Jump to content

भरत दाभोळकर

भरत दाभोळकर
भरत दाभोळकर दारासिंग च्या अंत्यविधी ला
जन्मभरत दाभोळकर
३१ डिसेंबर, १९६९ (1969-12-31) (वय: ५४)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र जाहिरात क्षेत्र, रंगभूमी आणि हिंदी,मराठी चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००१ ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट वन टू का फोर
धर्महिंदू

भरत दाभोळकर (जन्म:३१ डिसेंबर,१९६९) हे एक अभिनेता-दिग्दर्शक आणि लेखक आहेत, ज्यांनी प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९६९ रोजी झाला आहे. भरत हे व्यवस्थापन पदवीधर आहेत तसेच त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी कायद्याची पदवी देखील घेतली आहे.[]

दाभोळकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फिलिप्स येथे प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती. त्या नंतर त्यांनी अमूल बटरच्या जाहिरातींसाठी दीर्घकाळ काम केले. डाकुन्हा असोसिएट्समध्ये काम करत असताना त्यांना रंगभूमीवरील कामात रस निर्माण झाला. तेव्हापासून दाभोळकर यांनी २९ नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केली. इ.स. २००१ मध्ये 'वन टू का फोर' या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 'कॉर्पोरेट', 'वीर' आणि 'एक्सपोज' सहित विविध हिंदी चित्रपटांत काम केले. 'गॉड ओन्ली नोज' या चित्रपटाद्वारे भरतने दिग्दर्शनात पदार्पण केले. तसेच या चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली होती. त्यांनी अनेक हिंग्लिश नाटके लिहिली आहेत, जी इंग्रजी आणि स्थानिक हिंदीचे आनंददायी मिश्रण आहे.[]

भरत दाभोळकर यांनीन १५ हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. परंतु मुळात ते एक 'जाहिरात तज्ञ' किंवा 'अ‍ॅडगुरू' म्हणून जास्त ओळखले जातात.[] त्यांनी 'बँक ऑफ इंडिया', 'फ्रूटी', 'बेली', 'अ‍ॅपी', 'व्हिडिओकॉन' आणि टाटाच्या विविध उत्पादनांसह अनेक प्रसिद्ध ब्रँडसाठी काम केले आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गौर हरी दास्तान-द फ्रीडम फाइल' या चित्रपटात देखील त्यांची भूमिका आहे. भरतने 'द एक्सपोज', 'जॉन डे' यांसारख्या विदेशी सिनेमांमध्ये काम केले आहे.[]

अभिनय सूची

चित्रपट[]

वर्ष चित्रपट नोंद
२०२२ खबीस
२०२२ आता वेळ झाली मराठी चित्रपट
२०२२ रान बाजार मराठी चित्रपट
२०२० प्रवास स्वतः
२०१९ दबंग ३
२०१८ डॉक्टर रखमाबाई आजोबा
२०१८ येरे येरे पैसा हर्षवर्धन ठाकूर
२०१७ सरकार ३ गोरख रामपूर
२०१७ कॉल फॉर फन सबरवाल
२०१७ एझरा याकूब एझरा
२०१५ लोकमान्य एक युगपुरुष मी. ब्रुईन
२०१५ बरसात
२०१४ द एक्सपोज
२०१३ जॉन डे अशोक देशमुख
२०१३ आर... राजकुमार गुंड
२०१३ असा मी अशी ती
२०११ पोनार शंकर थिरूमलाई
२०११ दबंग रोहन चा प्रशिक्षक
२०१० वीर चमन
२००९ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अफझलखान
२००७ धोखा बार टेंडर
२००७ ता रा रम पम बिली भाटिया
२००६ कॉर्पोरेट जो राजन
२००५ मी या मिस प्रकाश मल्होत्रा
२००५ करम कॅप्टन
२००४ गॉड ओन्ली नोज दिग्दर्शक/पटकथा लेखक

पुरस्कार आणि सन्मान []

  • डाकुन्हा असोसिएट्स सोबत त्यांनी १४ वर्षे काम केले होते. त्यात अध्यक्ष म्हणून शेवटचे सात वर्ष काम केले होते.
  • अमूल बटर या ब्रँडसाठी सलग १४ वर्षे जाहिरात उत्कृष्टता पुरस्कार जिंकले आहेत.

संदर्भ

  1. ^ a b c d "Bharat Dabholkar". ३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "प्रख्यात 'अ‍ॅडगुरू' दाभोळकर यांची कार्यशाळा आज". divyamarathi.bhaskar.com. ३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "BHARAT DABHOLKAR" (इंग्रजी भाषेत). 2022-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जुलै २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील भरत दाभोळकर चे पान (इंग्लिश मजकूर)