Jump to content

भजनलाल

भजनलाल बिष्णोई (ऑक्टोबर ६, इ.स. १९३० - जून ३, इ.स. २०११) हे भारतातील हरियाणा राज्यातील राजकारणी होते. ते जून २९, इ.स. १९७९ ते जुलै ५, इ.स. १९८६ आणि जून २३, इ.स. १९९१ ते मे ९, इ.स. १९९६ या काळात हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील कर्नाल आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील हिस्सार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.