भडगाव बुद्रुक
?भडगाव बुद्रुक महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कुडाळ |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
भडगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
भडगाव गावात हिंदू बहुसंख्य असून ख्रिचन व बौद्ध समाजाची गावात वस्ती आहे.
शेती हेच गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाच मुख्य साधन आहे. कोकणातील इतर गावांप्रमाणे भडगाव देखील भात या प्रमुख शेतपिकाच उत्पादन घेणारा गाव आहे. गावातील सर्वच शेतकऱ्यांच मुख्य पीक भातपिक आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात गावात भातशेती केली जाते पण उन्हाळ्यात पाण्याच्या उपल्ब्धतेमुळे भात शेतीवर मर्यादा येतात.
पूर्वी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती भातशेती आता आधुनिक पद्धतीकडे वळली आहे. गावातील भात उत्पादक शेतकरी आता नांगरणी साठी पॉवर टिलर, पॉवर विडर यांचा वावर करू लागला आहे. काही ठिकाणी कापणी यंत्र आणि मळणी किंवा भात झोडणी यंत्राचा वापर होतो.
भात शेती सोबत गावात काही ठिकाणी ऊस या नगदी पिकाची शेती केली जाते. उन्हाळ्यात नाचणी, भुईमूग, चवळी, कुळीथ, माका, मूग, या कडधान्यांची तर वाल, मिरची, वांगी, गवार, भेंडी, लाल माठ, मूळा इत्यादी भाजीपाल्याची शेती केली जाते.
शेती पूरक व्यवसायात शेळीपालन दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन करणारे शेतकरी गावात आहेत. यापैकी शेळीपालन हा गावातील धनगर समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
कुक्कुटपालन व्यवसाय गावातील काही तरुण व महिला करत असून यात अगदी पन्नास पक्षी क्षमतेपासून ते सहा हजार क्षमतेपर्यंत कुक्कुटपालन करणारे शेतकरी आहेत.
गावातील जास्त शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करत असून गावात श्री देव गिरोबा रवळनाथ सहकारी दूध संकलन केंद्र आहे. याठिकाणी गावातील शेतकरी दूध संकलित करतात व हे संकलित केलेलं दूध नंतर नाढवडे येथे पाठविण्यात येते.
गावात काजूच्या छोट्या मोठ्या बागा असून गेल्या पाच दहा वर्षात बहुतांशी वरकस जमीन ही काजू लागवडीखाली आली आहे. यात म.न.रे.गा. व कृषी योजनांच्या माध्यमातुन काजू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची संख्या मोठी आहे.
गावातील काही व्यक्ती आंबा बागायतदार असून आंबा पिकासाठी अनुकूल वातावरण नसतानाही ते आधुनिक तंत्रज्ञान वावरत आंबा उत्पादन घेतात.
उन्हाळ्यात भडगाव नदी तसेच गावातील छोट्या ओहोळांवर बांध घालून उन्हाळी शेती केली जाते. स्थानिक लोक एकत्र येत हे वनराई बंधाऱ्यांची उभारणी करतात.
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/