Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७८-७९

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७८-७९
पाकिस्तान
भारत
तारीख१ ऑक्टोबर – १९ नोव्हेंबर १९७८
संघनायकमुश्ताक मोहम्मदबिशनसिंग बेदी
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाझहिर अब्बास (५८३) सुनील गावसकर (४४७)
सर्वाधिक बळीसरफ्राज नवाझ (१७) भागवत चंद्रशेखर (८)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धामुळे तब्बल १४ वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली. भारताचा हा दुसरा पाकिस्तान दौरा होता. पाकिस्तानी भूमीवर भारताने पहिल्यांदा एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिकेत पाकिस्तानने २-० असा विजय संपादन केला. हा भारताविरुद्धचा पाकिस्तानचा पहिला कसोटी मालिका विजय ठरला. एकदिवसीय मालिकादेखील पाकिस्तानने २-१ अशी जिंकली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सरफ्राज नवाझच्या गोलंदाजीवर सातत्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूंना पंच वाईड देत नाहीत हे बघून भारतीय संघ संतापला. भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी याने निषेध म्हणून संघासह मैदानत्याग केला. आयसीसीने तिसरा सामना पाकिस्तानला बहाल करत विजयी घोषित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्या पद्धतीने निकाल लागलेला हा एकमेव सामना आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१ ऑक्टोबर १९७८
धावफलक
भारत Flag of भारत
१७०/७ (४० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६६/८ (४० षटके)
मोहिंदर अमरनाथ ५१ (६१)
सरफ्राज नवाझ ३/३४ (८ षटके)
मजिद खान ५० (६४)
मोहिंदर अमरनाथ २/३८ (८ षटके)
भारत ४ धावांनी विजयी.
अयुब नॅशनल स्टेडियम, क्वेट्टा
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • पाकिस्तानी भूमीवर भारताने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • सुरिंदर अमरनाथ, चेतन चौहान आणि कपिल देव (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

१३ ऑक्टोबर १९७८
धावफलक
भारत Flag of भारत
७९ (३४.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८३/२ (१६.५ षटके)
मोहिंदर अमरनाथ ३४* (८५)
हसन जमील ३/१८ (८ षटके)
झहिर अब्बास ४८ (४६)
सुनील गावसकर १/१० (०.५ षटक)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
जिन्ना स्टेडियम, सियालकोट
सामनावीर: हसन जमील (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अझमत राणा (पाक) आणि यशपाल शर्मा (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

३ नोव्हेंबर १९७८
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०५/७ (४० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८३/२ (३७.४ षटके)
आसिफ इकबाल ६२ (७२)
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन २/३४ (८ षटके)
अंशुमन गायकवाड ७८* (११५)
आसिफ इकबाल १/४४ (८ षटके)
पाकिस्तान सवलतीने विजयी (भारताने सामना अर्ध्यावर सोडला).
झफर अली स्टेडियम, साहिवाल
सामनावीर: आसिफ इकबाल (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • खेळपट्टीच्या बाहेर जाणाऱ्या अनेक चेंडूंना वाईड घोषित न केल्याने संतप्त भारतीय संघाने सामना अर्ध्यावरच सोडून मैदान त्यागले.
  • भरत रेड्डी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१६-२१ ऑक्टोबर १९७८
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
५०३/८घो (१५२ षटके)
झहिर अब्बास १७६
भागवत चंद्रशेखर ४/१३० (३८ षटके)
४६२/९घो (१४२.५ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १४५
मुश्ताक मोहम्मद ४/५५ (२७ षटके)
२६४/४घो (७१.५ षटके)
आसिफ इकबाल १०४
सुरिंदर अमरनाथ १/५ (१.५ षटके)
४३/० (१९ षटके)
चेतन चौहान ३०*
सामना अनिर्णित.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • कपिल देव (भा) याने कसोटी पदार्पण केले.
  • या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.

२री कसोटी

२७ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर १९७८
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९९ (५६.५ षटके)
दिलीप वेंगसरकर ७६
सरफ्राज नवाझ ४/४६ (१६ षटके)
५३९/६घो (१३३ षटके)
झहिर अब्बास २३५
बिशनसिंग बेदी २/१३० (३४ षटके)
४६५ (१७०.३ षटके)
सुनील गावसकर ९७
इम्रान खान ३/११० (४२.३ षटके)
१२८/२ (२०.४ षटके)
मजिद खान ३८
मोहिंदर अमरनाथ १/३९ (६ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
गद्दाफी मैदान, लाहोर
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • मायदेशात पाकिस्तानचा भारतावर पहिला कसोटी विजय.

३री कसोटी

१४-१९ नोव्हेंबर १९७८
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४४ (११५.२ षटके)
सुनील गावसकर १११
सरफ्राज नवाझ ४/८९ (३१.२ षटके)
४८१/९घो (१४१ षटके)
जावेद मियांदाद १००
भागवत चंद्रशेखर ३/९७ (२५ षटके)
३०० (८२ षटके)
सुनील गावसकर १३७
सरफ्राज नवाझ ५/७० (२४ षटके)
१६४/२ (२४.५ षटके)
जावेद मियांदाद ६२
मोहिंदर अमरनाथ १/३५ (५.५ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.