Jump to content

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
स्थानगोवा, भारत
यजमान गोवा सरकार, चित्रपट महोत्सव संचालनालय
संकेतस्थळhttps://iffigoa.org/

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील जुना आणि भारतामधील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात इ.स. १९५२ पासून प्रारंभ झालेली आहे.[]

इतिहास

जगभरातली वेगवेगळ्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट कला सादर करण्यासाठी व चित्रपटाना सामायिक मंच पुरवण्याचा या चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे. सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्याच्या संदर्भातून विविध देशातली वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट संस्कृती जाणून त्यासाठी योगदान देण्यासाठी व जगभरातल्या लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव आयोजित केला जातो.

संदर्भ

  1. ^ "International Film Festival of India". iffigoa.org. 2021-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२२-०४-०२ रोजी पाहिले.