Jump to content

भारतामधील धर्म

२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील जिल्ह्यानिहाय धर्म
  हिंदू
  मुसलमान
  ख्रिश्चन
  शीख
  बौद्ध
  इतर

भारतातील धर्म धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने ओळखले जातात. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय उपखंड हा हिंदू सभ्यता / संस्कृतिचा बौद्ध, जैन , वैदिक,आणि शीख या जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासात 'धर्म' हा देशाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कायदा आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात; भारताच्या संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. जवळजवळ ९३% भारतीय आपापल्या धर्माचे पालन करताना आढळतात.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान १४.२%, ख्रिश्चन २.३%, शीख १.९%, बौद्ध ०.७% व जैन ०.४% आहेत. या व्यतिरिक्त झोराष्ट्रीयन व यहूदी व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ०.६% आहे. काही अभ्यासक आणि विद्वानांच्या मते भारताच्या लोकसंख्येत ५.५ ते ६% बौद्ध धर्मीय आहेत. धार्मिक विविधतेमुळेच आज भारतामधे अनेक धर्म व सामाजिक एकीकरण पाहावयास आढळतात. यातील काही धर्म भारतात आलेल्या व्यापारी, प्रवासी, आक्रमणकर्ते व राज्यकर्ते यांच्याकडून प्रचार केले गेलेले आहेत.

योग, ध्यान, आयुर्वेद चिकित्सा, होरा, कर्म व पुनर्जन्म या सारखे हिंदू व बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत असलेले अनेक पैलू धर्मप्रचारकांनी पाश्चिमत्य देशांमधे लोकप्रिय केले आहेत. जगभरामधे हिंदू धर्माचा लक्षणीय असा प्रभाव पडलेला आहे. हरे कृष्णा चळवळ, ब्रह्मकुमारी, आनंद मार्ग अशा अनेक संस्था भारतीय आध्यात्मिक विचारांचे प्रवर्तन करत असतात.

इतिहास

सांख्यिकी

भारतामध्ये सहा धर्म आहेत ज्यांना "राष्ट्रीय अल्पसंख्याक" दर्जा दिला आहे — मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि झोराष्ट्रियन (पारशी).[][]

१९५१ च्या जनगणनेत भारतातील बौद्धांची संख्या अवघी ०.०५% (१.८१ लाख) होती, त्यानंतर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामूहिक बौद्ध धर्मांतरानंतर १९६१ च्या जनगणनेत बौद्धांच्या संख्येत सुमारे १७००% अशी लक्षणीय वाढ होऊन त्यांची संख्या ०.७४% (३२.५० लाख) झाली होती.

भारतातील प्रमुख धार्मिक समूहांच्या लोकसंख्येची वृद्धी (१९५१ ते २०११)
धार्मिक
समूह
लोकसंख्या
% १९५१
लोकसंख्या
% १९६१
लोकसंख्या
% १९७१
लोकसंख्या
% १९८१
लोकसंख्या
% १९९१
लोकसंख्या
% २००१
लोकसंख्या
% २०११[]
हिंदू धर्म ८४.७९%८३.४५%८२.७३%८२.३०%८१.५३%८०.४६%७९.८०%
इस्लाम ९.८%१०.६९%११.२१%११.७५%१२.६१%१३.४३%१४.२३%
ख्रिश्चन धर्म २.३%२.४४%२.६०%२.४४%२.३२%२.३४%२.३०%
शीख धर्म १.७९%१.७९%१.८९%१.९२%१.९४%१.८७%१.७२%
बौद्ध धर्म ०.०५%०.७४%०.७०%०.७१%०.७६%०.७७%०.७०%
जैन धर्म ०.४६%०.४६%०.४८%०.४७%०.४०%०.४१%०.३७%
झोराष्ट्रियन ०.१३%०.०९%०.०९%०.०९%०.०८%०.०६%अज्ञात
इतर/निधर्मी ०.४३%०.४३%०.४१%०.४२%०.४४%०.७२%०.९%


भारतीय धार्मिक समुदायांचे विघटन खालीलप्रमाणे आहे:

धार्मिक समूहांची वैशिष्ट्ये[]
धार्मिक
समूह
लोकसंख्या (२०११)
%
वृद्धी
(२००१-२०११)[][]
लिंग गुणोत्तर (२०११)
(एकूण)[]
लिंग गुणोत्तर (२०११)
(नागरी)
लिंग गुणोत्तर (२०११)
(शहरी)
लिंग गुणोत्तर (२०११)
(बालक)[]
साक्षरता (२०११)
(%)[]
कामातील सहभाग (२०११)
(%)[][१०]
हिंदू धर्म ७९.८०%१६.८%९३९९४६९२१९१३७३.३%४१.०%
इस्लाम धर्म १४.२३%२४.६%९५१९५७९४१९४३६८.५%३२.६%
ख्रिश्चन धर्म २.३०%१५.५%१०२३१००८१०४६९५८८४.५%४१.९%
शीख धर्म १.७२%८.४%९०३९०५८९८८२८७५.४%३६.३%
बौद्ध धर्म ०.७०%६.१%९६५९६०९७३९३३८१.३%४३.१%
जैन धर्म ०.३७%५.४%९५४९३५९५९८८९९४.९%३५.५%
इतर/निधर्मी ०.९०%अज्ञात९५९९४७९७५९७४अज्ञातअज्ञात

धर्म

हिंदू धर्म

भारतातील विविध राज्यात हिंदू धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २००१)[११]

इस्लाम धर्म

भारतामधील १७.१४ कोटी मुसलमानांची लोकसंख्या ही (इंडोनेशियापाकिस्तान नंतर) जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी शिया मुसलमानांची लोकसंख्यादेखील भारतामध्येच आहे. मोईनुद्दीन चिस्ती व निझामुद्दीन अवलिया या प्रसिद्ध सुफी संतांचे दर्गे भारतामधे आहेत, जेथे जगभरामधून यात्रेकरू येतात. ताजमहाल या स्थापत्याचा नमुना असलेल्या वास्तूदेखील भारतात आहेत.

ख्रिश्चन धर्म

भारतातील विविध जिल्ह्यातील ख्रिस्ती धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)[१२]

शीख धर्म

भारतातील विविध जिल्ह्यातील शीख धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)

बौद्ध धर्म

भारतातील विविध जिल्ह्यातील बौद्ध धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)

जैन धर्म

झोराष्ट्रीयन धर्म

झोराष्ट्रीयन व यहूदी धर्मांचाही भारताशी निगडीत असा प्राचीन इतिहास आहे व या धर्मांचे पालनकर्तेदेखील काही हजारांच्या संख्येत आजही भारतात आढळतात. बहाई व झोराष्ट्रीयन धर्माची जगभरातील सर्वात मोठी लोकवस्ती भारतातच आढळते. अनेक जागतिक धर्मांची भारतीय अध्यात्माशी नाळ जोडली गेलेली आहे. उदा. बहाई धर्मियांना अशा विश्वास आहे की गौतम बुद्धकृष्ण हे सर्वशक्तिमान परमेश्वराचंच रूप आहेत.

निधर्मी

कायदा

पैलू

धर्म आणि राजकारण

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "National minority status for Jains" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Jains become sixth minority community - Latest News & Updates at Daily News & Analysis" (इंगजी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ इंगजी. "Population by religious community - 2011". एकूण लोकसंखेला विशिष्ट धर्माच्या संख्यात्मक आकडेवारीने भागून काढलेली आहे.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; census_2011_religion नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ Aloke Tikku (26 August 2015). "Muslim population grows marginally faster: Census 2011 data". Hindustan Times. 18 October 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Census 2011: Hindus dip to below 80 per cent of population; Muslim share up, slows down". The Indian Express. 26 August 2015. 20 July 2016 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Census 2011: Sikhs, Jains have the worst sex ratio - Latest News & Updates at Daily News & Analysis". 31 December 2015. 20 July 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "The Times Group". 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2016 रोजी पाहिले.
  9. ^ "Jains most literate in North, Muslims the least". 4 January 2016. 20 July 2016 रोजी पाहिले.
  10. ^ "Only 33% of Muslims work, lowest among all religions - Times of India". 20 July 2016 रोजी पाहिले.
  11. ^ Population by religious communities Census of India, Ministry of Home Affairs, Govt of India
  12. ^ "Population by religious communities". 5 March 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे