भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९ | |||||
ऑस्ट्रेलिया | भारत | ||||
तारीख | २१ नोव्हेंबर २०१८ – १२ जानेवारी २०१९ | ||||
संघनायक | ॲरन फिंच (ट्वेंटी२०) टिम पेन (कसोटी) | विराट कोहली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्कस हॅरिस (२५८) | चेतेश्वर पुजारा (५२१) | |||
सर्वाधिक बळी | नेथन ल्यॉन (२१) | जसप्रीत बुमराह (२१) | |||
मालिकावीर | चेतेश्वर पुजारा (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शॉन मार्श (२२४) | महेंद्रसिंग धोनी (१९३) | |||
सर्वाधिक बळी | झाय रिचर्डसन (६) | भुवनेश्वर कुमार (८) | |||
मालिकावीर | महेंद्रसिंग धोनी (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | ग्लेन मॅक्सवेल (७८) | शिखर धवन (११७) | |||
सर्वाधिक बळी | ॲडम झाम्पा (३) | कृणाल पंड्या (५) | |||
मालिकावीर | शिखर धवन (भारत) |
भारत क्रिकेट संघ सध्या २१ नोव्हेंबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.[१] खरेतर ॲडलेड येथे होणारी पहिली कसोटी ही दिवस-रात्र कसोटी म्हणून खेळवली जाणार होती, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हा प्रस्ताव बीसीसीआयने नाकारला.[२] एप्रिल २०१८ मध्ये पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने पर्थ येथील नव्या पर्थ स्टेडियमवर पहिली वहिली कसोटी खेळवली जाईल अशी घोषणा केली.[३] दोन संघांमधील दुसरी कसोटी ह्या नव्या मैदानावर खेळवली गेली आणि हे मैदान कसोटी क्रिकेटसाठीचे ऑस्ट्रेलियाचे दहावे मैदान ठरले.[४]
मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारताचा नियमित यष्टीरक्षक, महेंद्रसिंह धोनीचा या दौऱ्यावरील टी२० आणि वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आले नाही.[५] त्याऐवजी धोनीच्या जागी भारताचा कसोटी विकेटकीपर ऋषभ पंतची निवड केली गेली.[६] २ऱ्या ट्वेंटी२० सामन्याचा निकाल लागला नाही त्यामुळे ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[७] भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.[८] भारताने ऑस्ट्रेलियन भूमिवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली.[९] भारताने पहिल्यांदाज ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
संघ
भारताचा नियमीत मर्यादित षटकांच्या सामन्याचा यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला या दौऱ्यातील आणि वेस्ट इंडीजविरूद्धच्या ट्वेंटी२० मालिकेतून वगळण्यात आले.[१४] त्याच्याजागी कसोटीत यष्टीरक्षण करणारा रिषभ पंतची निवड करण्यात आली.[१४] पृथ्वी शाॅ घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला तर त्याच्याजागी मयंक अगरवालची निवड करण्यात आली.[१५] हार्दिक पंड्यालाही कसोटीसाठी संघात घेण्यात आले.[१६] चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात मार्नस लेबसचग्नेचा समावेश करण्यात आला.[१७] एकदिवसीय मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली तर त्याच्याजागी मोहम्मद सिराजची भारतीय संघात करण्यात आली.[१८] पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मिचेल मार्श आजारी पडल्यामुळे त्याच्याजागी ऑस्ट्रेलिया अंतिम १२ मध्ये ॲश्टन टर्नरला घेण्यात आले.[१९]
११ जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कार्यक्रम कॉफी विथ करणवर केलेल्या विवादित वक्तव्यामुळे लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्याला एकदिवसीय मालिकेतून तसेच न्यू झीलंडच्या संपूर्ण दौऱ्यातून निलंबीत केले.[२०][२१] त्यांच्याजागी विजय शंकरला संघात घेतले.[२२]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
ऑस्ट्रेलिया १५८/४ (१७ षटके) | वि | भारत १६९/७ (१७ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १७-१७ षटकांचा करण्यात आला.
- डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून भारताला १७ षटकांत १७४ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
२रा सामना
ऑस्ट्रेलिया १३२/७ (१९ षटके) | वि | भारत |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया १६४/६ (२० षटके) | वि | भारत १६८/४ (१९.४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
सराव सामना
चार-दिवसीय सामना: क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश वि. भारत
२९ नोव्हेंबर - १ डिसेंबर २०१८ धावफलक |
भारत | वि | |
- नाणेफेक: क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश, गोलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
कसोटी मालिका
१ली कसोटी
६-१० डिसेंबर २०१८ धावफलक |
भारत | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- मार्कस हॅरीस (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- चेतेश्वर पुजाराच्या (भा) ५,००० कसोटी धावा पूर्ण.
- रिषभ पंतने (भा) भारतातर्फे खेळताना यष्टीरक्षक म्हणून कसोटीत महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक १० झेल घेण्याचा विक्रम ११ झेल घेऊन मोडला.
- या सामन्यात तब्बल ३५ बळी झेलचीत झाले.
- भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिकेतील पहिली कसोटी जिंकली.
- या विजयाने विराट कोहली कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियात एका वर्षात एकतरी कसोटी जिंकणारा आशियातील कोणत्याही देशाचा पहिला कर्णधार ठरला.
२री कसोटी
१४-१८ डिसेंबर २०१८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | भारत |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- या मैदानावरील पहिलाच कसोटी सामना.
- विराट कोहलीचे (भा) २५वे कसोटी शतक.
- टिम पेन (ऑ) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी विजय.
३री कसोटी
२६-३० डिसेंबर २०१८ धावफलक |
भारत | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- पावसामुळे पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
- मयंक अगरवाल (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- चेतेश्वर पुजाराचे (भा) १७वे कसोटी शतक.
- या विजयाने भारताने बॉर्डर-गावसकर चषक राखला.
- भारताचा हा १५०वा कसोटी विजय, असा पराक्रम करणारा भारत ५वा देश ठरला.
- विराट कोहली ऑस्ट्रेलिया मध्ये दोन कसोटी जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला.
- भारताचा इतिहासात प्रथमच बॉक्सिंग डे कसोटीत विजय तर बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा भारत पहिलाच आशियाई देश.
४थी कसोटी
३-७ जानेवारी २०१९ धावफलक |
भारत | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अपुरा सुर्यप्रकाश आणि पावसामुळे तिसऱ्यादिवशी सायंकाळी ४.२५ ते चौथ्या दिवशी दुपारी १:५० पर्यंत खेळ होऊ शकला नाही. तसेच ४थ्या दिवशी ३ऱ्या सत्रातील तसेच ५व्या पूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.
- चेतेश्वर पुजाराचे १८वे तर ऋषभ पंतचे २रे कसोटी शतक.
- ऋषभ पंत (भा) ऑस्ट्रेलियात शतक करणारा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला.[२३]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
ऑस्ट्रेलिया २८८/५ (५० षटके) | वि | भारत २५४/९ (५० षटके) |
पीटर हॅंड्सकोंब ७३ (६१) कुलदीप यादव २/५४ (१० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- जेसन बेह्रेनड्रॉफ (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- भुवनेश्वर कुमारचे (भा) १०० एकदिवसीय बळी.
- महेंद्रसिंग धोनीच्या (भा) भारतातर्फे खेळताना १०,००० एकदिवसीय धावा पूर्ण.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा ऑस्ट्रेलियाचा १०००वा विजय.
२रा सामना
ऑस्ट्रेलिया २९८/९ (५० षटके) | वि | भारत २९९/४ (४९.२ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मोहम्मद सिराज (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया २३० (४८.४ षटके) | वि | भारत २३४/३ (४९.२ षटके) |
पीटर हॅंड्सकोंब ५८ (६३) युझवेंद्र चहल ६/४२ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- विजय शंकर (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
- ^ "दिवस रात्र कसोटीचा प्रस्ताव भारताने नाकारला".
- ^ "पर्थ स्टेडियम वर पहिली कसोटी. लाल चेंडू उठवणार वादळ". 2018-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "इंडिया ॲंड ऑस्ट्रेलिया बॅट्समेन स्टील फॉर टेस्टींग टाईम ॲट 'न्यू' पर्थ".
- ^ "महेंद्रसिंग धोनीला वेस्टइंडीज व ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेमधून वगळले". टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ "वेस्ट इंडीज विरुद्ध टी२० मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती; धोनीला वेस्टइंडीज व ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेमधून वगळले". स्क्रोल.
- ^ "कम्पोस्ड कोहली गाईड्स इंडिया टू विक्ट्री".
- ^ "विराट सेनेचे अभूतपुर्व यश, कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय".
- ^ "भारताने कांगारूंना त्यांच्याच मायदेशात ठेचले, ऐतिहासिक कसोटी विजय".
- ^ "रोहित, विजय व पार्थिव जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, हार्दिक पंड्या अजूनही दुखापतग्रस्तच".
- ^ "ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ जाहीर".
- ^ "ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय तर न्यू झीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर". 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-25 रोजी पाहिले.
- ^ "स्टार्क, मार्श आणि ल्यॉनला ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी२० संघातून वगळले".
- ^ a b c "धोनीला ट्वेंटी२० संघातून डच्चू, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी रिषभ पंतची यष्टीरक्षक म्हणून निवड".
- ^ "उर्वरीत दौऱ्याला शॉ मुकणार, भारताला मोठा धक्का".
- ^ "पंड्याचे कसोटीत पुनरागमन".
- ^ "लेबसचग्ने खेळणार चौथ्या कसोटीत, मिचेल मार्शला विश्रांती".
- ^ "बुमराहला विश्रांती ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड एकदिवसीयसाठी सिराज रवाना".
- ^ "मिचेल मार्शच्या अनुपस्थीतीत टर्नर खेळणार".
- ^ "पंड्या आणि राहुल निलंबित".
- ^ "विवादित प्रकरण भोवले". International Cricket Council. 11 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "शुभमन गिल ला भारतीय संघात स्थान".
- ^ "दुसर्या कसोटी शतकासह पंत रेकॉर्ड बुक मध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.