भारतातील स्त्री भ्रूणहत्या
स्त्री भ्रूणहत्या म्हणजे नवजात मुलींची जाणीवपूर्वक केलेली हत्या.
'पुरुषप्रधान संस्कृती' आणि 'पुरुषवर्चस्वी समाज' अशा प्रकारची मानसिकता असलेल्या समाजात / कुटुंबात मुलांच्या (पुरुषांच्या) जन्माला प्राधान्य देऊन स्त्रियांच्या जन्मास विरोध केला जातो. अशा प्रसंगी स्त्रीच्या पोटातील गर्भाचे निदान करून तो गर्भ स्त्रीचा असल्यास गर्भपात करून त्याला नष्ट करण्यात येते. ह्यासाठी भारतात कायद्याने लिंग निदानाला बंदी आहे.
भारतातील लिंगप्रमाणात लोकसंख्या
१९०१ साली ९७२ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती. २००१ साली ९३३ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती.
महाराष्ट्रातील सहा वर्षांच्या खालील मुलींचे प्रमाण सन २००१ मध्ये ९१३ असे होते. मात्र २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ८८३ इतके म्हणजे जवळ जवळ ३०% खाली उतरले आहे. [१]
हे प्रकार रोखण्यासाठी शासनामार्फत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र - लिंगनिवडीस प्रतिबंध कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ उपलब्ध आहेत.
अलीकडील बदल
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी भारत सरकार कडून सर्व सोनोग्राफी सेंटरवर "सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन' बसविले जाणार आहे. हे यंत्र सोनोग्राफी यंत्रावर बसविले जाईल. त्याद्वारे संबंधित डॉक्टरने स्त्री भ्रूण असल्याची तपासणी केली का? याची नोंद होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तपासणीची नोंद होईल. त्या आधारे जिल्हा रुग्णालयाचा पथकाला संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणे सोयीचे होणार असून, स्त्री भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "भयानक स्त्री भ्रूण हत्या". https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/8882901.cms. 2019-12-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-10-30 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)