Jump to content

भारतामधील उच्च न्यायालयांची यादी

भारत देशाची न्यायव्यवस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालय व राज्य पातळीवर २५ उच्च न्यायालयांवर आधारित आहे. ह्या उच्च न्यायालयांचा अंमल एका किंवा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर असू शकतो. ह्या सर्व उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतो.

कलकत्ता उच्च न्यायालय, कोलकाता. देशातील पहिल्या चार उच्च न्यायालयांंपैकी एक.

रचना

मुख्य न्यायाधीश आणि राज्याच्या राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयांचे नेतृत्व मुख्य न्यायाधीश करतात. मुख्य न्यायाधीश चौदावा (त्यांच्या संबंधित राज्यांत) आणि सतराव्या क्रमांकाच्या (त्यांच्या संबंधित राज्यांच्या बाहेरील) भारतीय प्राधान्याच्या आदेशानुसार नेमणुकी करतात. गेल्या पाच वर्षात मुख्य खटल्यांच्या सरासरी संस्थेचे राष्ट्रीय सरासरीने विभाजन करून किंवा उच्च न्यायालयात दर वर्षी न्यायाधीशांच्या मुख्य खटल्यांच्या निकालाचे सरासरी दर लक्षात घेऊन जे उच्च आहे त्यावरून कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित केली जाते.

यादी

क्र. न्यायालय स्थापित स्थापित अधिनियम न्यायक्षेत्र स्थान मंच न्यायाधीश.[]
अलाहाबाद उच्च न्यायालय[]११ जून १८६६ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१उत्तर प्रदेशअलाहाबाद लखनौ९५
आंध्र प्रदेश उच्च न्यायालय५ जुलै १९५४ आंध्र राज्य अधिनियम, १९५३आंध्र प्रदेशअमरावती ३९
मुंबई उच्च न्यायालय१४ ऑगस्ट १८६२ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर-हवेली, दमण आणि दीव. मुंबईनागपूर, पणजी, औरंगाबाद ६०
कलकत्ता उच्च न्यायालय२ जुलै १८६२ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार कलकत्तापोर्ट ब्लेयर (क्षेत्र मंच) ६३
छत्तीसगड उच्च न्यायालय११ जानेवारी २००० मध्य प्रदेश पुनर्गठन अधिनियम, २०००छत्तीसगढबिलासपूर०८
दिल्ली उच्च न्यायालय[]३१ ऑक्टोबर १९६६ दिल्ली उच्च न्यायालय अधिनियम, १९६६राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली)नवी दिल्ली३६
गोहत्ती उच्च न्यायालय[]१ मार्च १९४८ भारत सरकार अधिनियम, १९३५अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालॅंड, मिझोरमगुवाहाटीकोहिमा, ऐझॉलइटानगर२७
गुजरात उच्च न्यायालय१ मे १९६०. बॉम्बे पुनर्गठन अधिनियम, १९६०गुजरातअमदावाद ४२
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय२५ जानेवारी १९७१ हिमाचल प्रदेश अधिनियम, १९७०हिमाचल प्रदेशसिमला
१० जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय२८ ऑगस्ट १९४३ पत्र अधिकार-दान-पत्र काश्मीरचे महाराजा यांनी जारी. जम्मू आणि काश्मीर श्रीनगर & जम्मू[]१४
११ झारखंड उच्च न्यायालय १५ नोव्हेंबर २००० बिहार पुनर्गठन अधिनियम, २०००झारखंडरांची१२
१२ कर्नाटक उच्च न्यायालय[]१८८४ म्हैसूर उच्च न्यायालय अधिनियम, १८८४कर्नाटकबंगळूरक्षेत्र मंच: हुबळी-धारवाड व गुलबर्गा ४०
१३ केरळ उच्च न्यायालय[]१ नोव्हेंबर १९५६ राज्य पुनर्गठन अधिनियम, १९५६केरळ, लक्षद्वीपकोची४०
१४ मध्य प्रदेश उच्च न्यायालय[]२ जानेवारी १९३६ भारत सरकार अधिनियम, १९३५मध्य प्रदेशजबलपुर ग्वाल्हेर, इंदूर४२
१५ मद्रास उच्च न्यायालय१५ ऑगस्ट १८६२ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१तमिळनाडू, पाँडिचेरीचेन्नईमदुरा ४७
१६ मणिपूर उच्च न्यायालय २५ मार्च २०१३ ईशान्य क्षेत्र पुनर्गठन अधिनियम, २०१२मणिपूरइम्फाळ
१७ मेघालय उच्च न्यायालय २५ मार्च २०१३ ईशान्य क्षेत्र पुनर्गठन अधिनियम, २०१२मेघालयशिलॉंग
१८ ओरिसा उच्च न्यायालय३ एप्रिल १९४८ ओरिसा उच्च न्यायालय आदेश, १९४८ओरिसा कटक२७
१९ पाटणा उच्च न्यायालय२ सप्टेंबर १९१६ भारत सरकार अधिनियम, १९१५बिहारपाटणा४३
२० पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय[]८ नोव्हेंबर १९४७ उच्च न्यायालय (पंजाब) आदेश, १९४७पंजाब, हरियाणा, चंदीगड चंदीगड ५३
२१ राजस्थान उच्च न्यायालय२१ जून १९४९ राजस्थान उच्च न्यायालय अध्यादेश, १९४९राजस्थानजोधपूरजयपूर४०
२२ सिक्कीम उच्च न्यायालय१६ मे १९७५ ३८ वे संशोधन भारतीय राज्यघटनेतीलसिक्कीमगंगटोक०३
२३ तेलंगणा उच्च न्यायालय १ जानेवारी २०१९ आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४तेलंगणाहैदराबाद४२
२४ त्रिपुरा उच्च न्यायालय २६ मार्च २०१३ ईशान्य क्षेत्र पुनर्गठन अधिनियम, २०१२त्रिपुराआगरताळा
२५ उत्तराखंड उच्च न्यायालय९ नोव्हेंबर २००० उत्तर प्रदेश पुनर्गठन अधिनियम, २०००उत्तराखंडनैनिताल०९

संदर्भ

  1. ^ न्यायालयातील न्यायाधीशांची ही कमाल मंजूर संख्या आहे.
  2. ^ मूलतः आग्रा येथे स्थापित. १८७५ साली अलाहाबादला स्थानांतरित.
  3. ^ लाहौर उच्च न्यायालय स्थापित २१ मार्च १९१९. न्यायक्षेत्र पंजाब प्रांत व दिल्ली. ११ ऑगस्ट १९४७ मध्ये वेगळे पंजाब उच्च न्यायालय भारतीय स्वतंत्र अधिनियमप्रमाणे सिमला येथे स्थापित करण्यात आले. ह्या उच्च न्यायालयाचे न्यायक्षेत्र पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशहरियाणा होते. १९६६ साली पंजाब राज्याच्या पुनर्रचनेमध्ये या न्यायालयास पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय हे नाव दिले गेले. ३१ ऑक्टोबर १९६६मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना करून त्याचे स्थान सिमला येथे ठेवण्यात आले.
  4. ^ मुळचे नाव - आसाम व नागालॅंड उच्च न्यायालय. १९७१ साली पूर्वोत्तर क्षेत्र (पुनर्गठन) अधिनियम, १९७१प्रमाणे नाव गुवाहाटी उच्च न्यायालय ठेवण्यात आले.
  5. ^ श्रीनगर ही काश्मीरची उन्हाळी राजधानी तर जम्मू ही हिवाळी राजधानी आहे.
  6. ^ मुळात, म्हैसूर उच्च न्यायालय. १९७३ साली नाव बदलून कर्नाटक उच्च न्यायालय ठेवण्यात आले.
  7. ^ त्रावणकोर-कोचीन उच्च न्यायालयाची स्थापना जुलै ७ १९४९ साली अर्नाकुलम येथे करण्यात आली. केरळ राज्याची स्थापना राज्य पुनर्गठन अधिनियम, १९५६च्या मार्फत करण्यात आली. या अधिनियमाने त्रावणकोर-कोचीन उच्च न्यायालय बरखास्त करून केरळ उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  8. ^ भारत सरकार अधिनियम, १९३५ प्रमाणे नागपूर येथे उच्च न्यायालयची स्थापना झाली होती. राज्य पुनर्रचनेनंतर हे उच्च न्यायालय १९५६ साली जबलपूर येथे स्थालांतरित करण्यात आले.
  9. ^ मूलतः पंजाब उच्च न्यायालय नंतर १९६६ साली त्याचे नामकरन पंजाब व हरयाणा उच्च न्यायालय करण्यात आले.