भव्यपट
भव्यपट किंवा भव्य चित्रपट (इंग्रजी: Epic Film) ही मोठ्या प्रमाणावर व्याप्ती आणि दृश्ये असलेली चित्रपटनिर्मितीची एक शैली आहे. या शब्दाचा वापर कालांतराने बदलला आहे, काहीवेळा याचा अर्थ चित्रपट शैली असा घेतला जातो आणि इतर वेळी फक्त मोठ्या-खर्चाच्या चित्रपट निर्मितींसाठी हा शब्द वापरला जातो. शास्त्रीय साहित्यिक अर्थाने महाकाव्यांप्रमाणे, हे चित्रपट सहसा वीर पात्रावर केंद्रित असतात. एखाद्या भव्यपटाचे महत्त्वाकांक्षी वैशिष्ट्य त्याला इतर प्रकारच्या चित्रपटांपासून जसे की पीरियड पीस किंवा साहसी चित्रपटांपासून वेगळे ठेवण्यास मदत करते.
भव्य ऐतिहासिक चित्रपट सामान्यत: ऐतिहासिक किंवा पौराणिक घटनांवर आधारित असतात आणि त्यामध्ये विलक्षण पार्श्वभूमी (सेटिंग) आणि भव्य पोशाख वापरले जातात. अशा चित्रपटांत समुच्चय कलाकारांसह एक विस्तृत संगीत स्कोअर[मराठी शब्द सुचवा] असतो, ज्यामुळे ते निर्मितीसाठी सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक बनतात. भव्यपटांचे सर्वात सामान्य विषय म्हणजे रॉयल्टी आणि जागतिक इतिहासातील विविध कालखंडातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. [१]
संदर्भ
- ^ Tim Dirks (12 July 2008). "Epic Films". Filmsite. 12 July 2008 रोजी पाहिले.