Jump to content

भारताचे स्वायत्त प्रशासकीय विभाग

भारतातील स्वायत्त परिषद
ईशान्य भारतातील स्वायत्त परिषद

भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीत स्वायत्त प्रशासकीय विभागांच्या स्थापनेस परवानगी देण्यात आली आहे ज्यांना आपापल्या राज्यात स्वायत्तता देण्यात आली आहे.[] यापैकी बहुतेक स्वायत्त जिल्हा परिषदा ईशान्य भारतात आहेत आणि दोन लडाख या केंद्रशासित प्रदेशात देखील आहेत. सध्या आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरामधील १० स्वायत्त परिषदा सहाव्या अनुसूचीच्या[] आधारे स्थापित करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित परिषदांची इतर कायद्यांचा परिणाम म्हणून ही स्थापना केली गेली आहे.

अधिकार आणि क्षमता

कार्यकारी आणि वैधानिक अधिकार

भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीतील तरतुदींनुसार स्वायत्त जिल्हा परिषद खालील भागात कायदे, नियम आणि नियमन ठरवू शकतात:[]

  • जमीन व्यवस्थापन
  • वन व्यवस्थापन
  • जल संसाधने
  • शेती आणि लागवड
  • ग्रामीण परिषदेची स्थापना
  • सार्वजनिक आरोग्य
  • स्वच्छता
  • ग्रामीण आणि नगर पातळीवर पोलीस व्यवस्था
  • पारंपारिक सरदार आणि प्रमुखांची नेमणूक
  • मालमत्तेचा वारसा
  • लग्न आणि घटस्फोट
  • सामाजिक प्रथा
  • कर्ज आणि व्यापार
  • खाण आणि खनिज

न्यायिक अधिकार

दोन्ही पक्ष अनुसूचित जमातीचे सदस्य असलेल्या आणि जास्तीत जास्त शिक्षा ५ वर्षांपेक्षा कमी कारावासाची असो शकणाऱ्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्वायत्त जिल्हा परिषदांना न्यायालये स्थापन करण्याचे अधिकार आहेत.[]

कर आणि महसूल

इमारती आणि जमीन, प्राणी, वाहने, नौका, त्यांच्या क्षेत्रात वस्तूंचा प्रवेश, रस्ते, फेरी, पूल, रोजगार आणि उत्पन्न आणि शाळा आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी सामान्य कर यासाठी स्वायत्त जिल्हा परिषदांना कर, शुल्क आणि पथकर आकारण्याचे अधिकार आहेत.[]

स्वायत्त प्रशासकीय विभागांची यादी

भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वायत्त जिल्हा परिषद ठळकपणे दाखविल्या आहेत.

राज्य / केंद्रशासित प्रदेश स्वायत्त परिषद मुख्यालय जिल्हे /उपविभाग संस्थापन शेवटली निवडणूक सत्ताधारी पक्षमुख्य कार्याधिकारी
आसामबोडोलँडकोक्राझारबाक्सा, चिरांग, कोक्राझार, उदालगुडी २००३ २०२० भाजप आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि गण सुरक्षा पार्टी प्रमोद बोरो
देवरी स्वायत्त परिषद नारायणपूर लखीमपूर२००५ २०१६ भाजपमाधव देवरी
उत्तर कचर हिल्स/दमा हासाओ स्वायत्त परिषद हाफलाँगदिमो हसाओ१९५१ २०१९ भाजपदेबोलाल गोर्लोसा
कर्बी आंगलाँग स्वायत्त परिषद दिफूकर्बी आंगलाँग, पश्चिम कर्बी आंगलाँग १९५२ २०१७ भाजपतुलीराम रोंगहांग
मोरान स्वायत्त परिषद ** तिनसुकिया जिल्हा२०२० Not yet **
मिसिंग स्वायत्त परिषद धेमाजीधेमाजी१९९५ २०१९ भाजप आणि

सन्मीलीता गण शक्ती

रानोज पेगू
राभा हासोंग स्वायत्त परिषद दुधनोई कामरूप ग्रामीण, गोवालपारा१९९५ २०१९ भाजप & रभा हसोंग संयुक्त आंदोलन समिती टंकेश्वर राभा
सोनोवाल कचरी स्वायत्त परिषद दिब्रुगढ२००५ २०१९ भाजप
थेंगाल कचरी स्वायत्त परिषद टिटाबार २००५ २०१६ भाजप
तिवा (लालुंग)स्वायत्त परिषद मोरीगाव, बंगईगांव,

धुब्री

कामरूप (महानगर), मोरीगाव, नागाव आणि होजाई १९९५ २०२० भाजप
मातक स्वायत्त परिषद २०२०
बोडो कचरी कल्याण स्वायत्त परिषद २०२०
कामतपूर स्वायत्त परिषद २०२०
लडाखकारगील कारगील कारगील २०१८ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपफिरोझ अहमद
लेह लेहलेह२०२० भाजपतशी ग्यालसोन
मणिपूरचंदेलचंदेल २०१५
चुराचांदपूरचुराचांदपूर २०१५
सादर हिल्स कांगपोक्पि सैकुल, सैतु आणि सादर हिल्स, कांगपोक्पि जिल्ह्याचे पश्चिमी विभाग २०१५
सेनापतीसेनापती २०१५
तामेंगलाँगतामेंगलाँग२०१५
उख्रुलउख्रुल२०१५
मेधालायगारो हिल्स तुरा पूर्व गारो हिल्स , पश्चिम गारो हिल्स , दक्षिण गारो हिल्स, उत्तर गारो हिल्स आणि नैऋत्य गारो हिल्स२०१५ -- दिपूला मारक
जैंतिया हिल्स जोवाईपूर्व जैंतिया हिल्स, पश्चिम जैंतिया हिल्स१९७३ २०१९ नॅपीपा आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी
खासी हिल्स शिलॉंगपश्चिम खासी हिल्स, पूर्व खासी हिल्स आणि री भोई १९७३ २०१९ युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅपीपा
मिझोरमचकमा कमलानगर तुईचॉंग उपविभाग २०१८ मिझो राष्ट्रीय दल दुर्ज्या धान चकमा
लाई लाँग्ट्लाइलाँग्ट्लाइ उपविभाग, सांगाव उपविभाग २०२० मिझो राष्ट्रीय दल टी झाकुंगा
मारा सैहासैहा उपविभाग, टिपा उपविभाग २०१७ भाजपएन झाखाई
त्रिपुरात्रिपुरा जनजाती क्षेत्र खुमुलव्ङ पश्चिम त्रिपुरा २०२१ प्रौद्योत बिक्रम माणिक्य देबर्मन
पश्चिम बंगालगोरखालँड दार्जीलिंगदार्जीलिंग, कामिलपोंग जिल्हा २०१२ -- अनित थापा

वस्तुतः स्वराज्य क्षेत्र

उत्तर सेंटिनल बेट

उत्तर सेंटिनल बेट हा अंदमान आणि निकोबार बेटांच्या साखळीमध्ये स्थित आहे जो भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. हे बेट सेंटिनली लोकांचे निवास स्थळ आहे जगातील शेवटल्या अल्पित जमातींपैकी आहेत. ते इतर लोकांशी कोणताही संपर्क नाकारतात आणि आधुनिक संस्कृतीद्वारे अक्षरशः अस्पर्श राहिलेल्या शेवटच्या लोकांमध्ये आहेत. या बेटावरील लोकांशी कोणताही करार केलेला नाही किंवा शारीरिक व्यवसायाची नोंद झालेली नाही.

स्थानिक सरकारने (अंदमान निकोबार बेट) नमूद केले आहे की सेंटिनेली लोकांच्या जीवनशैली किंवा निवासस्थानामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. डिसेंबर २००४ च्या त्सुनामीच्या परिणामामुळे या बेटाला गंभीरपणे त्रास सहन करावा लागला असला तरी, या घटनेच्या काही दिवसानंतर, भारतीय सरकारच्या हेलिकॉप्टरने या बेताचे निरीक्षण करीत असतांना येथील लोकांनी या हेलीकॉप्टरवर परताविण्यासाठी बाण मारले.

कोणत्याही औपचारिक करार केले नसले नाही तरी, किमान हस्तक्षेप करण्याचा अधिकृत धोरणाने त्यांना वास्तविक केंद्रीय आणि स्थानिक प्रशासनाच्या संकल्पनाचौकटीत या बेटाला स्वायत्तता आणि सार्वभौमत्व लाभले आहे. []

संदर्भ

  1. ^ "Sixth Schedule of The Constitution of India" (PDF).
  2. ^ https://www.firstpost.com/india/union-cabinet-approves-amendment-in-sixth-schedule-to-strengthen-10-north-east-autonomous-councils-5951561.html
  3. ^ "Sixth Schedule of The Constitution of India" (PDF).
  4. ^ "Sixth Schedule of The Constitution of India" (PDF).
  5. ^ "Sixth Schedule of The Constitution of India" (PDF).
  6. ^ "Administration in India's Andaman and Nicobar Islands has finally decided upon a policy of minimal interference". 2012-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-08-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे