हक
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाविरेंद्र सेहवाग (२९४) युनीस खान (५५३)
सर्वाधिक बळीझहीर खान (१०) अब्दुल रझाक (९)
मालिकावीरयुनीस खान (पा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावायुवराज सिंग (३४४) शोएब मलिक (३१४)
सर्वाधिक बळीइरफान पठाण (९) मोहम्मद आसिफ (५)
राणा नावेद उल हसन (५)
मालिकावीरयुवराज सिंग (भा)

भारतीय क्रिकेट संघाने २००५-०६ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघाचे मोसमात कसोटी क्रिकेट खेळून झाले होते. भारताने श्रीलंकेला मायदेशी २-० ने हरवले होते तर तितक्याच फरकाने पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला होता. भारताची नोव्हेंबर २००५ मधील, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची एकदिवसीय मालिका २-२ अशी अनिर्णितावस्थेत संपली होती तर पाकिस्तानने डिसेंबर २००५ मध्ये इंग्लंडला ३-२ असे हरवले होते.

७ जानेवारी २००६ रोजी सुरू झालेल्या दौऱ्यात भारताचा पहिला सामना पाकिस्तान अ संघाबरोबर झाला, आणि १९ फेब्रुवारी रोजी कराचीतील एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सांगता झाली.

पाकिस्तानचा कर्णधार, इंझमाम-उल-हक, म्हणाला की सुरुवातीला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला वरचढ मानला गेला,[] परंतु माजी तेजगती गोलंदाज सरफराज नवाझच्या मते भारतीय फलंदाजांना बाद करणे सोपे आहे. २००५ च्या शेवटी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या तर पाकिस्तान चवथ्या स्थानावर होते, आणि एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान तिसऱ्या तर भारत पाचव्या स्थानावर होता.

पाकिस्ताने कसोटी मालिकेत विजय मिळवला तर भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहज जिंकली.

संघ

कसोटी मालिका एकदिवसीय मालिका
भारतचा ध्वज भारत[]पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[]भारतचा ध्वज भारत[]पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[]

दौरा सामना

३ दिवसीयः भारतीय वि. पाकिस्तान अ

७–९ जानेवारी
धावफलक
भारतीय भारत
वि
पाकिस्तान पाकिस्तान अ
४१४/७घो (१०४ षटके)
सचिन तेंडुलकर ७४ (१०२)
मोहम्मद इर्शद २/७९ (१९ षटके)
३५८/९घो (९५ षटके)
इम्रान फरहात १०७ (१६२)
इरफान पठाण ३/८२ (२२ षटके)
७२/० (१३ षटके)
वसिम जाफर ३५ (४३)
सामना अनिर्णित
बाग-ए-जीना, लाहोर
पंच: रियाझुद्दीन (पा) आणि झमीर हैदर (पा)
  • नाणेफेक: भारतीय, फलंदाजी.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१३–१७ जानेवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
६७९/७घो (१४३.३ षटके)
युनीस खान १९९ (३३६)
अजित आगरकर २/१२२ (२४ षटके)
४१०/१ (७७.२ षटके)
विरेंद्र सेहवाग २५४ (२४७)
राणा नावेद उल हसन १/९४ (१६ षटके)
सामना अनिर्णित
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: डॅरेल हेयर (ऑ) and रूडी कर्टझन (द)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • विरेंद्र सेहवागच्या २४७ चेंडूंतील २५४ धावा ह्या कसोटी क्रिकेट मध्ये, कमी चेंडूत जास्त धावा करताना सर्वाधिक धावा आहेत.[]
  • सामन्यात ४.९३ च्या धावगतीने धावा केल्या गेल्या. एका कसोटी सामन्यात १००० पेक्षा जास्त धावा असणारे सामने विचारात घेता हा एक विक्रम आहे.[]
  • कसोटी इतिहासात प्रथमच एका कसोटी सामन्यात २ त्रिशतकी भागीदारी झाल्या. मोहम्मद युसुफ आणि युनीस खानने ३१९ तर राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवागने ४१० धावांची भागीदारी केली.[]
  • राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग दरम्यानची ४१० धावांची भागीदारी ही पाकिस्तानातील सर्वोत्तम भागीदारी आहे, तसेच ती पाकिस्तानविरूद्ध कोणत्याही संघाची सुद्धा सर्वोत्तम भागीदारी आहे.[]
  • विरेंद्र सेहवागचे ९३ चेंडूंतील शतक हे भारतीय सलामीवीरातर्फे सर्वात जलद कसोटी शतक आहे.[]
  • विरेंद्र सेहवागने १८२ चेंडूंतील द्विशतक हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद द्विशतक आहे.[]
  • कामरान अकमलचे ८१ चेंडूंतील शतक हा यष्टिरक्षकातर्फे सर्वात जलद कसोटी शतकाचा विश्वविक्रम आहे.[]

२री कसोटी

२१–२५ जानेवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
५८८ (१३६.२ षटके)
शाहिद आफ्रिदी १५६ (१२८)
रूद्र प्रताप सिंग ४/८९ (२५ षटके)
६०३ (१६५.४ षटके)
महेंद्रसिंग धोणी १४८ (१५३)
दानिश कणेरिया ३/१६५ (५४ षटके)
४९०/८घो (११६.४ षटके)
युनीस खान १९४ (२९९)
झहीर खान ४/६१ (१९.४ षटके)
२१/० (८ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण* (१९)
सामना अनिर्णित
इक्बाल मैदान, फैसलाबाद
पंच: रूडी कर्टझन (द) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: रूद्र प्रताप सिंग (भा)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: रूद्र प्रताप सिंग (भा).
  • इंझमाम-उल-हकचे २५ वे कसोटी शतक.[]
  • महेंद्रसिंग धोणी आणि इरफान पठाण दरम्यानची २१० धावांची भागीदारी ही भारतातर्फे पाकिस्तानची ६व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे.[]
  • महेंद्रसिंग धोणीचे ९३ चेंडूंतील शतक हे भारतीय यष्टिरक्षकातर्फे सर्वात जलद कसोटी शतक आहे.[]
  • सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने १०७८ धावा केल्या. एका संघातर्फे एका सामन्यातील सर्वाधिक धावांचा हा एक विक्रम आहे.[]


३री कसोटी

२९ जानेवारी–२ फेब्रुवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
२४५ (६०.१ षटके)
कामरान अकमल ११३ (१४८)
इरफान पठाण ५/६१ (१७.१ षटके)
२३८ (५४.१ षटके)
युवराज सिंग ४५ (७४)
मोहम्मद आसिफ ४/७८ (१९.१ षटके)
५९९/७घो (१४०.१ षटके)
फैसल इकबाल १३९ (२२०)
अनिल कुंबळे ३/१५१ (३७.१ षटके)
२६५ (५८.४ षटके)
युवराज सिंग १२२ (१४४)
अब्दुल रझाक ४/८८ (१८.४ षटके)
पाकिस्तान ३४१ धावांनी विजयी
नॅशनल मैदान, कराची
पंच: डॅरेल हार्पर (ऑ) and सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: कामरान अकमल (पा)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी.
  • इरफान पठाणने पहिल्या डावात पहिल्याच षटकात हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील हॅट्ट्रीकची ही पहिलीच वेळ.[]
  • मोहम्मद युसूफच्या कसोटी क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[]
  • दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या पहिल्या ७ फलंदाजांनी अर्धशतक केले. पहिल्या ७ फलंदाजांनी अर्धशतक करण्याची कसोटी क्रिकेट मधील ही पहिलीच वेळ. []
  • पाकिस्तानचा ३४१ धावांनी विजय हा धावांचा विचार करता सर्वात मोठा विजय.[]


एकदिवसीय मालिका

१ला सामना

६ फेब्रुवारी
धावफलक
भारत Flag of भारत
३२८ (४९.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३११/७ (४७ षटके)
सचिन तेंडुलकर १०० (११३)
राणा नावेद उल हसन ४/६२ (१० षटके)
सलमान बट १०१ (१११)
अजित आगरकर २/५८ (९ षटके)
पाकिस्तान ७ धावांनी विजयी (ड/लु)
अर्बाब निआझ मैदान, पेशावर
पंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: सलमान बट (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
  • पाकिस्तानच्या डावादरम्यान ४७ षटकांनंतर अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

२रा सामना

११ फेब्रुवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६५ (४९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६६/३ (४३.१ षटके)
शोएब मलिक ९५ (११०)
इरफान पठाण ३/४३ (१० षटके)
युवराज सिंग ८२* (८९)
शोएब मलिक १/२४ (३ षटके)
भारत ७ गडी व ४१ चेंडू राखून विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: इरफान पठाण (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३रा सामना

१३ फेब्रुवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८८/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९२/५ (४७.४ षटके)
शोएब मलिक १०८ (१२०)
इरफान पठाण ३/४९ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ९५ (१०४)
मोहम्मद आसिफ २/४७ (१० षटके)
भारत ५ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


४था सामना

१६ फेब्रुवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६१ (४१.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६२/५ (३२.३ षटके)
इंझमाम-उल-हक ४९ (६३)
रूद्र प्रताप सिंग ४/४० (१० षटके)
राहुल द्रविड ५९ (७२)
मोहम्मद सामी ३/४२ (९ षटके)
भारत ५ गडी आणि १०५ चेंडू राखून विजयी
मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान
पंच: असद रौफ (पा) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: रूद्र प्रताप सिंग (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

५वा सामना

२० फेब्रुवारी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८६/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२८७/२ (४६.५ षटके)
युनीस खान ७४* (७९)
श्रीसंत ४/५८ (१० षटके)
युवराज सिंग १०७* (९३)
इफ्तिखार अंजुम १/४४ (१० षटके)
भारत ८ गडी व १९ चेंडू राखून विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पा) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ 'इंडिया आर फेव्हरिट्स - इंझमाम' क्रिकइन्फो, १ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)
  2. ^ भारतीय संघ
  3. ^ पाकिस्तानी संघ
  4. ^ भारतीय संघ
  5. ^ पाकिस्तानी संघ
  6. ^ a b c d e f g आकडेवारी – १ली कसोटी, भारत वि पाकिस्तान, लाहोर. इएसपीएन क्रिकइन्फो, १७ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)
  7. ^ a b c d आकडेवारी – २री कसोटी, भारत वि पाकिस्तान, फैसलाबाद. इएसपीएन क्रिकइन्फो, २५ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)
  8. ^ a b c d आकडेवारी – ३री कसोटी, भारत वि पाकिस्तान, कराची. इएसपीएन क्रिकइन्फो, १ फेब्रुवारी २००६. (इंग्रजी मजकूर)

बाह्यदुवे

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६

१९५४-५५ | १९७८-७९ | १९८२-८३ | १९८४-८५ | १९८९-९० | १९९७-९८ | २००३-०४ | २००५-०६