भारतीय उपखंड
क्षेत्रफळ | ४४ लक्ष चौरस किमी |
---|---|
लोकसंख्या | १.७ अब्ज |
स्वतंत्र देश | ७ |
भारतीय उपखंड हा दक्षिण आशियातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापलेला आहे. हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते. भौगोलिक दृष्टीने, 'उपखंड' ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वतःच्या प्रस्तरावर वसला आहे जो बाकीच्या आशियापेक्षा वेगळा आहे.