भारतीय आगमन दिन
भारतीय आगमन दिन हा कॅरिबियन बेटांमध्ये तसेच मॉरिशसमधील सुट्टीचा दिवस आहे. भारतातून वेठबिगारी मजूर या प्रदेशांत आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
गयाना
गयानामध्ये ५ मे रोजी हा दिवस पाळला जातो. ८ मे, १८३८ रोजी या देशात सर्वप्रथम भारतीय लोकांना येथे आणले गेले. सध्या या देशातील ४४% लोक स्वतःला भारतीय वंशाची म्हणवतात.
मॉरिशस
मॉरिशसमध्ये २ नोव्हेंबर रोजी हा दिवस पाळला जातो.
त्रिनिदाद आणि टॉबेगो
त्रिनिदाद आणि टॉबेगोमध्ये ३० मे रोजी हा दिवस पाळला जातो. या दिवशी १८३८मध्ये फतेह अल रझाक या जहाजातून भारतीय लोक येथे सर्वप्रथम पोचले.