भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | ३ जुलै २०१८ – ११ सप्टेंबर २०१८ | ||||
संघनायक | आयॉन मॉर्गन (टी२० आणि ए.दि.) ज्यो रूट (कसोटी) | विराट कोहली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जोस बटलर (३४९) | विराट कोहली (५९३) | |||
सर्वाधिक बळी | जेम्स ॲंडरसन (२४) | इशांत शर्मा (१८) | |||
मालिकावीर | सॅम कुरन (इंग्लंड) विराट कोहली (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ज्यो रूट (२१६) | विराट कोहली (१९१) | |||
सर्वाधिक बळी | आदिल रशीद (६) | कुलदीप यादव (९) | |||
मालिकावीर | ज्यो रूट (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जोस बटलर (११७) | रोहित शर्मा (१३७) | |||
सर्वाधिक बळी | डेव्हिड विली (३) | हार्दिक पंड्या (६) | |||
मालिकावीर | रोहित शर्मा (भारत) |
भारत क्रिकेट संघ जुलै २०१८ मध्ये ५ कसोटी, ३ एकदिवसीय व ३ टी२० सामने खेळण्याकरता इंग्लंडचा दौरा करणार आहे. भारत क्रिकेट संघ दौऱ्यात इसेक्स विरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना खेळेल.
विराट कोहलीचा हा भारताचा कर्णधार म्हणून इंग्लंडचा पहिलाच दौरा असणार आहे.
भारताने टी२० मालिका २-१ ने जिंकली. इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
संघ
अंबाती रायडू एका आरोग्य चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे एकदिवसीय संघात सुरेश रैनाला स्थान दिले गेले.
टी२० मालिका
१ला टी२० सामना
इंग्लंड १५९/८ (२० षटके) | वि | भारत १६३/२ (१८.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- कुलदीप यादव (भा) ने पहिल्यांदाच टी२०त पाच बळी घेतले.
- विराट कोहली (भा) टी२०त डावांच्या बाबतीत २,००० धावा पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू ठरला. (५६)
२रा टी२० सामना
भारत १४८/५ (२० षटके) | वि | इंग्लंड १४९/५ (१९.४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- जेक बॉल (इं) याने टी२० पदार्पण केले.
- महेंद्रसिंग धोनी (भा) त्याच्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला.
३रा टी२० सामना
इंग्लंड १९८/९ (२० षटके) | वि | भारत २०१/३ (१८.४ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- दिपक चहर (भा) याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- महेंद्रसिंग धोनी (भा) टी२०त एका डावात पाच झेल घेणारा पहिला यष्टीरक्षक ठरला.
- रोहित शर्मा (भा) आंतरराष्ट्रीय टी२०त ३ शतके ठोकणारा भारताचा पहिला तर जगातला दुसरा फलंदाज ठरला.
- टी२०त इंग्लंडविरुद्ध पाठलाग केलेली २०१ ही सर्वोच्च धावसंख्या होती.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
इंग्लंड २६८ (४९.५ षटके) | वि | भारत २६९/२ (४०.१ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- सिद्धार्थ कौल (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- कुलदीप यादव (भा) याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.
२रा एकदिवसीय सामना
इंग्लंड ३२२/७ (५० षटके) | वि | भारत २३६ (५० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- महेंद्रसिंग धोनी (भा) भारतातर्फे एकदिवसीय सामन्यात ३०० झेल घेणारा पहिला यष्टिरक्षक ठरला तसेच श्रीलंकेच्या कुमार संघकारानंतर १०,००० एकदिवसीय धावा करणारा दुसरा यष्टिरक्षक ठरला.
३रा एकदिवसीय सामना
भारत २५६/८ (५० षटके) | वि | इंग्लंड २६०/२ (४४.३ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- ज्यो रूटने (इं) १३वे एकदिवसीय शतक ठोकले जे की इंग्लंडसाठी नवा विक्रम आहे.
- ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६ नंतरचा भारताचा पहिलाच एकदिवसीय मालिका पराभव
दौरा सामना
तीनदिवसीय सराव सामना : इसेक्स वि. भारत
२५-२८ जुलै २०१८ धावफलक |
भारत | वि | इसेक्स |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- वेळापत्रकानुसार सामना चार दिवसांचा आयोजित केला होता, परंतु इंग्लंडमध्ये आलेल्या उष्ण लहरींमुळे सामना तीनदिवसाचा करण्यात आला व सामन्याला असलेला प्रथम श्रेणीचा दर्जा काढून टाकण्यात आला.
कसोटी मालिका (पतौडी ट्रॉफी)
१ली कसोटी
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- हा इंग्लंचा १,०००वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे.
- ज्यो रूट (इं) कसोटी पदार्पणानंतर वेळेच्या बाबतीत ६ हजार कसोटी धावा जलदगतीने पूर्ण करणारा फलंदाज बनला.
- बेन स्टोक्सचे (इं) १०० कसोटी बळी.
- विराट कोहलीचे इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये पहिले तर एकूण २२वे कसोटी शतक.
- इशांत शर्माचे (भा) कसोटीत ८व्यांदा ५ बळी.
- सॅम कुरनचे (इं) कसोटीत पहिले अर्धशतक.
२री कसोटी
भारत | वि | |
१०७ (३५.२ षटके) रविचंद्रन अश्विन २९ (३८) जेम्स ॲंडरसन ५/२० (१३.२ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड, गोलंदाजी
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- कसोटी पदार्पण : ओलिए पोप (इं)
- मराईस इरास्मसांची (द.आ.) पंच म्हणून ५०वी कसोटी.
- पावसामुळे दुसऱ्या दिवशी फक्त ३५.२ षटकांचा खेळ होऊ शकला.
- क्रिस वोक्सचे (इं) पहिले कसोटी शतक.
- जेम्स ॲंडरसनने (इं) लाॅर्ड्सवरील १००वा कसोटी बळी घेतला.
३री कसोटी
१८-२२ ऑगस्ट २०१८ धावफलक |
भारत | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, गोलंदाजी.
- कसोटी पदार्पण : रिषभ पंत (भारत)
- अजिंक्य रहाणेच्या (भा) ३,००० कसोटी धावा.
- जेम्स ॲंडरसनचे (इं) भारताविरुद्ध १०० कसोटी बळी.
- हार्दिक पंड्याचे (भा) कसोटीमध्ये प्रथमच पाच बळी.
- जोस बटलरचे (इं) १००० कसोटी धावा व पहिले कसोटी शतक.
- विराट कोहलीचे (भा) २३वे कसोटी शतक.
- स्टुअर्ट ब्रॉड (इं) ४०० कसोटी बळी व ३००० कसोटी धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला.
४थी कसोटी
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) यांचा पंच म्हणून ५०वा कसोटी सामना.
- इशांत शर्मा (भा) भारतातर्फे २५० कसोटी बळी घेणारा सातवा गोलंदाज ठरला.
- विराट कोहलीचे (भा) ६,००० कसोटी धावा.
५वी कसोटी
७-११ सप्टेंबर २०१८ धावफलक |
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : हनुमा विहारी (भा).
- अलास्टेर कूकचा (इं) शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
- अजिंक्य रहाणेचा (भा) ५०वा कसोटी सामना.
- रिषभ पंतचे (भा) कसोटीत पहिले शतक व भारतातर्फे यष्टीरक्षक म्हणून इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत शतक ठोकणारा पहिला खेळाडू.
नोट्स
संदर्भ
- ^ "श्रेयस अय्यर, रायुडु इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील".
- ^ "इयॉन मॉर्गन करणार इंग्लंच्या टी२० संघाचे नेतृत्व" (इंग्रजी भाषेत). २० जून २०१८ रोजी पाहिले.
- ^ "सिध्दार्थ कौलला भारतीय संघात स्थान".