Jump to content

भागवत धर्म

वैष्णव तत्त्वज्ञानाला अनुसरून आचरण करीत असलेल्या महाराष्ट्रातील एका संप्रदायाला भागवत धर्म म्हणतात. विशेषतः कृष्णाच्या किंवा विष्णूच्या उपासकांना 'भागवत' म्हणतात. महाराष्ट्रातील निम्न आर्थिक गट आणि कमी शिक्षित गटातील लोक या धर्माकडे विशेष आकर्षिले गेले, कारण हा धर्म आचरायला तुलनेने सोपा आहे, असे मानले जाते. []

वैशिष्ट्ये

  • हा धर्म आचरायला सोपा असून याचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य व्यक्तीला समजण्यासारखे आहे.
  • उपासना पद्धती साध्या-सोप्या आहेत, त्यात जटिलता किंवा कर्मकांड नाही.
  • स्त्री, पुरुष, जात, वंश असा कोणताही भेद या संप्रदायात मानला जात नाही.
  • माणसाच्या मनातली हाव किंवा लोभ शांत करून भगवंताकडे नेणारा मोक्षाचा मार्ग या संप्रदायात आचरला जातो.[]

संदर्भ

  1. ^ a b McIntosh, Ian S.; Harman, Lesley D. (2017-10-27). The Many Voices of Pilgrimage and Reconciliation. CABI Religious Tourism and Pilgrimage Series (इंग्रजी भाषेत). CABI. ISBN 9781786393265.