Jump to content

भद्रक

भद्रक
शहर / नगरपालिका
भद्रक is located in भारत
भद्रक
भद्रक
ओरिसा मधील स्थान, भारत
गुणक: 21°04′N 86°30′E / 21.06°N 86.50°E / 21.06; 86.50गुणक: 21°04′N 86°30′E / 21.06°N 86.50°E / 21.06; 86.50
देशभारत ध्वज भारत
राज्य ओरिसा
जिल्हाभद्रक
सरकार
 • प्रकार नगरपालिका
 • Body भद्रक नगरपालिका
क्षेत्रफळ
 • एकूण ७८.८६ km (३०.४५ sq mi)
Elevation
२३ m (७५ ft)
लोकसंख्या
 (2011)[]
 • एकूण १,०७,३६९
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
भाषा
 • अधिकृत उरिया
Time zone UTC+5:30 (IST)
पिन
७५६१००
संकेतस्थळbhadrak.nic.in

भद्रक हे पूर्व भारतातील ओरिसा राज्यातील एक शहर आहे. याची स्थापना १ एप्रिल १९९३ रोजी झाली. या शहरात भद्रक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. पौराणिक कथेनुसार या शहराचे नाव भद्रकाली देवीच्या नावावरून ठेवले आहे. या देवीचे मंदिर सालंदी नदीच्या काठावर आहे. []

इतिहास

पौराणिक कथेनुसार भद्रक हे नाव भद्रकाली देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या देवीचे मंदिर शहराच्या नैऋत्यकडे आहे. ही पुरातन भूमी पुराणांच्या काळापासून आहे. [] भद्रकचे ओरिसाच्या समृद्धीत, व्यापारात आणि व्यवहारात महत्त्वाचे योगदान आहे. मुघलांच्या काळात, भद्रक हा बंगालच्या नवाबांच्या अधीन असलेला सुभा किंवा प्रांत होता. जेव्हा मुघलांची सत्ता कमकुवत झाली, तेव्हा या प्रदेशावर क्षत्रिय प्रमुखांची सत्ता आली. या प्रदेशात कनिका, नामपो आणि आगरापाडा सारख्या प्रांतांचा समावेश होता. []

जून १८०४ मध्ये ब्रिटिशांनी ओरीसाचा ताबा घेतला. त्यानंतर भद्रक हा कटक आणि बालासोर या दोन प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला. १८२८ मध्ये बालासोरचा स्वतंत्र जिल्हा बनविला. भद्रक हे उपविभागीय प्रमुख म्हणून सहायक मजिस्ट्रेट आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागांपैकी एक बनला. परंतु १९०१ पर्यंत परगना कोर्ट जाजपूर मध्येच होते. []

राष्ट्रीय संघर्षाच्या काळात भद्रक आघाडीवर होते. १९२० मध्ये, महात्मा गांधींचे असहकार आंदोलन सुरू झाले. मार्च १९२१ मध्ये गांधींनी भद्रकला भेट दिली. तेथील राष्ट्रवादी आवेशाने आणि लढाऊ भावनेने ते प्रभावित झाले होते. १९२२ मध्ये त्यांनी भद्रक येथे असलेल्या ब्रिटिश सैन्याने कनिकाची बंडखोरी दडपण्याचा प्रयत्न सुरू केला. पण शेवटी कनिकाचे नेते चक्रधर बेहेरा यांच्या नेतृत्वात भाडेकरूंच्या चळवळीचा विजय झाला.[]

१९३० मध्ये जेव्हा नागरी अवज्ञा आंदोलन सुरू केले गेले, तेव्हा भद्रक त्यात हिरहीरीने सामील झाले. मिठाचा कायदा मोडला गेला आणि सरकारविरूद्ध यश संपादन झाले. या यशात हरेकृष्णा महताब यांची भूमिका भद्रकमध्ये नावाजली आणि अर्थातच आधुनिक भारताच्या इतिहासातही याची नोंद झाली. १९३४ मध्ये पुन्हा एकदा गांधींनी भद्रकला भेट दिली. त्यावेळेस ते नुआबाजार येथील महताबच्या निवासस्थानी वास्तव्यास होते. तेथे त्यांनी झिंबरन आश्रम (हरियाझी, आश्रम, गरडपूर) येथे हरीजन कामगारांच्या बैठकीला संबोधित केले होते. याच काळात एरमची बंचनिधी मोहंती त्यांच्या देशभक्तीपर गीतांनी लोकांमध्ये चैतन्य निर्माण केले होते. []

स्वातंत्र्योत्तर काळापासून भद्राकने शिक्षण, उद्योग, शेती आणि व्यापारात प्रगती केली आहे.

हवामान

Bhadrak, Odisha साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 27.2
(81)
30.0
(86)
34.3
(93.7)
36.9
(98.4)
37.1
(98.8)
34.6
(94.3)
31.4
(88.5)
31.3
(88.3)
31.5
(88.7)
30.5
(86.9)
28.9
(84)
27.0
(80.6)
31.73
(89.1)
सरासरी किमान °से (°फॅ) 14.4
(57.9)
17.1
(62.8)
21.4
(70.5)
24.9
(76.8)
26.7
(80.1)
26.3
(79.3)
25.7
(78.3)
25.9
(78.6)
25.6
(78.1)
23.4
(74.1)
18.0
(64.4)
14.3
(57.7)
21.98
(71.55)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 13
(0.51)
31
(1.22)
34
(1.34)
45
(1.77)
85
(3.35)
212
(8.35)
306
(12.05)
326
(12.83)
273
(10.75)
161
(6.34)
38
(1.5)
6
(0.24)
१,५३०
(६०.२५)
स्रोत: en.climate-data.org

वाहतूक

भद्रक हे शहर ओरीसा राज्यासह देशाच्या इतर भागाशी वाहतुकीने चांगले जोडलेले आहे. हे शहर राष्ट्रीय महामार्ग १६ वर स्थित आहे. ते भुवनेश्वरच्या ईशान्य दिशेस १३०० किलोमीटर वर आहे. [] भद्रक शहरात तीन मोठी बस स्थानके आहेत, एन.एच. १६ वर, बंट छक जवळ आणि चरणपाजवळ. कटक, भुवनेश्वर, बालासोर आणि कलकत्ता येथून भद्रकला येण्या-जाण्यासाठी खुप बसेस आहेत. [ संदर्भ हवा ]

भद्रक रेल्वे स्थानक चरमपा येथे आहे, जे भद्रक शहराच्या उत्तरेस ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर आहे.

सर्वात जवळचा विमानतळ बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नैऋत्य दिशेला, भुवनेश्वर जवळ, १३५ किलोमीटर (८४ मैल) अंतरावर आहे. <ref name="BhadrakDistrictHow-to-reach">

शहराच्या पूर्वेस सुमारे ७५ किलोमीटर (४७ मैल) अंतरावर, धमरा बंदर आहे.

संदर्भ

  1. ^ a b c d e f "About the District". Bhadrak district. 2007. 21 October 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 May 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Bhadrak City Census 2011 data". Office of the Registrar General & Census Commissioner, India. 20 May 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "About District". Bhadrak district. 2018. 2 June 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "How to Reach". Bhadrak district. 20 May 2018 रोजी पाहिले.

[[वर्ग:ओडिशामधील शहरे]