भांबेड
भांबेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.
भौगोलिक स्थान
लांजा बस स्थानकापासून गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर उजवीकडे फुटणाऱ्या वेरवली-कोर्ले रस्त्याने गेल्यानंतर कोर्ले तिठ्यावर उजवीकडे गेल्यावर हे गाव लागते. लांज्यापासून हे २१ किमी अंतरावर वसलेले आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. कातळाची जमीन असल्यामुळे पाणी साचत नाही. उन्हाळ्यात उष्ण तर हिवाळ्यात सुखद गार हवामान असते.
लोकजीवन
येथे मुख्यतः कुणबी, वैश्य, ब्राह्मण, मुस्लिम समाजातील लोक पूर्वीपासून स्थायिक आहेत. आठवड्यात एक दिवस येथे बाजार भरतो.भांबेड, हर्दखळे, कोर्ले,प्रभानवल्ली ह्या गावातील लोक बाजारात खरेदी-विक्रीसाठी येतात.नागली,भातशेती बरोबरच दुग्धव्यवसाय, बकरीपालन,काथउत्पादन व्यवसाय केले जातात.
नागरी सुविधा
येथे येण्यासाठी लांजा एसटीबस स्थानकातून भांबेड, हर्दखळे बसेस नियमित सोडल्या जातात.लांज्यावरून खासगी रिक्षासुद्धा उपलब्ध असतात. सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्तेवीजपुरवठा भांबेड ग्रामपंचायतीतर्फे पाहिले जाते.येथे सहकारी बँकेची सुविधा उपलब्ध आहे.
जवळपासची गावे
नामे, पालू, बाणखोर, खोरनिनको, प्रभानवल्ली, हर्दखळे, कुडेवाडी, वाघणगाव, विलवडे, मोगरगाव, व्हेळ ही जवळपासची गावे आहेत.भांबेड ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]