Jump to content

भारताचे राष्ट्रचिन्ह

भारताचे बोधचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.[]

मूळ अशोक स्तंभ

सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर ४ उभे आशियायी सिंह कोरले आहेत. या सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे.

सारनाथ येथील अशोक स्तंभ

राजकीय प्रतीक

भारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपी मध्ये सत्यमेव जयते लिहिले आहे. मूळ स्तंभामधील कमळ राजकीय प्रतीकामधून वगळण्यात आले आहे.

भारतातील राज्यांची प्रतीके

भारतातील राज्यांना त्यांची स्वतःची प्रतीके आहेत.

संदर्भ

  1. ^ "भारत सरकारच्या संकेतस्थळावरील माहिती" (इंग्रजी भाषेत). 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-10-29 रोजी पाहिले.