Jump to content

भारताचे परराष्ट्रमंत्री

भारताचे परराष्ट्रमंत्री
Minister of External Affairs
विद्यमान
सुब्रमण्यन जयशंकर

३० मे, २०१९ पासून
परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ताराष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २ सप्टेंबर १९४६
पहिले पदधारकजवाहरलाल नेहरू
संकेतस्थळपरराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ

भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.

परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.

परराष्ट्रमंत्र्यांची यादी

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू२ सप्टेंबर १९४६ २७ मे १९६४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसजवाहरलाल नेहरू
गुलझारीलाल नंदा२७ मे १९६४ ९ जून १९६४ गुलझारीलाल नंदा
(कार्यवाहू)
लाल बहादूर शास्त्री९ जून १९६४ १७ जुलै १९६४ लाल बहादूर शास्त्री
सरदार स्वरणसिंग१८ जुलै १९६४ १४ नोव्हेंबर १९६६ लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
एम.सी. छगला१४ नोव्हेंबर १९६६ ५ सप्टेंबर १९६७ इंदिरा गांधी
इंदिरा गांधी६ सप्टेंबर १९६७ १३ फेब्रुवारी १९६९
दिनेश सिंग१४ फेब्रुवारी १९६९ २७ जून १९७०
सरदार स्वरणसिंग२७ जून १९७० १० ऑक्टोबर १९७४
यशवंतराव चव्हाण१० ऑक्टोबर १९७४ २४ मार्च १९७७
अटलबिहारी वाजपेयी२६ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्षमोरारजी देसाई
श्याम नंदन प्रसाद मिश्रा२८ जुलै १९७९ १३ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)चरण सिंग
पी.व्ही. नरसिंह राव १४ जानेवारी १९८० १९ जुलै १९८४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
इंदिरा गांधी१९ जुलै १९८४ ३१ ऑक्टोबर १९८४
राजीव गांधी३१ ऑक्टोबर १९८४ २४ सप्टेंबर १९८५ राजीव गांधी
बलीराम भगत२५ सप्टेंबर १९८५ १२ मे १९८६
पी. शिवशंकर१२ मे १९८६ २२ ऑक्टोबर १९८६
नारायण दत्त तिवारी२२ ऑक्टोबर १९८६ २५ जुलै १९८७
राजीव गांधी २५ जुलै १९८७ २५ जून १९८८
पी.व्ही. नरसिंह राव २५ जून १९८८ २ डिसेंबर १९८९
विश्वनाथ प्रताप सिंग २ डिसेंबर १९८९ ५ डिसेंबर १९८९ जनता दल
(तिसरी आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
इंदर कुमार गुजराल ५ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९०
विद्याचरण शुक्ला२१ नोव्हेंबर १९९० २० फेब्रुवारी १९९१ समाजवादी जनता पक्ष
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
माधवसिंह सोळंकी२१ जून १९९१ ३१ मार्च १९९२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव ३१ मार्च १९९२ १८ जानेवारी १९९३
दिनेश सिंग१८ जानेवारी १९९३ १० फेब्रुवारी १९९५
प्रणव मुखर्जी १० फेब्रुवारी १९९५ १६ मे १९९६
सिकंदर बख्त२१ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्षअटलबिहारी वाजपेयी
इंदर कुमार गुजराल १ जून १९९६ १८ मार्च १९९८ जनता दल
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
अटलबिहारी वाजपेयी१९ मार्च १९९८ ५ डिसेंबर १९९८ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंत सिंग ५ डिसेंबर १९९८ २३ जून २००२
यशवंत सिन्हा१ जुलै २००२ २२ मे २००४
नटवर सिंग२२ मे २००४[]६ नोव्हेंबर २००५[]भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग६ नोव्हेंबर २००५ २४ ऑक्टोबर २००६
प्रणव मुखर्जी २४ ऑक्टोबर २००६[]२२ मे २००९
एस.एम. कृष्णा२२ मे २००९ २६ ऑक्टोबर २०१२
सलमान खुर्शीद२८ ऑक्टोबर २०१२ २६ मे २०१४
सुषमा स्वराज२६ मे, २०१४ ३० मे, २०१९ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
सुब्रह्मण्यम जयशंकर३० मे, २०१९ विद्यमानभारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

संदर्भ

  1. ^ Rediff.com dated २२ मे २००४, accessed २५ ऑक्टोबर २००
  2. ^ BBC News[permanent dead link] dated ७ नोव्हेंबर २००५, accessed २५ ऑक्टोबर २००
  3. ^ The Hindu Archived 2006-11-09 at the Wayback Machine. dated २५ ऑक्टोबर २००६, accessed २५ ऑक्टोबर २००६.

बाह्य दुवे