Jump to content

भारतामधील रेल्वे वाहतूक

भारत देशातील रेल्वेमार्गांचे जाळे

रेल्वे वाहतूक हा भारत देशामधील दळणवळणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रवासी तसेच मालवाहतूकीमध्ये देशात अग्रेसर असणारी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीखालील भारतीय रेल्वे देशात रेल्वेसेवा पुरवण्यासाठी जबाबदार आहे. २०२० साली सुमारे ८०९ कोटी प्रवाशांनी भारतात रेल्वे प्रवास केला तसेच ह्याच काळात सुमारे १२१ कोटी टन मालवाहतूक रेल्वेद्वारे करण्यात आली. सद्य स्थितीमध्ये भारतामधील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असून २०२० सालापासून काही प्रवासी व मालवाहतूक मार्गांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

२०२० साली भारत देशामध्ये ६७,९५६ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे होते. ह्या बाबतीत भारताचा जगभरात [[अमेरिका], रशियाचीन खालोखाल चौथा क्रमांक लागतो. भारतामधील रेल्वे वाहतूक प्रामुख्याने ब्रॉड गेजवर केली जाते व एप्रिल २०२१ मध्ये ४५,८८१ किमी लांबीच्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. भारतीय रेल्वेकडे आजच्या घडीला २,९३,०७७ मालवाहतूक करणाऱ्या वाघिणी, ७६,६०८ प्रवासी डबे तर १२,७२९ इंजिने आहेत.

इतिहास

भारतामधील ब्रिटिश राजवटीदरम्यान रेल्वे वाहतूक स्थपित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. १८४५ साली मद्रास रेल्वे व ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी तर १८४९ साली ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे ह्या कंपन्यांची स्थापना करण्यात आली. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईठाणे शहरांदरम्यान भारतामधील पहिलीवाहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली. १४ डबे असलेल्या ह्या गाडीला ओढायला तीन कोळशाची इंजिने होती. १८५४ साली हा मार्ग कल्याणपर्यंत वाढवला गेला. ह्याच वर्षी हावडा ते हूगळी दरम्यान पूर्व भारतातील पहिली गाडी धावली. त्यानंतर ब्रिटिशांनी देशभर रेल्वेचे जाळे उभे केले व १९२५ साली व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान देशातील विजेवर धावणारी पहिली रेल्वे सुरू झाली. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय रेल्वे अनेक क्षेत्रांमध्ये विभागण्यात आली. १९६९ साली पहिली राजधानी एक्सप्रेस तर १९८८ साली पहिली शताब्दी एक्सप्रेस चालू झाली. २०१९ साली संपूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस धावू लागली.

प्रवासी रेल्वे

आजच्या घडीला भारतामध्ये अनेक प्रकारच्या प्रवासी रेल्वे गाड्या चालवल्या जातात.

रेल्वेचा प्रकार वर्णन
वंदे भारत एक्सप्रेसदेशातील पहिली भारतीय बनावटीची अर्ध-द्रुतगती रेल्वे[] हिचे उद्घाटन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केले..
तेजस एक्सप्रेस
गतिमान एक्सप्रेसदेशातील सर्वात वेगवान रेल्वे
शताब्दी एक्सप्रेसकेवळ बसायची सोय असलेली गाडी
राजधानी एक्सप्रेसराजधानी दिल्लीला राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडणारी गाडी.
दुरंतो एक्सप्रेसदोन शहरांमध्ये विनाथांबा धावणारी गाडी.
हमसफर एक्सप्रेस
उदय एक्सप्रेस
गरीब रथ एक्सप्रेससंपूर्ण वातानुकुलीत असलेली कमी दरातील सेवा
युवा एक्सप्रेस
जनशताब्दी एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेसची किफायती आवृत्ती
संपर्क क्रांती एक्सप्रेस
कवी गुरू एक्सप्रेस रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ सुरू केलेली गाडी
विवेक एक्सप्रेसस्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जन्मवर्षानिमित्त सुरू केलेली गाडी
राज्यराणी एक्सप्रेस
महामना एक्सप्रेस पंडित मदनमोहन मालवीय ह्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ सुरू केलेली गाडी
अंत्योदय एक्सप्रेसअनारक्षित, जलद रेल्वेगाडी
जनसाधारण एक्सप्रेस
सुविधा एक्सप्रेस
भारतामधील पर्वतीय रेल्वे युनेस्कोची जागतिक वारसा स्थान असलेली रेल्वे[]

नागरी परिवहन

मेट्रो रेल्वे

भारतामधील बहुतांशी मेट्रो गाड्या प्रमाण गेजवर धावतात. आजच्या घडीला १३ शहरांमध्ये मेट्रो सेवा कार्यरत आहेत तर अनेक शहरांमध्ये मेट्रोचे नवे मार्ग उभारले जात आहेत.

नाव शहर राज्य मार्गिका स्थानके लांबी सुरुवात
दिल्ली मेट्रो
दिल्ली१०[]२५४ ३४८.१२ किमी (२१६.३१ मैल) २४ डिसेंबर २००२[]
हैद्राबाद मेट्रो हैद्राबाद व सिकंदराबादतेलंगणा५७ ६७ किमी (४२ मैल) २९ नोव्हेंबर २०१७[]
नम्मा मेट्रोबंगळूरकर्नाटक५२[]५६.१ किमी (३४.९ मैल)[]२० ऑक्टोबर २०११[]
चेन्नई मेट्रोचेन्नईतामिळनाडू ४२[]५४.१५ किमी (३३.६५ मैल)[१०]२९ जून २०१५[११]
कोलकाता मेट्रोकोलकातापश्चिम बंगाल[१२]३३[१३]३८.५६ किमी (२३.९६ मैल)[१२]२४ ऑक्टोबर १९८४[१४]
नागपूर मेट्रोनागपूरमहाराष्ट्र२४ २६.१० किमी (१६.२२ मैल) ८ मार्च २०१९[१५]
कोची मेट्रोकोचीकेरळ२२ २५.६ किमी (१५.९ मैल) १७ जून २०१७[१६]
नोएडा मेट्रोनोएडाग्रेटर नोएडाउत्तर प्रदेश२१ २५.६ किमी (१५.९ मैल) 25 January 2019[१७]
लखनौ मेट्रोलखनौउत्तर प्रदेश२१ २२.८७ किमी (१४.२१ मैल) ५ सप्टेंबर २०१७[१८]
जयपूर मेट्रोजयपूरराजस्थान[१९]११[१९]११.९७ किमी (७.४४ मैल) ३ जून २०१५[१९]
गुडगाव जलद मेट्रो गुरुग्राम हरियाणा११ ११.७ किमी (७.३ मैल)[२०]१४ नोव्हेंबर २०१३[२१]
मुंबई मेट्रो मुंबईमहाराष्ट्र१२[२२]११.४ किमी (७.१ मैल)[२२]८ जून २०१४[२२]
अहमदाबाद मेट्रोअहमदाबादगुजरात६ किमी (३.७ मैल) ४ मार्च २०१९[२३]

उपनगरी रेल्वे

मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता इत्यादी भारताच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये उपनगरी रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ह्या उपनगरी गाड्या भारतीय रेल्वे चालवत असून बहुतेक सर्व गाड्या इंजिनरहित विद्युत रेल्वे स्वरूपाच्या आहेत.

नाव शहर राज्य मार्गिका स्थानके लांबी सुरुवात
मुंबई उपनगरी रेल्वे महाराष्ट्र१५० ४२७.५० किमी (२६५.६४ मैल) १६ ॲप्रिल १८५३[२४]
कोलकाता उपनगरी रेल्वे कोलकाता महानगर क्षेत्र पश्चिम बंगाल२४ ४५८ १,५०१ किमी (९३३ मैल) १५ ऑगस्ट १८५४[२५]
चेन्नई उपनगरी रेल्वे चेन्नई महानगर क्षेत्र तामिळनाडू ३००+ १,१७४ किमी (७२९ मैल) १९३१[२६]
दिल्ली उपनगरी रेल्वे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रदिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा४६ ८५ किमी (५३ मैल) १ ऑक्टोबर १९७५[२७]
पुणे उपनगरी रेल्वे महाराष्ट्र१७ ६३ किमी (३९ मैल) ११ मार्च १९७८[२८]
हैद्राबाद एमएमटीएस हैद्राबाद महानगर तेलंगणा२८ ५० किमी (३१ मैल) ९ ऑगस्ट २००३[२९]
चेन्नई जलद परिवहन प्रणाली चेन्नईतामिळनाडू १८ १९.३४ किमी (१२.०२ मैल) १ नोव्हेंबर १९५५[३०]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ PTI (15 February 2019). "Vande Bharat Express achieves 130 kmph speed during inaugural run". Business Standard India. 1 April 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Toy Trains of India". Our Trips – Royal Train Tours. India Calling Tours (P) Limited. 8 ऑगस्ट 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 मे 2007 रोजी पाहिले.
  3. ^ "Present Network". Delhi Metro Rail Corporation. 8 March 2019.
  4. ^ "Indian PM launches Delhi metro". BBC News. 24 December 2002. 22 April 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "Hyderabad Metro rail flagged off today: See fares, timings, routes and other features". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 28 November 2017. 28 November 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Metro Phase I Will be Ready by May, to Miss Deadline". The New Indian Express. 22 October 2015. 2016-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-08 रोजी पाहिले.
  7. ^ "Bengaluru Metro: CM Bommai, Hardeep Puri inaugurate extended stretch on Purple Line". Indian Express. 30 August 2021.
  8. ^ "South India's first underground Metro launch on April 29". The Times of India. 26 April 2016 रोजी पाहिले.
  9. ^ "Stations in Chennai Metro rails Phase I extension will be renamed". The Hindu. 5 October 2020. 6 October 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "Over 6 Crore people have travelled through Chennai Metro". The Hindu. 28 January 2020. 29 January 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "Chennai's First Metro rail ride begins". The Hindu. 29 June 2015. 3 April 2016 रोजी पाहिले.
  12. ^ a b "ইস্ট-ওয়েস্ট মেট্রো: বিধাননগরের সঙ্গে জুড়ে গেল ফুলবাগান". www.anandabazar.com. 4 October 2020. 29 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 October 2020 रोजी पाहिले.
  13. ^ "Kolkata: East-West first metro ride turns personal milestone for the passengers". Times of India. 15 February 2020. 16 February 2020 रोजी पाहिले.
  14. ^ "Kolkata Metro Rail Corporation Ltd". Kmrc.in. 2 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 January 2016 रोजी पाहिले.
  15. ^ ANI (7 March 2019). "Delhi: Prime Minister Narendra Modi flags-off Nagpur Metro via video conferencing.pic.twitter.com/0n6ohgcok3". @ANI (पोर्तुगीज भाषेत). 8 March 2019 रोजी पाहिले.
  16. ^ "Kochi Metro a 'futuristic infrastructure that will contribute to India's growth': What PM Modi said at inauguration". The Indian Express. 17 June 2017. 30 July 2017 रोजी पाहिले.
  17. ^ "Aqua Line ready for launch, nod awaited from UP". The Times of India. 22 December 2018 रोजी पाहिले.
  18. ^ Rawat, Virendra Singh (16 November 2015). "Lucknow Metro Rail fastest and most economical project in India". Business Standard. 13 September 2017 रोजी पाहिले.
  19. ^ a b c "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 मार्च 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 3 जून 2015 रोजी पाहिले.
  20. ^ "Gurgaon's own Metro". Hindustan Times. 15 July 2009.
  21. ^ "Rapid MetroRail Gurgaon opens". Railway Gazette. 2013-11-15. 2018-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-28 रोजी पाहिले.
  22. ^ a b c "Mumbai Metro Blue Line 1 starts for public". India Today. 8 June 2014. 19 October 2020 रोजी पाहिले.
  23. ^ "Ahmedabad Metro to open for public on Wednesday - Times of India". The Times of India. 10 March 2019 रोजी पाहिले.
  24. ^ "The History Of Mumbai's Local Trains In 1 Minute". The Culture Tip. 13 September 2016.
  25. ^ Railway, Eastern (31 March 2020). "ERSY 2020 FINAL" (PDF).
  26. ^ Menon, Nitya (18 April 2014). "83 years of electric suburban rail". The Hindu. Chennai. 18 April 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 Apr 2014 रोजी पाहिले.
  27. ^ "Delhi's mega plan to link capital ring rail metro network". Hindustan Times.
  28. ^ Umbrajkar, Manish (12 March 2013). "Pune-Lonavla EMU train service completes 35 years". The Times of India. 23 September 2014 रोजी पाहिले.
  29. ^ 9 August 2003. "Advani flags off Hyderabad MMTS" (इंग्रजी भाषेत). Times of India. 2020-02-29 रोजी पाहिले.
  30. ^ "Development of MRTS in Chennai". CMDA. 2023-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-09 रोजी पाहिले.