Jump to content

भारताची जनगणना १९८१

१९८१ भारताची जनगणना

१९७११९८०-१९८१ १९९१

सामान्य माहिती
देशभारत
परिणाम
लोकसंख्या ६८,५१,८४,६९२ (२५.००% )
सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रदेशउत्तर प्रदेश (११,०८,६२,०१३)
सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेशलक्षद्वीप (४०,२४९)
साक्षरता ३६.२३%
लिंग गुणोत्तर ९३४
लोकसंख्येची घनता २१६


१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९८१ची भारताची जनगणना ही १२ वी जनगणना होती. १९८१ मध्ये भारताची लोकसंख्या ३५४,३९७,८८४ पुरुष आणि ३३०,७८६,३०८ स्त्रिया अशी एकूण ६८५,१८४,६९२ (६८ करोड ५१ लाख ८४ हजार सहाशे ब्याण्णव) होती. एकूण लोकसंख्या ही १९७१ च्या जनगणनेत मोजलेल्या ५४८,१५९,६५२ लोकांपेक्षा १३७,०२५,०४० ने अधिक वाढली, म्हणजेच २५.०० % जास्त. []

जनगणना

१९८१ च्या जनगणनेनुसार,

  • भारताची एकूण लोकसंख्या - ६८,५१,८४,६९२ (६८ करोड ५१ लाख ८४ हजार सहाशे ब्याण्णव)
  • पुरुष - ३५४,३९७,८८४ (५१.७%)
  • स्त्री - ३३०,७८६,३०८ (४८.३%)
  • लिंग गुणोत्तर - ९३४ महिला प्रति १००० पुरुष
  • साक्षरता (एकूण लोकसंख्येची टक्केवारी ० ते ४ वयोगटासह)- ३६.२३% , पुरुष साक्षरता ४६.८९% आणि स्त्री साक्षरता २४.८२%
  • लोकसंख्येची घनता - २१६ प्रति कि.मी.
  • शहरी लोकसंख्या २३.७ %
वयोगटानुसार
वयोगट लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या %
० - १४ २६३,१०७,०५० ३९.५५
१५ - ५९ ३५८,६७९,६३५ ५३.९१
६०+ ४३,१६७,३८५ ६.४९
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लोकसंख्या
वर्ग लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या %
अनुसूचित जाती १०४,७५४,६२३ १५.७५
अनुसूचित जमाती ५१,६२८,६३८ ७.७६

राज्य निहाय लोकसंख्या

१९८१ च्या जनगणनेच्या वेळेस भारतात २२ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेश आणि एकूण ४०२ (आसाम राज्यातील जिल्हे वगळून) जिल्हे होती.

भारताच्या लोकसंख्येचे राज्य निहाय विवरण
राज्य / केंद्रशासित प्रदेशप्रकार लोकसंख्यालिंग गुणोत्तरघनता (प्रति कि.मी..)
आंध्र प्रदेश राज्य ५३,५४९,६७३ ९७५ १९५
आसाम *[]राज्य १९,८९६,८४३ उपलब्ध नाही उपलब्ध नाही
बिहार राज्य ६९,९१४,७३४ ९४६ ४०२
गुजरात राज्य ३४,०८५,७९९ ९४२ १७४
हरियाणा राज्य १२,९२२,६१८ ८७० २९२
हिमाचल प्रदेश राज्य ४,२८०,८१८ ९७३ ७७
जम्मू आणि काश्मीर राज्य ५,९८७,३८९ ८९२ ५९
कर्नाटक राज्य ३७,१३५,७१४ ९६३ १९४
केरळा राज्य २५,४५३,६८० १०३२ ६५५
मध्य प्रदेश राज्य ५२,१७८,८४४ ९४१ ११८
महाराष्ट्र राज्य ६२,७८४,१७१ ९३७ २०४
मणिपूर राज्य १,४२०,९५३ ९७१ ६४
मेघालय राज्य १,३३५,८१९ ९५४ ६०
नागालँड राज्य ७७४,९३० ८६३ ४७
ओरिसा राज्य २६,३७०,२७१ ९८१ १६९
पंजाब राज्य १६,७८८,९१५ ८७९ ३३३
राजस्थान राज्य ३४,२६१,८६२ ९१९ १००
सिक्कीम राज्य ३१६,३८५ ८३५ ४५
तामिळनाडू राज्य ४८,४०८,०७७ ९७७ ३७२
त्रिपुरा राज्य २,०५३,०५८ ९४६ १९६
उत्तर प्रदेश राज्य ११०,८६२,०१३ ८८५ ३७७
पश्चिम बंगाल राज्य ५४,५८०,६४७ ९११ ६१५
अंदमान आणि निकोबार बेटे (UT) केंद्रशासित प्रदेश १८८,७४१ ७६० २३
अरुणाचल प्रदेश (UT) केंद्रशासित प्रदेश ६३१,८३९ ८६२
चंदीगड (UT) केंद्रशासित प्रदेश ४५१,६१० ७६९ ३९६१
दादरा आणि नगर हवेली (UT) केंद्रशासित प्रदेश १०३,६७६ ९७४ २११
दिल्ली (NCT) केंद्रशासित प्रदेश ६,२२०,४०६ ८०८ ४१९४
गोवा, दमण आणि दीव (UT) केंद्रशासित प्रदेश १,०८६,७३० ९८१ २८५
लक्षद्वीप (UT) केंद्रशासित प्रदेश ४०,२४९ ९७५ १२५८
मिझोरम (UT) केंद्रशासित प्रदेश ४९३,७५७ ९१९ २३
पाँडिचेरी (UT) केंद्रशासित प्रदेश ६०४,४७१ ९८५ १२२९

भारताच्या १९८१ च्या आकडेवारीमध्ये आसामच्या अनुमानित लोकसंख्येचा समावेश आहे जेथे १९८१ च्या जनगणनेच्या वेळी तेथील गोंधळ परिस्थिती मुळे जनगणना होऊ शकली नाही.

धर्म निहाय लोकसंख्येचे विवरण

१९८१ च्या जनगणनेनुसार हिंदू धर्माची लोकसंख्या ५४९,७२४,७१७ (८२.६३%) होती

धर्म लोकसंख्याभारताच्या एकूण लोकसंख्येच्या %
हिंदू () ५४९,७२४,७१७ ८२.६३  
इस्लाम () ७५,५७१,५१४ ११.३६
ख्रिश्चन () १६,१७४,४९८ २.४३
शिख () १३,०७८.१४६ १.९६
बौद्ध () ११,७१९,९०० ०.७१  
जैन () ३,१९२,५७२ ०.४८
अन्य धर्म २,७६६,२८५ ०.४२
कोणताही धर्म सांगितलेला नाही ६०,२१७ ०.०१
एकूण६८,५१,८४,६९२ १००%

भाषा

भाषालोकसंख्याभारताच्या एकूण लोकसंख्येच्या %
आसामी७०,५२५ ०.०१
बंगाली५१,५०३,०८५ ७.७९
गुजराती३३,१८९,०३९ ५.०२
हिंदी२६४,१८९,०५७ ३९.९४
कन्नड२६,८८७,८३७ ४.०६
काश्मिरी३,१७४,६८४ ०.४८
मल्याळम२५,९५२,९६६ ३.९२
मराठी४९६२४८४७.०० ७.५०
ओरिया २२,८८१,०५३ ३.४६
पंजाबी१८,५८८,४०० २.८१
संस्कृत२,९४६
सिंधी१,९४६,२७८ ०.२९
तमिळ४४,७३०,३८९ ६.७६
तेलुगु५४,२२६,२२७ ८.२०
उर्दू३५,३२३,२८२

 

५.३४
इतर भाषा २९,२०६,५३४ ४.४२

साक्षरता

भारताची एकूण साक्षरता (एकूण लोकसंख्येची टक्केवारी ० ते ४ वयोगटासह) ३६.२३% ,तर पुरुष साक्षरता ४६.८९% आणि स्त्री साक्षरता २४.८२% एवढी होती.

हे सुद्धा पहा

  1. ^ "भारताची जनगणना १९८१" (PDF).
  2. ^ "Population projection". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-09-22.