Jump to content

भांगपाडी मैना

भांगपाडी मैना-नर
भांगपाडी मैना-मादी

भांगपाडी मैना किंवा ब्राह्मणी स्टारलिंग हा जीव पक्ष्यांच्या स्टारलिंग कुटुंबातील सदस्य आहे. ते सहसा दक्षिण आशियाच्या मैदानावरील खुल्या अधिवासात जोड्यांमध्ये किंवा लहान थव्यांमध्ये दिसतात. ही मैना रंगाने फिकट शेंदरी असते. चोच निळसर असून डोळ्यांभोवती निळसर त्वचा असते. पाय पिवळ्या रंगाचे असतात. या मैनेच्या डोक्यावर काळी टोपी घातल्यासारखी पिसे असतात. पुर्ण वाढ झालेल्या नराची काळी टोपी जास्त उठावदार असते. तसेच त्याच्या गळ्यावर असणाऱ्या पिवळसर रेषाही मादीपेक्षा जास्त गडद असतात. पिल्लांचा रंग फिकट असतो व त्यांच्या डोक्यावरची टोपी तपकीरी रंगाची असते. मे ते जून हा यांचा विणीचा हंगाम असतो. नर व मादी दोघेही पिल्लांना वाढवण्याचे काम करतात. यांचा आहार म्हणजे किडे.

या मैनेची स्थानिक भाषेतली नावे खालील प्रमाणे:

Bengali: বামুনি কাঠশালিক

• Bhojpuri: पूहई, ब्राह्मणी मैना

• Hindi: कालासिर मैना, चन्ना हुडी

• Kannada: ಕರಿತಲೆ ಕಬ್ಬಕ್ಕಿ

• Malayalam: കരിന്തലച്ചിക്കാളി

• Marathi: ब्राह्मणी मैना, भांगपाडी मैना, पोपई मैना

• Nepali: जुरे सारौँ, जुरे रुपी

• Punjabi: ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਮੈਨਾ

• Sanskrit: शंकरा