भरणी (कुडाळ)
?भरणी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कुडाळ |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
भरणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. कणकवली ही मोठी बाजारपेठ 25 किलोमीटर अंतरावर असल्याने प्रशासकीय कामाव्यतिरिक्त कुडाळ शी संबंध काहीसा कमीच.जिल्ह्याचे ठिकाण ओरोस बुद्रुक आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्याला सीमा लागून आहे. या छोट्याशा गावा मध्ये अंदाजे 300-350 घरे असून 1200 पर्यंत लोकसंख्या आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय आणी नैसर्गिक साधनसंपत्तीची देण या गावची ओळख आहे. 12 महिने नैसर्गिक असा अखंड वाहणारा थंड पाण्याचा झरा पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचीही गरज भागवतो. गावामध्ये एकूण 3 वाडी असून आगरवाडी , गावठणवाडी आणी सुंदरवाडी असे 3 भाग आहेत. आगरवाडी मध्ये उन्हाळी शेतीमध्ये कांदा, कुळीत, चवळी, मूग, भुईमूग, सूर्यफूल, तसेच लाल भाजी, वाली, वांगी, कोबी, फरसबी, मिरची, भोपळा, भेंडी, पडवळ, दोडका, काकडी, दुधी, अशी विविध भाजी पाल्याची पिक घेतली जातात. येथील गावठी कांद्याला प्रचंड मागणी आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या गावची प्रगती काही प्रमाणात या 10 वर्षात झपाट्याने झाली..मातीची घरे पक्की जांभा दगडात रूपांतरीत झाली. पंतप्रधान जलजीवन योजनेअंतर्गत पिण्यासाठी स्वच्छ पाणी घरोघरी पोचले. तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 2002 साली लिंगेश्वर ग्राम मंदिर पर्यंत पक्का रस्ता बांधून अलीकडेच पथ दिवे बसविण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवण्यासाठी घोडगे बाजार ही इतिहासकालीन अशी हक्काची बाजारपेठ आहे. पंचक्रोशी मधील लोक विक्रेते आणी ग्राहक असल्यामुळे सर्व समतोल दिसून येतो. गावातील ग्राम दैवत लिंगेश्वर मंदिर चे बांधकाम पूर्णपणे रेखीव अशा दगडात केले असून पुरातन पद्धतीचे आहे. नवसाला पावणारा आणी हाकेला धावणारी भरणीची मर्याद ही या देव स्थानाची ओळख. गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हरिणाम सप्ताह, जत्रा तसेच महाशिवरात्री उत्सव या मध्ये लोक उत्साहाने सहभागी होतात. गावातील 90% घरातील एकतरी व्यक्ती मुंबई , पुणे सारख्या शहरात नोकरी साठी स्थलान्तरित् झालेले आहेत. अलीकडेच शासनाच्या विविध योजनेतून शेतीपूरक उद्योग निर्मिती दिसून येते.यामध्ये कुक्क्कुटपालन, शेळीपालन, आणी प्रमुखतः दुग्ध व्यवसाय यशस्वीरित्या वाढीस लागला आहे. मुबलक पाणी आणी नैसर्गिक वातावरण.सुपीक जमीन यामुळे दुधाळ जनावराना पोषक वातावरण असल्याने मोठया संधी या ठिकाणी उपलब्द आहेत्... गावा मध्ये 2 संकलन केंद्र असून दुधाला चांगला हमीभाव असल्याने येथील शेतकरी हळूहळू या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. तरुण वर्ग बाहेर स्तलांतरीत झाल्यामुळे शेतीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले आहे. भविष्यात नैसर्गिक साधनसमृद्धीने परिपूर्ण असलेल्या या गावामध्ये निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्द असतील यात तिळमात्र शंका नाही... गेल्या काही वर्षांमध्ये गावातील दरडोई उत्पन्न वाढले असून सर्वांना राहण्यासाठी पक्की घरे, पिण्यासाठी पाणी, घरापर्यंत रस्ता, वीज आणी इतर वाहतुकीची साधने उपलब्द झाल्यामुळे लोकांचे राहणीमान सुधारले आहे. इतरांच्या तुलनेत भरणी गावाची प्रगती झपाट्याने होत असून साक्षरतेचे प्रमाणही 100% असल्याने सुशिक्तीत असा तरुण वर्ग भविष्यात विविध उद्योग निर्माण करू शकतो असा विश्वास माजी पोलीस पाटील श्री . भास्कर जगन्नाथ कदम यांनी व्यक्त केला...
भौगोलिक स्थान
हवामान- उन्हाळा अति प्रखर ..बाकी दमट
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन- सहजसुंदर अस जीवन.. लोकांमधील एकजूट, आणी परंपरागत लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे- वर्नादेवी झरा... 12 महिने वाहणारा थंड पाण्याचा नैसर्गिक जलस्रोत.
नागरी सुविधा- प्राथमिक शाळा, दवाखाना, परिपक्व रस्ते, पिण्यासाठी घरोघरी पाणी, दळवळणाची साधने, इ.
जवळपासची गावे- घोडगे, जांभवडे, कुपवडे, सोनवडे, इ
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/