भाऊ मराठे
भाऊ मराठे (निधन २६ आॅगस्ट २०१६) हे संगीताच्या कार्यक्रमांसाठी भारदस्त आवाजात निवेदन करणारे एक मराठी लेखक होते. त्यांची 'सरीवर सरी' या कार्क्रमाची निवेदने विशेष गाजली. त्यांचा मराठी काव्यसंपदेचा दांडगा अभ्यास होता. त्या शिदोरीच्या जोरावर भाऊंचे निवेदन कसदार आणि बिनतोड असायचे. निवेदनात काव्यपंक्तींची गुंफण ते अगदी सहजपणे करायचे.
भाऊ मराठे यांनी अन्य लेखकांच्या सहयोगाने काही मराठी पुस्तकांचे लेखन-संपादन केले आहे.
पुस्तके
- जीवन त्यांना कळले हो ! (सहसंकलक - अप्पा परचुरे,) : पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल विविध साहित्यिकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन)
- पाचामुखी (संकलन : पु.ल. देशपांडे यांच्या भाषणांचे आणि मुलाखतींचे संकलन).
- भावगंध (पु.ल. देशपांडे यांच्या काही लेखांचे संकलन)
- सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज.(सहलेखक - डाॅ.नागेश कांबळे)